हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मेष : रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे संघर्ष करून गोष्टी साध्य कराव्या लागतील. अविचारीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात थोडे धीराने घ्यावे लागेल. वरिष्ठांचे म्हणणे मान्य करणे हितावह ठरेल. सहकारीवर्गाकडून नेमलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. गुडघा, पोटऱ्या यांच्या जवळील अस्थिबंधने (लिगामेंट) फाटण्याची वा तुटण्याची शक्यता आहे.
वृषभ : चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे घडलेल्या घटनेकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघाल. चौकस बुद्धी उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायात अभ्यासपूर्वक बोलण्याने इतरांवर छाप पाडाल. सहकारीवर्गाचे मोलाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराची पत वाढेल. मानसन्मान मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्रपरिवाराची मदत करण्यासाठी धावपळ करावी लागेल. रक्तवाहिन्या ताठरल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता!
मिथुन : चंद्र-हर्षलचा प्रतियोग होत असल्याने अति आत्मविश्वासामुळे अडचणीत येण्याची शक्यता! नोकरी-व्यवसायात निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा पुन्हा एकदा साकल्याने विचार करावा. सहकारीवर्गावर योग्य नियंत्रण ठेवावे लागेल. नव्या आíथक उलाढालींचा सध्या विचार करू नये. जोडीदाराची स्थिती नीट ऐकून व समजून घ्यावी लागेल. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करण्याचे प्रयत्न कराल. पडणे, झडणे, मार लागणे असे त्रास उद्भवतील.
कर्क : रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे शुभ फलप्राप्ती होईल. नावलौकिकात भर पडेल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. अडचणींवर मात करण्यासाठी सहकारीवर्ग चांगली साथ देईल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल. आíथक नियोजन भक्कम करा . मित्रमंडळींकडून पाठबळ मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. रक्तदाब व मधुमेह यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक!
सिंह : रजोगुणी शुक्र व सत्त्वगुणी गुरू यांच्या लाभयोगामुळे कला व विद्य्ोचा सुंदर मिलाफ दिसून येईल. नोकरी-व्यवसायात आपला मुद्दा व विषयाचे सादरीकरण प्रभावीपणे कराल. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. सहकारीवर्गावर हुकमत गाजवण्यापेक्षा त्यांच्या कलेने घ्याल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकत्र प्रवासाचा आनंद लुटाल. कुटुंबातील सदस्यांना प्रेमाच्या धाकात ठेवाल. मज्जास्नायू आखडतील.
कन्या : चंद्र-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे भावनांचा संघर्ष वाढेल. योग्य निर्णय घेणे जड जाईल. नोकरी-व्यवसायात कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. सहकारीवर्गाला कामाचा वेग वाढवण्यासाठी उद्युक्त कराल. जोडीदारासह घरासाठी विशेष खरेदी कराल. नातेवाईकांच्या मदतीला धावावे लागेल. अंतस्रावी ग्रंथींचे आरोग्य बिघडेल. वैद्यकीय मदत घ्यावी लागेल.
तूळ : गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे आत्मविश्वास वाढेल. आपला विद्याव्यासंग जोपासाल. नोकरी-व्यवसायात पूर्ण यंत्रणा चालवण्याची मोठी जबाबदारी स्वीकाराल. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सहकारीवर्गात कुरबुरी सुरू होतील. जोडीदाराच्या डोक्याचे ताप व व्याप वाढतील. कौटुंबिक वातावरण धावपळीचे राहील. शेजारी, ओळखीची मंडळी मदत करतील. पचनाच्या तक्रारी वाढतील.
वृश्चिक : चंद्र-बुधाच्या केंद्रयोगामुळे एखाद्या गोष्टीतील नकारात्मक बाजू प्रामुख्याने लक्ष वेधेल. जवळच्या व्यक्तींचे मन राखणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची नाराजी पत्करावी लागेल. मनाजोगते निर्णय घेण्यात अडथळे येतील. सहकारीवर्गाची थोडीफार मदत होईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकत्र प्रवासयोग संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबीयांच्या भावनांची कदर कराल. आरोग्य चांगले राहील.
धनू : चंद्र-हर्षलच्या नवपंचमयोगामुळे आपल्या मानसिक शक्तीला हर्षलच्या उत्साहाची जोड मिळेल. नावीन्यपूर्ण कामात स्वतला झोकून द्याल. नोकरी-व्यवसायातील कामाचा उरक वाढेल. सहकारीवर्गाची मदत कराल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी नवा उत्साह देऊन जातील. रक्तदाबासंबंधी काळजी घ्यावी.
मकर : चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. संघर्ष करून आपला हक्क सिद्ध कराल. नोकरी-व्यवसायात आíथक लाभ होतील. आपण मांडलेल्या मतांचा आदर केला जाईल. सहकारीवर्गावर विश्वासाने कामे सोपवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्याल. त्याला आíथक मदतही कराल. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी कराल. मणक्याच्या दुखण्याला योग्य व्यायामाशिवाय पर्याय नाही.
कुंभ : चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्यामाग्रे पुढे जाल. मदतीला धावणाऱ्या माणसांची कदर कराल. नोकरी-व्यवसायात कल्पकतेने नवे प्रकल्प आखाल. सहकारीवर्गाकडून मनाप्रमाणे काम करून घ्याल. अडीअडचणींवर मात कराल. जोडीदाराला कामानिमित्त देशी-विदेशी जाण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व समाधानी राहील. आरोग्य चांगले राहील.
मीन : गुरू-चंद्राच्या युतीयोगामुळे हाती घेतलेल्या कामात दिरंगाई झाली तरी यश मिळेल. सातत्य राखणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या शब्दाचा मान ठेवाल. ज्येष्ठ व्यक्तींचे अनुभवाचे बोल मार्गदर्शक ठरतील. सहकारीवर्गावर विसंबून राहू नका. जोडीदाराची समर्थ साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अपचनाच्या त्रासाकडे दुर्लक्ष नको.