सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी-चंद्राचा लाभ योग हा भाग्यकारक योग आहे. रवीचा अधिकार आणि चंद्राची नावीन्याची आस यामुळे नव्या कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात कामकाजाच्या नव्या-जुन्या पद्धतीचा समन्वय साधाल. वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठी जबाबदारी पेलू शकाल. जोडीदाराच्या आनंदात सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. उष्णतेमुळे त्वचेचे विकार बळावतील.
वृषभ चंद्र-शुक्राचा युती योग हा कौशल्यवर्धक योग आहे. मनाची चंचलता वाढेल. कला, छंद यात मन रमवावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून हवे तसे पाठबळ मिळाल्याने नव्या उमेदीने आगेकूच कराल. सहकारी वर्गासह काही गोष्टी आगाऊ ठरवून घ्याल. त्यावर अवलंब करणे सोपे जाईल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. त्याला प्रवास योग संभवतो. मुलांच्या कष्टाला पुष्टी द्याल. उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपावे. खाज येणे, जळजळ होण्याची शक्यता!
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा मानसिक समतोल राखणारा योग आहे. नव्या उपक्रमांना उत्तेजन मिळेल. नोकरी-व्यवसायात मात्र मेहनतीची कदर केली जाणार नाही. धीर सोडू नका. सहकारी वर्गाचा सल्ला लाभदायक ठरेल. कौटुंबिक वाद चच्रेने मिटवाल. जोडीदाराच्या कामकाजातील अडचणी नव्या स्वरूपात समोर येतील. मुलांच्या समंजसपणाचे कौतुक वाटेल. पचन आणि उत्सर्जन संस्था सांभाळाव्यात. पथ्य पाळणे आवश्यक!
कर्क चंद्र-बुधाचा लाभ योग हा भावनेला बुद्धीची जोड देणारा योग आहे. नातीगोती सांभाळणारा चंद्र आणि व्यावहारिक बंध जपणारा बुध एकमेकांना चांगली साथ देतील. नोकरी-व्यवसायात लहान-मोठे प्रवास कराल. आपली मते ठामपणे मांडण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाची मदत मिळाल्याने कामाचा भार हलका होईल. जोडीदाराच्या ज्ञानाचा त्याच्या कार्यक्षेत्रात उपयोग होईल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
सिंह चंद्र-मंगळाचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. चंद्राची कलात्मकता आणि मंगळाचे तंत्रज्ञान यांचा एकमेकांना लाभ होईल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. समाजात नावलौकिक कमवाल. सहकारी वर्गाला मदत देऊ कराल. आíथक बाजू सावरून धराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. जुन्या आठवणींमध्ये मन रमेल. कौटुंबिक बाबींचा निर्णय विचारपूर्वक घ्याल. मुलांची कला-क्रीडा यांची आवड जोपासाल. रक्ताभिसरणासंबंधित प्रश्न उद्भवतील.
कन्या मंगळ-बुधाचा युतीयोग हा धाडसी योग आहे. मंगळाचे धर्य आणि बुधाची बुद्धिमत्ता यांचा योग्य समन्वय साधला जाईल. नोकरी-व्यवसायात वैचारिक मतभेदांना सामोरे जावे लागेल. शब्द जपून वापरा. वरिष्ठांचा पािठबा सहज मिळणे कठीण! सहकारी वर्गाला आवश्यक त्या सूचना सुस्पष्टपणे द्याव्यात. गरसमज टाळावा. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. मुलांची मेहनत फळास येईल. अतिविचारांनी मानसिक ताण जाणवेल.
तूळ चंद्र-शनीचा लाभ योग हा मेहनतीला यश देणारा योग आहे. चंद्राच्या चंचलतेला शनीच्या शिस्तीचा लगाम बसेल. नोकरी-व्यवसायात सातत्य टिकवल्यामुळे अनेक लाभ मिळतील. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सहकारी वर्गाला नुकसान होण्यापासून वाचवाल. रखडलेली कामे मार्गी लावताना अतिरिक्त ऊर्जा खर्च होईल. जोडीदाराच्या कामात ढवळाढवळ नको. मुलांची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. पोटाचे विकार बळावतील.
वृश्चिक रवी-चंद्राचा लाभ योग हा भाग्यकारक योग आहे. हाती घेतलेल्या कामामध्ये सफलता मिळवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध कराल. सहकारी वर्गाला त्यांच्या क्षमतेनुसार योग्य ती मदत पुरवाल. सामाजिक बांधिलकी जपाल. जोडीदाराच्या आवडीनिवडी पूर्ण कराल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मित्रमंडळींच्या सहवासात मन रमेल. उष्णतेचा त्रास दुर्लक्षित करू नका.
धनू रवी-बुधाचा युती योग बुद्धीला चालना आणि आव्हान देणारा योग आहे. संकल्पनांचे आरेखन आणि आयोजन उत्तम कराल. नोकरी-व्यवसायात आपले अधिकार योग्य प्रकारे उपयोगात आणाल. गरजवंताला मदत कराल. आíथक घडामोडी चांगल्या हाताळाल. जोडीदाराच्या साथीने घरातील महत्त्वाच्या निर्णयाला संमती द्याल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतील. नातेवाईकांमध्ये कौतुक होईल. अॅलर्जी आणि त्वचाविकार यांवर औषधोपचार घ्यावा लागेल.
मकर चंद्र-गुरूचा केंद्र योग हा मार्गदर्शक योग आहे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला हितावह ठरेल. नोकरी-व्यवसायात नव्या प्रकल्पासाठी आपले नाव विचारात घेतले जाईल. सर्व तयारीनिशी सज्ज राहा. सहकारी वर्गासह सूर चांगले जुळतील. जोडीदाराच्या कामकाजाचा व्याप वाढेल. मेहनत आणि जिद्द फळास येईल. मुलांच्या बाबतीतील चिंता मिटेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. पचन आणि श्वसन यांचे आजारविकार दुर्लक्षित करू नका.
कुंभ चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा नावीन्यवर्धक योग आहे. रोजची कामे नव्या दृष्टिकोनातून बघाल. नोकरी व्यवसायात हाती घेतलेले प्रकल्प अधिक जोमाने पूर्णत्वाला न्याल. वरिष्ठांचा मान ठेवून आपले मत सभेपुढे मांडाल. सहकारी वर्गाकडून शिताफीने कामे करून घ्याल. जोडीदाराला समजून घ्यावे लागेल. शब्दाने शब्द वाढवू नका. मुलांच्या अडचणी चच्रेने सोडवाल. कामाचा ताण न घेता आपल्या छंदामध्ये मन रमवाल. व्यायाम आवश्यक!
मीन गुरू-चंद्राचा लाभ योग हा मार्गदर्शक योग आहे. नवे अनुभव गाठीशी येतील. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. नोकरी-व्यवसायात ओळखीमुळे कामे होतील. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सहकारी वर्गाच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. मोठय़ा जमावापुढे माघार घ्यावी लागेल. धीर सोडू नका. जोडीदाराची भक्कम साथ लाभेल. मुलांच्या समयसूचकतेचे कौतुक कराल. ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम उपयुक्त ठरेल.