सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या नवपंचमयोगामुळे मन अस्थिर होईल. भक्कम पािठबा व आधाराची आवश्यकता भासेल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेली कामे लांबणीवर पडतील. सहकारीवर्ग शिताफीने कामाचा फडशा पाडतील. मित्र-मत्रिणींमध्ये गरसमज निर्माण होतील. जोडीदारावरील जबाबदाऱ्या वाढतील. घरगुती प्रश्नांवर योग्य तोडगा काढाल. पाठीचा कणा व हाडांची पुरेशी काळजी घ्यावी.

वृषभ रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे अडचणींवर मात करण्याची तयारी दाखवाल. इच्छाशक्ती व मनोबल वाढवावे लागेल. नोकरी-व्यवसायात बुद्धिचातुर्य कामी येईल. सहकारीवर्गाची विशेष साथ मिळेल. जोडीदाराची कामे रखडतील. त्याला आपल्या आधाराची गरज आहे. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. ओटीपोटाचे आरोग्य सांभाळा. आíथक व्यवहार जपून करावेत. धोका पत्करू नका.

मिथुन चंद्र-बुधाच्या नवपंचमयोगामुळे माणसांची चांगली पारख कराल. समयसूचकतेमुळे मोठा फायदा होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. नवे करार यशस्वी होतील. सहकारीवर्गातील काहींचा विरोध पत्करावा लागेल. जोडीदाराच्या कामाच्या वेगात अडथळे निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आप्तजनांतील गरसमज लवकरात लवकर मिटवा. पडणे, मार लागणे यापासून जपा.

कर्क चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे स्त्रियांकडून लाभ होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी-व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधाल. आíथक गुंतवणुकीतून फायदा होईल. सहकारीवर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराची उदासीनता प्रयत्नपूर्वक दूर करावी लागेल. कौटुंबिक संमेलनात सहभागी व्हाल. साथीचे आजार होतील. वेळीच काळजी न घेतल्यास आजारपण ओढवेल.

सिंह चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे आनंदी व उत्साही असाल. ज्येष्ठांचे आशीर्वाद पाठीशी असतील. नोकरी-व्यवसायात देश-विदेशीचे करार काळजीपूर्वक हाताळा. सहकारीवर्ग कोर्टकचेरीच्या कामात मदत करेल. अचानकपणे शुभवार्ता कानी येईल. जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. हाडांची मजबुती वाढवा. सांधेदुखीला दूर ठेवा. औषधोपचार आवश्यक!

कन्या रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे मेहनतीचे फळ मिळेल. आनंदी व समाधानी राहाल. नोकरी-व्यवसायात जबाबदारी नेटाने पार पाडाल. सहकारीवर्गाची मदत वैयक्तिक पातळीवर उपयोगी ठरेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याचा सल्ला आपणास हितावह ठरेल. कुटुंबातील जुने वाद उकरून काढू नका. डोळ्यांची काळजी घ्या.

तूळ चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे उतावीळपणाने एखादा निर्णय घ्याल. उत्साहाच्या भरात अविचाराने पाऊल पुढे टाकाल. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करणे महत्त्वाचे! सहकारीवर्ग आपणास जागरूक करेल. जोडीदाराचे विचार पटले नाहीत तरी ते तूर्तास ऐकून घ्या. कौटुंबिक वातावरण हाताळताना संयमाची गरज भासेल. युरिन इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता!

वृश्चिक चंद्र-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे भावनांवर ताबा राहणार नाही. विचार भरकटण्याची शक्यता! नोकरी-व्यवसायात वैयक्तिक गोष्टी दूर ठेवून संस्थेचे हित लक्षात घ्यावे. सहकारीवर्गाची विशेष मदत होईल. जोडीदारासह खरेदीचा आनंद लुटाल. वैचारिक चर्चा कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्रपरिवार व नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. पित्तप्रकोप झाल्यास औषधोपाचार करावा.

धनू चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचमयोगामुळे मनाप्रमाणे स्वच्छंदी वागाल. आनंदी व उत्साही वातावरणात मन रमेल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. सहकारीवर्गाकडून चांगली मदत होईल. काम वेळेत पूर्ण होईल. आíथक गुंतवणूक लाभदायी ठरेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. कामाच्या ताणामुळे डोळे तळावतील, चुरचुरतील. काळजी घ्यावी.

मकर चंद्र-शनीच्या लाभयोगामुळे काटकसर करून चिकाटीने ध्येयपूर्तीकडे वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायात करार करताना सावधगिरी बाळगा. सहकारीवर्गाच्या लहानशा चुकीचे मोल भरावे लागेल. जोडीदाराच्या समंजसपणामुळे बऱ्याच गोष्टी चुटकीसरशी सुटतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता बाळगावी लागेल. आहारावर लक्ष ठेवा. हेळसांड करू नका.

कुंभ बुध-चंद्राच्या केंद्रयोगामुळे अनुभवातून शहाणपण शिकाल. कोणतीही गोष्ट करताना सर्व बाजूंनी त्याच्या परिणामांचाही विचार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. त्यांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. सहकारीवर्गाचे प्रश्न सोडवाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. वाजवी भावात खरेदी कराल. जोडीदारासह विचारांची देवाणघेवाण कराल. अतिश्रमामुळे पायात पेटके येतील.

मीन चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे उत्कर्ष साधाल. आíथक उन्नती होईल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात पत वाढेल. सहकारीवर्गाकडून मोठय़ा जबाबदाऱ्या पार पडतील. जोडीदाराला प्रवासाचे योग येतील. जुन्या मित्रपरिवारासह आठवणीत रममाण व्हाल. पाठीचा मणका व मज्जारज्जू सांभाळा.

Story img Loader