हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ ज्या कामाला प्रयत्न करूनही म्हणावा तसा वेग येत नव्हता त्या कामाला आता चांगली कलाटणी मिळण्याची तुम्हाला खात्री वाटेल. अनेक कामे एकाच वेळी हातात घेऊन ती संपवण्याचा तुमचा निर्धार असेल. सभोवतालच्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी वेळप्रसंगी जिभेवर साखर पेरावी लागेल. व्यवसाय उद्योगात महत्त्वाच्या कामांना चालना देण्यासाठी तुमची सध्याची कार्यपद्धती तात्पुरती बदलायचे ठरवाल. नोकरीमध्ये एखादे मनाप्रमाणे चांगले काम मिळाल्यामुळे तुम्ही उत्साही दिसाल.
मिथुन ज्या कामाला गेल्या दोन-तीन आठवडय़ांपासून काही ना काही कारणांमुळे नाट लागला होता त्यामध्ये आता हळूहळू गती येण्याची चिन्हे दिसू लागतील. व्यापार-उद्योगात नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. परंतु खेळत्या भांडवलाची सोय निर्माण करण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये सर्व जण तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील. त्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला कटिबद्ध राहावे लागेल. प्रकृतीच्या चढउतारांवर लक्ष ठेवा.
कर्क नशिबावर जास्त विसंबून न राहता तुमच्या प्रयत्नांवर तुमचा विश्वास असतो. त्याचा तुम्हाला या आठवडय़ात उपयोग होईल. व्यापार-उद्योगातील पूर्वी केलेली कामे आणि तुमचे प्रयत्न या दोन्हीचा उपयोग झाल्यामुळे नवीन ऑर्डर किंवा काम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू जरी फारशी भक्कम नसली तरी तुमचे मनोधैर्य उत्तम असेल. नोकरीमध्ये नेहमीच्या कामापेक्षा एखादे वेगळे काम असेल तर त्यामध्ये तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम घाईघाईत पार पडेल.
सिंह सहसा तुम्ही कुठल्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता स्वयंभू राहून काम करण्याचा अवलंब करता. पण या आठवडय़ात तुमचा मतलब साध्य करण्याकरिता कदाचित मध्यस्थांना खूश ठेवावे लागेल. व्यवसाय-उद्योगात यश कोणत्या मार्गाने मिळेल याचे नियोजन करण्यात बराच वेळ जाईल. तातडीच्या कामात बिलकूल विलंब करू नका. पैशाची आवक थोडीशी कमी वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामध्ये मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी त्यांना विशेष सवलती द्याल.
कन्या जी कामे आपल्या प्रयत्नांच्या पलीकडली असतात आणि जिथे नशिबाचा वाटा मोठा असतो अशा कामांना आता गती यायला सुरुवात होईल. व्यवसाय-उद्योगात ज्यांनी तुम्हाला पूर्वी सहकार्य करायला टाळाटाळ केली होती त्यांच्याकडून प्रतिसाद मिळायला सुरुवात होईल. पैशाची आवक आणि होणारे खर्च याचे प्रमाण सारखेच राहील. नोकरीमध्ये एकलव्याप्रमाणे तुम्ही काम केलेत तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पडू शकेल. घरामधल्या व्यक्तींना जी गोष्ट पूर्वी पटली नव्हती ती पटेल.
तूळ ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा केली नव्हती अशा गोष्टी काही प्रमाणात मार्गी लागल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांकडून अनपेक्षितरीत्या चांगली दाद मिळेल. त्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे एखादे व्यक्तिगत कामही त्यांच्याकडून करून घ्याल. आधी जुनी देणी देऊन टाका. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्या माध्यमातून पैसे मिळविण्याची एखादी संधी उपलब्ध होईल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ सवलत देऊन जास्त काम करून घेतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींची हजेरी लागेल.
वृश्चिक कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करायची असेल किंवा काही कागदपत्रे तयार करायची असतील तर अशा कामाला प्राधान्य द्या. व्यवसाय-उद्योगात काही नवीन व्यक्तींकडून नवीन योजनेसंबंधी प्रस्ताव मांडले जातील. मात्र तुम्हाला खात्री असल्याशिवाय कोणतेही करार करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांचा एखादा मतलब साध्य करण्याकरिता तुम्हाला चुचकारून तुमच्याकडून काम करून घेतील. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेतल्यामुळे त्यांना तुमचे कौतुक वाटेल.
धनू हातातोंडाशी आलेली पैशाची कामे गती घेऊ लागल्यामुळे तुमची उमेद वाढेल. एखाद्या कामात फारसे यश मिळण्याची शक्यता नसेल, पण तुम्ही मात्र ते मिळविण्याकरिता जिद्दीच्या जोरावर प्रयत्न करत राहाल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढ-उतार आणि तुमची प्रबळ इच्छा या दोन्ही कारणांमुळे एखाद्या नवीन प्रोजेक्टचे नियोजन करावेसे वाटेल. पैशांची आवक वाढेल. नोकरीमध्ये अवघड कामात बाजी माराल. घरामध्ये एखाद्या विशेष जबाबदारीची चिंता मनाच्या कोपऱ्यात राहील.
मकर सर्व काही व्यवस्थित असूनही एखाद्या कामात विलंब झाला असेल तर ते काम आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचे प्रमाण चांगले असल्यामुळे विस्ताराच्या कल्पना तुमच्या मनात असतील. त्यासाठी कदाचित जादा भांडवलाची गरज असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी पूर्वी एखादी सवलत देण्याचे आश्वासन दिले असेल तर त्याची पूर्तता होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात सुधारणा होईल. घरामध्ये तुमच्या कुवतीनुसार तुम्ही प्रत्येक सदस्याला मदत करण्याचा प्रयत्न कराल.
कुंभ मानसिकदृष्टय़ा तुम्ही आता खूप आशावादी असाल, पण प्रत्यक्षात एखाद्या कामात हात घातल्यावर जे अडथळे येतील ते सोडविण्यात तुमचा बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. निराश न होता प्रयत्न चालू ठेवले तर हळूहळू कामाला चालना मिळायला सुरुवात होईल. व्यापार-उद्योगात तुमचे इरादे बुलंद असतील. केलेल्या कामाचे पैसे मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीच्या ठिकाणी एखादे काम इतरांना जमत नसेल तर वरिष्ठ ते काम अधिकाराने तुमच्यावर सोपवतील.
मीन पैशासंबंधी जी कामे २-३ आठवडय़ांपूर्वी हातातोंडाशी येऊन ठप्प झाली होती त्याला आता हळूहळू चालना मिळू शकेल. एक गोष्ट मिळविण्याकरिता दुसरे काही तरी गमवावे लागते याचा प्रत्यय देणारे हे ग्रहमान आहे. व्यापार उद्योगात एखादी नवीन संधी तुमचे लक्ष आकर्षित करेल. त्यामुळे तुमच्या कार्यपद्धतीत फेरफार करावे लागतील. घरामध्ये इतरांना मदत करायची नाही असे तुम्ही ठरवाल. अखेर तुमच्या उदार स्वभावाला पाझर फुटेल. मात्र अतिप्रेम करू नका.
विजय केळकर