सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका उत्तम बजावाल. अचूक मार्गदर्शनाने इतरांना लाभ होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरी-व्यवसायात दुर्लक्षित कामे-मुद्दे ऐरणीवर आणाल. सहकारीवर्ग सूचनांचे पालन करेल. जोडीदाराचे काही मुद्दे वादग्रस्त असतील. विचार ऐकून घ्या. प्रेमाने, सामंजस्याने समस्या सुटतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवणे आपली जबाबदारी आहे. ती योग्य प्रकारे पार पाडाल. आरोग्य चांगले राहील. धार्मिक यात्रा कराल.

वृषभ रवी-चंद्राच्या षडाष्टक योगामुळे अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. आयत्या वेळी मदत मिळणे कठीण होईल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. परिस्थितीचा अभ्यासपूर्वक विचार करावा. सहकारीवर्गाला विश्वासात घेऊन कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदाराच्या कामातील समस्यांमुळे त्याची चिडचिड वाढेल. परिणामी त्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता! एकमेकांना समजून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण ज्येष्ठांच्या मदतीने ठीक राहील.

मिथुन रवी-नेपच्यूनच्या युती योगामुळे संशोधन व तत्त्वज्ञान यात प्रगती कराल. साहित्य, लेखन, मनन, सादरीकरण यात गती मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. आपल्या कामाची पत सुधारेल. कामाचे सुनियोजन कराल. जोडीदारासह आवडता छंद जोपासाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात यश संपादन करेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. जबाबदाऱ्या वाटून घ्याल. उष्णतेमुळे त्वचेला खाज येणे, लाल चट्टे येणे असे त्रास उद्भवतील.

कर्क चंद्र व शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल. कोण काय म्हणेल याची चिंता करणार नाही. नोकरी-व्यवसायात मात्र वरिष्ठांचे म्हणणे पटत नसूनही मान्य करावे लागेल. आपल्या विचारांना किंमत नाही याचा स्वीकार करा. त्रास कमी होईल. तरीही सहकारीवर्गाच्या मदतीने आपले मत मांडाल. जोडीदारासह भविष्याचे आराखडे आखाल. कुटुंबातील सदस्यांची सेवाशुश्रूषा कराल. आतडय़ाचे दुखणे वाढेल. वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

सिंह चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे प्रियजनांसंबंधित भावना व व्यवहार यात संघर्ष होईल. विचारांना योग्य दिशा देणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात निडरपणे आपले मुद्दे मांडाल. सहकारीवर्गाच्या समस्यांना वाचा फोडाल. जोडीदाराच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवाल. एकमेकांचा आदर कराल. कुटुंबात शिस्तीला महत्त्व द्याल. व्यवस्थितपणाचा अतिरेक नको. आíथक गणिते योग्य प्रकारे सोडवाल. हाडांचे दुखणे डोके वर काढेल. औषधोपचार आवश्यक!

कन्या चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे नवी स्फूर्ती मिळेल. उत्साहाने कामाला लागाल. मदानी खेळात मन रमेल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा योग्य वापर कराल. गरजूंना साहाय्य कराल. सहकारीवर्गावर जबाबदाऱ्या सोपवाव्यात. दगदग, धावपळ कमी करावी. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. प्रवासाचे नियोजन कराल. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. पाठीचे दुखणे आल्यास विश्रांती व हलक्या व्यायामाशिवाय पर्याय नाही.

तूळ चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कामाचा उत्साह वाढेल. परंतु नको तिथे धाडस दाखवू नये. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा योग्य वापर कराल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्गाच्या अडचणींवर तोडगा काढाल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. खानपान, खरेदी यांचा मनसोक्त आनंद लुटाल. कौटुंबिक समस्या चच्रेने सोडवण्याचा प्रयत्न कराल. खांदे दुखणे, स्नायू आखडणे असे त्रास अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे लहान-मोठय़ा गोष्टीत नावीन्याची कास धराल. भावनिक िहदोळ्यांना आवर घालाल. नोकरी-व्यवसायात कामाच्या प्रकल्पाचे सादरीकरण चांगले होईल. सभेत प्रभाव पाडाल. सहकारीवर्गाची साथ लाभेल. हितशत्रूंवर वेळीच ताबा मिळवाल. जोडीदार त्याच्या समस्यांमुळे त्रस्त असेल. त्याला समजून घ्यावे. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. उष्णतेचे व उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील. औषधोपचार घ्या.

धनू चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भविष्याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार कराल. नोकरी-व्यवसायात नवे करार स्वीकाराल. कामानिमित्त लहानमोठा प्रवासयोग संभवतो. सहकारीवर्गाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे नुकसान सहन करावे लागेल. बौद्धिक कसोटीत यश मिळवाल. जोडीदाराचे रेंगाळलेले काम पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घसा सुजणे, डोके दुखणे, मार लागणे यांपासून सावधान! आजार अंगावर काढू नका. औषधोपचार आवश्यक!

मकर चंद्र-हर्षलच्या प्रतियोगामुळे चंचलता वाढेल. मनातील विचारांना स्थिरता द्यायला हवी. टोकाच्या भूमिका न घेता विचारविनिमय करून समस्या सोडवणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात नवा दृष्टिकोन मांडाल. कार्याची पूर्तता करण्यासाठी मेहनत घ्याल. वरिष्ठांची सहमती मिळवाल. सहकारीवर्ग अपेक्षेनुसार वागणार नाही. पर्यायी व्यवस्था तयार ठेवाल. नातेवाईक व मित्रांच्या मदतीला धावून जाल. त्वचाविकार, अ‍ॅलर्जी, फोड येणे असे त्रास होण्याची शक्यता.

कुंभ रवी व गुरू या शुभ ग्रहांच्या लाभ योगामुळे ज्येष्ठ मंडळींचा पािठबा मिळेल. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. संस्थेच्या हिताचे निर्णय घ्याल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारीवर्गाला चांगले मार्गदर्शन करून त्यांचा उत्कर्ष साधाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. परीक्षेच्या दृष्टीने आगेकूच कराल. आतडय़ाचे आरोग्य सांभाळा. अंतस्रावी ग्रंथी दुर्बल होतील.

मीन गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे रखडलेली कामे गतिमान होतील. योग्य दिशेने आगेकूच  कराल. अचूक निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. त्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. आपली कर्तव्ये पार पाडाल. हक्कांसाठी लढाल. जोडीदाराला चांगली साथ द्याल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवाल. पाठीचा मणका दुखावेल. उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण करावे. आहारात योग्य बदल करावेत.