वेगवेगळ्या आजारांवर घरच्या घरी करायचा औषधोपचार, पथ्ये, कुपथ्ये यांविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तरच अनावश्यक गोष्टी आणि आजार टाळले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

* व्रण, जखमा, मधुमेही, महारोगी, जुनाट जखमा
पथ्य : सुरक्षित व उकळून गार केलेले ताजे पाणी, शरद ऋतूतील पाणी, गोड ताक, नारळपाणी, धने-जिरे पाणी, गाईचे किंवा शेळीचे दूध.
ज्वारीची, सातूची भाकरी, नाइलाज म्हणून सुकी चपाती. क्वचित तांदूळ भाजून मर्यादित प्रमाणात भात, मूग व मुगाची डाळ, क्वचित तूरडाळ. मधुमेह नसल्यास नाचणी चालेल. ज्वारी किंवा राजगिऱ्याच्या लाह्य.
सुरण, दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, घोसाळे, नवलकोल, कोथिंबीर, तांबडा माठ, चाकवत, मेथी, राजगिरा, डोंगरी आवळा, वेलची केळी, पपई, वाफारून सफरचंद, मनुका, सुके अंजीर. (मधुमेह लक्षात घेऊन तारतम्याने वापर)
खात्रीचा पाव भाजून टोस्ट करणे. केमिकलविरहित गूळ.
अन्नपचन होईल एवढे सकाळी व रात्रौ फिरणे आवश्यक आहे. खूप खोलवर किंवा गंभीर जखम असल्यास पूर्ण विश्रांती. सायंकाळी लवकर व कमी जेवण. वेळेवर व पुरेशी झोप.
कुपथ्य : खराब पाणी, मलईयुक्त दूध, दही, दह्यचे पनीरसारखे जड पदार्थ, चहा-कॉफी, कोल्डड्रिंक इत्यादी कृत्रिम पेये.
गहू, गव्हाचे जड पदार्थ, वाटाणा, हरभरा, चवळी, उडीद, मटकी, साबुदाणा, वरई, नवीन तांदळाचा भात.
बटाटा, कांदा, रताळे, गाजर, बीट, गवार, अळू, पालक, मिरची, पापड, लोणचे, तिखट, खारट, आंबट पदार्थ, मीठ, आंबवलेले व खूप तेलकट पदार्थ, तुपकट पदार्थ, मिठाई, फरसाण, डालडायुक्त पदार्थ. मांसाहार. फाजील श्रम, खूप वजन उचलणे, ताकदीच्या बाहेर काम, दुपारी झोप, रात्रौ जागरण, चिंता, नैसर्गिक वेगांचा अवरोध, धूम्रपान, मद्यपान.

* ज्वर, कफ, वात व कफवातप्रधान, फ्ल्यू, थंडी वाजून ताप, मलेरिया, ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया पॅच इत्यादी विकारांतील ताप
पथ्य : उकळून गार केलेले पाणी, वाळा, नारारमोथा, सुंठ, चंदन, धने, तुळस इत्यादी उकळून सिद्धजल, साबुदाणा वा तांदळाची पातळ जिरेयुक्त पेज,पातळ चहा.
ज्वारी, बाजरी, जुन्या तांदळाचा पातळ भात, मुगाची खिचडी, नाचणीचे सत्त्व, लाह्य व लाह्यंचे उकळलेले पाणी. उकडून सर्व फळभाज्या व पालेभाज्या, मनुका.
मोसंब, खात्रीचे गोड डाळिंब, डोंगरी आवळा, मिरी, तुळस, जिरे, लसूण, धने, गवती चहा, दालचिनी, लवंग, हिंग, ओवा, यांचा तारतम्याने वापर.
वारे लागणार नाही पण मोकळी हवा असा निवास, पूर्ण विश्रांतीत राहणे. वेळेवर पण भूक ठेवून जेवण. पुरेसे पांघरूण, कपडे वेळच्या वेळी बदलणे, घाम आल्यास पुसणे, तारतम्याने अंग पुसणे व आंघोळ करणे. मलमूत्राचे वेग वेळच्यावेळी करणे. मीठ, हळद गरम पाण्यच्या गुळण्या.
कुपथ्य : शंकास्पद व खराब पाणी, गार पाणी, कोल्डड्रिंक, फ्रिजमधील पदार्थ, दही, दूध, तूप, लोणी, ज्यूस इ.
गहू, मका, उडीद, वाटाणा, हरभरा, मटकी ,चवळी, पोहे, चुरमुरे, रव्याचे विविध पदार्थ, भूक नसताना जेवण, रात्रौ उशिरा जेवण, जेवणावर जेवण.
बटाटा, रताळे, शिंगाडा, कोबी, टोमॅटो, काकडी, बिया असलेले वांगे. हिरव्या सालीची केळी, पेरू, चिक्कू , संत्रे, मोसंबी, अंजीर, द्राक्षे.
फरसाण, बेकरी पदार्थ, डालडा, मिठाई, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, शंकास्पद पदार्थ, परान्न.
कोंदट जागेत राहणी, गार वारे, वातानुकूलित राहणी, अतिश्रम, बैठे काम, जागरण, दुपारी झोप, डायरेक्ट पंख्याचे वारे. साथीचे विकार व संसर्गजन्य रुग्णांशी संबंध.

