01vijayमेष घरासंबंधी किंवा जुनी प्रॉपर्टी, जमीनजुमला वगरे प्रश्न लांबत आले असतील तर त्याला आता हळूहळू चालना मिळेल. जे काम करत आहात त्यामध्ये म्हणावा तितका प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याच्या बदल्यात दुसरे काम करावे, असे तुम्हाला वाटेल. व्यापार-उद्योगात तुम्हाला चकवा देण्यासाठी प्रतिस्पर्धी एखादी अफवा पसरवतील किंवा चकवा निर्माण करतील, पण तुम्ही शांत राहिलात तर त्याचा उपयोग होणार नाही. घरगुती प्रश्नामध्ये राग आवरा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्या.

वृषभ प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढवण्याकरता तुम्ही आता सज्ज असाल. परंतु त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या पशांची आणि व्यक्तींची साथ तुम्हाला कशी मिळते यावर सर्व काही अवलंबून असेल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरता पशाचे मोठे वायदे करावे लागतील, पण त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा विचार करून ठेवा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बदलत्या मूडमुळे तुम्ही थोडेसे कोडय़ात पडाल. घरामध्ये मोठय़ा खर्चाचे बेत ठरतील, पण मधूनच तुमचे मन कच खाईल.

मिथुन तुमचे घर आणि करिअर दोन्ही आघाडय़ांवर नवीन आव्हाने अचानक निर्माण झाल्याने तुम्ही थोडेसे गोंधळात पडाल. सध्या चालू असलेल्या कामामध्ये उलाढाल आणि प्राप्तीचे प्रमाण वाढविण्याकरिता नवीन योजना अमलात आणण्याच्या तयारीत तुम्ही असाल. नोकरीच्या ठिकाणी ‘आधी केले मग सांगितले’ असे धोरण ठेवले तर चांगले काम होईल, पण त्यासाठी आवश्यक ती वरिष्ठांची परवानगी घ्या. घरामधल्या एखाद्या प्रश्नामुळे तात्पुरती चिंता निर्माण होईल. अशा वेळी आपले कोण, परके कोण याची परीक्षा होईल.

कर्क सभोवतालच्या व्यक्तींच्या बाबतीत तुम्ही खूप संवेदनशील असता. त्यांच्या अडचणीला धावून जाता, पण या आठवडय़ात अशा व्यक्तींकडून थोडासा विचित्र प्रतिसाद मिळाल्याने कोडय़ात पडाल. व्यापार-उद्योगांत गिऱ्हाइकांना कामाची घाई असेल. पण तुम्ही थोडी जास्त मदत मागून घ्या. नाकरीमध्ये बदलीचे किंवा बदलाचे वारे वाहू लागतील. ठोस माहिती मिळाल्याशिवाय काही निर्णय घेऊ नका. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्टांशी बोलताना शब्द जपून वापरा.

सिंह ‘कालाय तस्म नम:’ हेच खरे. ज्या परिस्थितीतून सध्या तुम्ही चालला आहात ती परिस्थितीच आता तुम्हाला काही निर्णय घ्यायला भाग पाडेल. व्यापार-उद्योगात सकृद्दर्शनी सर्व काही ठीक वाटेल. बाहेरून बघणाऱ्यांना तुमच्याकडे भरपूर काम आहे असे वाटेल, पण त्या मानाने हातात पसे नसल्याने तुम्ही मात्र थोडेसे चिंतेत दिसेल. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी बोलताना जपून वागा. घरामधे जुन्या प्रॉपर्टीसंबंधी काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

कन्या एकीकडे नवीन संधी तुम्हाला खुणावत राहतील. तर दुसरीकडे दैनंदिन कामातील अडथळ्यांमुळे तुम्ही कोडय़ात पडाल. व्यापार-उद्योगात भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. पशाची आवक वाढण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची तुमच्यावर बरीच भिस्त असेल. त्यामुळे तुम्हाला कामाचा तणाव सहन होणार नाही. घरामध्ये जोडीदाराच्या किंवा आप्तेष्टांच्या वागण्या-बोलण्याचा राग येईल, पण तुम्ही शांत राहा. मित्रमंडळी आणि ओळखीच्या व्यक्तींवर विश्वास टाकू नका.