* ज्वर, पित्तप्रधान, तीव्र ज्वर, चक्कर, ज्वर उतरताना घाम न येणे, भोवळ, फिरल्यासारखे होणे
पथ्य : उकळून गार केलेले पाणी, गाईचे दूध, ताजे ताक, नारळपाणी, धने-पाणी, कोकम-सरबत, साखरपाणी, लाह्यसिद्ध जल.
ज्वारी, नाचणी, जुना तांदुळ, तांदळाची पेज, पातळ भात, मूग, मुगाचे कढण, भाताच्या, राजगिरा व ज्वारीच्या लाह्य. उकडून सर्व पालेभाज्या व फळभाज्या.
तारतम्याने ताजी फळे, विशेषत: डोंगरी आवळा, गोड द्राक्षे, अंजीर, ताडफळ, गोड डाळिंब, मोसंब, सफरचंद, मनुका, मोरावळा, धने, जिरे, सुंठ, आले, कोकम यांचा युक्तीने वापर.
शोष पडणार नाही असा द्रव, आहार, चंदनगंध पाणी.
वेळेवर भोजन, पुरेशी विश्रांती व झोप; सुखावह अंथरूण, आवश्यक तर पंखा वा मोकळी हवा.
तळपाय, तळहात, कपाळ, कानशिले यांना तूप जिरवणे.
कुपथ्य : गरम पेये, दही, कृत्रिम पेये, चहा-कॉफी इ.
गहू, मका, उडीद, वाटाणा, हरभरा, चवळी, मटकी, वाल, तूर, मसूर. बटाटा, करडई, अंबाडी, मुळा, िडगऱ्या, पालक, मेथी, शेपू, अळू. अननस, पपई केळे, आंबा.
लसूण, मिरची, लोणचे, पापड, आंबवलेले व बेकरीचे पदार्थ, फरसाण, मिठाई, शिळे अन्न, जेवणावर जेवण, उपाशी राहणे, उशिरा जेवण, कदान्न, मांसाहार कोंदट हवा, अपुरी झोप, जागरण, खूप जाड उशी घेणे. चिंता, रागराग, विचार, कानाला त्रास होणे, आरडाओरडा, फाजील बडबड. घाम येईल व ताप उतरेल अशा समजुतीने घाम काढणारी, अ‍ॅस्पिरिन किंवा त्रिभुवनकीर्तीसारखी चुकीची औषधे घेणे. मशेरी, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान.

* दौर्बल्य, स्वप्नदोष, शुक्राणू-विकार, नपुंसकत्व, थकवा
पथ्य : सुरक्षित पाणी, खात्रीचे कसदार दूध, दही, तूप, लोणी, पुरेशी साखर असलेली लिंबू, कैरी किंवा कोकम सरबते, ताज्या फळांचे रस, मध.
गहू, उडीद, हरभरा, मूग, पोहे, मका, मक्याच्या लाह्य, शेंगदाणे, खोबरे, ओल्या खोबऱ्याचे दूध, सुका मेवा, घरगुती टोस्ट, खात्रीची व दर्जेदार तुपाची मिठाई, शिंगाडा, डिंक, आळिव, राजगिरा लाडू, कडधान्यांच्या उसळी, भिजवून सबंध कडधान्ये, सर्व फळभाज्या व पालेभाज्या, लसूण, कांदा, केमिकलविरहित गूळ.
आंबा, केळी, चिकू, अंजीर, फणस, डोंगरी आवळा, पपई, द्राक्षे, अननस.
मोकळी हवा, माफक व नियमित व्यायाम, वेळेवर जेवण, रात्रौ लवकर व पुरेशी झोप. मलमूत्रांचे वेग वेळेवर करणे.
कुपथ्य : शिळे व खराब पाणी, ताक, शेळीचे दूध, चहा व इतर कृत्रिम थंड व ऊष्ण पेये, नारळाचे पाणी, शहाळ्याचे पाणी.
बाजरी, मटकी, कुळीथ, सातू, नाचणी, चुरमुरे, भडंग, हिंग, मोहरी, मेथ्या, फाजील मीठ, आंबट, खारट व खूप तिखट पदार्थ, आंबवलेले पदार्थ, करडई, अंबाडी, अळू, मेथी, व्हिनेगार, शिरका, लोणची.
कोंदट हवा, व्यायामाचा अभाव, दुपारी झोप, जागरण, जेवणावर जेवण, कदान्न जेवण, निकृष्ट जेवण, जेवणाची आबाळ, बैठे काम, क्ष-किरण यंत्राशी वारंवार संबंध.
मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

* पांडुता, दौर्बल्य, अ‍ॅनेमिक कंडिशन, रक्ताचे अ‍ॅनिमियाचे विविध प्रकार (थॅलसेमिया, ल्युकेमिया इ.)
पथ्य : खात्रीचे व सुरक्षित स्वच्छ पाणी, खात्रीचे दूध, दही, लोण्यासकट ताक, तूप, मध, नारळपाणी, तांदळाची पातळ जिरेयुक्त पेज, भरपूर साखर असलेली विविध सरबते, ताज्या फळांचे ताजे ज्यूस, खजूर-जिरे-गूळसरबत; शिंगाडा, लापशी, गव्हाच्या सत्त्वाची खीर.
सर्व धान्ये व टरफलासकट कडधान्ये, सोयाबिन, ओट्स इ. हातसडीचा व जुना तांदूळ.
भरपूर फळभाज्या व पालेभाज्या तसेच ऋतुमानानुसार फळे, डोंगरी आवळा, सुकामेवा, खोबरे, खसखस, जिरे, मिरी, सुंठ, आले, लसूण, पुदिना, कोथिंबीर, ओली हळद, केमिकलविरहित गूळ.
सात्म्य असल्यास योग्य तो मांसाहार.
मोकळी व कोरडी हवा, किमान व्यायाम, सूर्यनमस्कार, दीर्घश्वसन व प्राणायाम, वेळेवर जेवण, रात्री जेवणानंतर किमान पंधरा मिनिटे फिरणे व वेळेवर झोप, मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे.
कुपथ्य : खराब व शंकास्पद पाणी, अकारण गार पाणी, कृत्रिम पेये, चहा व अन्य कोल्डड्रिंक, शिळे ज्यूस, पातळ ताक, मटकी, सातू, कदान्न, खूप पॉलिश केलेला तांदूळ.
बटाटा, राताळे, करडई, अंबाडी, शिळी व चव उतरलेली फळे, मिरची, लोणचे, पापड, आंबवलेले व खूप डालडायुक्त फ रसाण, मिठाई व इतर खाद्यपदार्थ, बेकरीचे पदार्थ, परान्न.
शंकास्पद व सवय नसताना मांसाहार, शिळे मांस.
कोंदट हवा, ओल, गार वाऱ्याशी सतत संपर्क, ताकदीच्या बाहेर काम व त्यामानाने कमी पोषण, चिंता, जागरण करणे, फाजील बडबड, ताणतणाव, दुपारी झोप, रात्रौ जागरण, मलमूत्र वेग अडवणे, व्यायामाचा अभाव, बैठे काम, कृत्रिम धाग्याचे कपडे, मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

* प्राणवह स्रोतसांचे विकार, सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा, आवाज बसणे, उर:क्षत, क्षय, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस इ.
पथ्य : उकळून गार केलेले ताजे पाणी, सुंठपाणी, तुळसपाणी, सुंठ, लसूणयुक्त ताकाची कढी, जिरेचूर्णयुक्त ताक, कुळथाचे कढण, आवश्यक असल्यास सकाळी दुग्धसेवन सुंठचूर्णयुक्त, तांदूळ, मूग, कुळीथ, तूर, मसूर, सातू, नाचणी.
दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, कार्ले, टिंडा, परवल, डिंगऱ्या, सुरण, घोसाळे, मुळा, शेवगा, शेपू, चाकवत, पालक, तांदुळजा, माठ.
अननस, पोपई, वाफारून सफरचंद.
पुदिना, आले, लसूण, ओली हळद, तुळसपाने, मिरी, जिरे, सुंठ, हिंग, केमिकलविरहित गूळ.
मोकळी हवा तसेच गार व पूर्वेकडील वाऱ्यापासून संरक्षण, मफलर, स्कार्फ, मास्क, रुमाल, गरम व उबदार कपडे व आंथरूण, शाल इ. सायंकाळी सूर्यास्ताअगोदर व कमी जेवण, मीठ-हळद-गरम पाण्याच्या गुळण्या. मलमूत्रांचे वेग वेळेवर करणे.
कुपथ्य : खराब व शिळे पाणी, दही, ताक, गार पाणी, फ्रिजमधील पदार्थ, ज्यूस, अकारण चहा-कॉफीसारखी पेये, लस्सी कोल्डड्रिंक.
गहू, उडीद, वाटाणा, हरभरा, चवळी, नवीन तांदूळ, टोमाटो, काकडी, बीट, हिरव्या सालीची केळी, चिक्कू, मोसंबी, संत्री, बोरे, करवंद, जांभूळ, डाळिंबे, शिकरण, फ्रुट सॅलड. वारंवार जेवण. भूक नसताना जेवण. बेकरीचे पदार्थ, फरसाण. कोंदट हवा, समोरून येणारे गार वारे, डायरेक्ट पंख्याचे वारे, वातानुकूलित राहणी, जलाशयाजवळ निवास, ओल. दूषित वायू, टायर, उदबत्त्या इत्यादींचे उग्र वास, गर्दी, धूळ, सिनेमा किंवा नाटय़गृहांत दीर्घकाळ बसणे.
दिवसा झोप, रात्रौ जागरण, फाजील बडबड, इनहेलर पंप, मशेरी, तंबाखू, सिगारेट, बिडय़ा, मद्यपान.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com 