तूळ एखाद्या किरकोळ कारणावरून तुमचा मूड बिनसण्याची शक्यता आहे. त्याकडे जास्त लक्ष न देता तुमचे नेहमीचे काम तुम्ही सुरू ठेवा. व्यवसाय-उद्योगात नवीन आणि चांगली कमाई करून देणारी संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये तुम्ही भरपूर काम कराल, पण वरिष्ठांच्या एखाद्या सूचनेचे विस्मरण झाले तर त्यांना ते आवडणार नाही. घरामध्ये जोडीदाराशी छोटय़ामोठय़ा कारणावरून रुसवेफुगवे होतील, तुम्ही कोणतीही गोष्ट जास्त ताणून धरू नका. वयोवृद्ध व्यक्तीच्या स्वास्थ्याकडे लक्ष ठेवा.

वृश्चिक स्वभावत: तुम्ही चाणाक्ष आहात. सहसा कोणावरही अवलंबून राहत नाही. प्राप्त परिस्थितीमुळे तुम्हाला असेच करणे भाग पडेल. व्यवसाय-उद्योगात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहता त्यांनी आयत्या वेळी त्यांचा शब्द फिरवल्यामुळे पशाची पर्यायी सोय करावी लागेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या शब्दाला भुलून जाऊन कोणताही वेडावाकडा निष्कर्ष न काढता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. घरामध्ये जोडीदाराच्या एखाद्या प्रश्नामुळे तात्पुरती चिंता निर्माण होईल. वडिलधाऱ्या व्यक्तींबरोबर वादविवाद टाळा.

धनू काही बदल आणि घटना अशा असतात की ज्यावर आपले काहीच नियंत्रण नसते. जे पुढे आहे ते स्वीकारून काम करत राहावे लागते. या आठवडय़ात तुम्हाला असा अनुभव आल्याने ‘कालाय तस्म नम:’ हे मान्य करावे लागेल. व्यापार-उद्योगात ज्यांनी मदत करायचे आश्वासन दिले असेल त्यांनी शब्द फिरवल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. पण एखादा नवीन पर्याय मिळाल्याने तुमची गरज भागेल. नोकरीमध्ये तुमचे लक्ष केवळ तुमच्या कामावर केंद्रित करा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे तंत्र सांभाळणे जड जाईल.

मकर सहसा तुम्ही कोणाशीही हितसंबंध बिघडवत नाही किंवा विनाकारण कोणाला टाकून बोलत नाही. पण तुमच्या हातून गेल्या काही दिवसांमध्ये असे कळत-नकळत झाले असेल तर त्यातून त्रास संभवतो. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही कार्यक्रम मनाशी आखून ठेवले असतील तर संबंधित व्यक्तींची अडचण असल्यामुळे एखाददुसरा आठवडा थांबावे लागेल. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव कमी झाला असे वाटून तुम्ही सुस्कारा टाकता तोच वरिष्ठ नवीन कामाचे सूतोवाच करतील.

कुंभ यश आले की त्याच्याबरोबर थोडय़ाफार विवंचना येतात. व्यवसायउद्योगात विविध मार्गाने पसे येत राहिल्याने त्याची गुंतवणूक कशी करावी असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. ज्यांचा तुमच्याशी मतलब आहे अशा व्यक्ती तुम्हाला भूलभुलया निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामात केलेली चूक वरिष्ठांना आवडणार नाही. त्यावरून त्यांना बोलणी ऐकायला लागतील. नवीन नोकरीचे निर्णय एखादा आठवडा लांबवावा. घरामध्ये मातुल घराण्याशी निगडित काही प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील.

मीन तुमच्या आवडीच्या व्यक्तीसंबंधी एखादी अर्धवट बातमी कळल्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. व्यापार-उद्योगातील कामे पूर्ण करण्याकरिता तुमच्यामध्ये उत्साहाची एक नवी ऊर्मी निर्माण होईल. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तींची विश्वासार्हता पडताळून पाहा. नोकरीमध्ये तुमचे काम तुम्ही मन लावून कराल. पण वरिष्ठांनी त्यांचे धोरण बदलल्यामुळे तुमची धावपळ उडेल. व्यक्तिगत जीवनात कोणावरही एकदम विश्वास टाकू नका.
विजय केळकर

Story img Loader