हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गुलाम अहमद ऊर्फ बाबा चिश्तींचं नाव निघताच अनेकांना संगीतकार ख़य्यामसाहेब आठवतात. ख़य्यामसाहेब गतदिवसांच्या आठवणीत हरवले की लाहोरमध्ये आपण बाबा चिश्तींचे साहाय्यक म्हणून काम करताना सिनेसंगीताचे धडे कसे गिरविले हे सांगताना थकत नाहीत. शिष्य म्हणून ख़य्यामसाहेबांना गुरूविषयी जितका नितांत आदर वाटतो जितकाच गुरू या नात्याने बाबा चिश्तींनाही आपल्या या शिष्योत्तमाचा अपार अभिमान वाटतो. या दोघांची भेट कशी झाली तो किस्सा मोठा उद्बोधक आहे.
संगीताच्या वेडाने झपाटलेले मोहंमद ज़्ाहूर ख़य्याम हाश्मी पंजाब प्रांतातल्या जालंधरजवळच्या राहों या गावचे. संगीताची वाट धुंडाळीत ते दिल्लीला आले आणि सुरुवातीला संगीतकार पं. अमरनाथ (हुस्नलाल-भगतराम यांचे थोरले बंधू) यांचे शागीर्द म्हणून रुजू झाले.
पं. अमरनाथ जेव्हा नसतील तेव्हा हुस्नलाल-भगतराम या संगीतकार द्वयींकडे शिकायला मिळायचं. या तिन्ही बंधूंकडून त्यांच्या सिनेसंगीताचा पाया पक्का झाला. मुंबईच्या सिनेसृष्टीत नशीब अजमावलं, पण ‘पोरसवदा’ वय असल्याने यश मिळेना. १९४२ च्या सुमारास ख़य्याम लाहोरला आले. तेथे बाबा चिश्तींना भेटावं असं त्यांना वाटू लागलं. जी. ए. चिश्तींचा त्या वेळी सिनेइंडस्ट्रीत चांगलाच दबदबा होता. बाबांचा शोध घेत आपल्या मित्रासह ख़य्याम लाहोरच्या मॅक्लॉड रोडवरील एका स्टुडिओत पोहोचले. तिथे एका चित्रपटाच्या कुठल्याशा तरी गाण्याची रिहर्सल सुरू होती. खुद्द बाबा चिश्ती पियानोवर आपल्या म्युझिशियन्सना ‘इंटरल्यूड’चे ‘म्युझिक पीसेस’ समजावून सांगत होते. ख़य्याम एका कोपऱ्यात तहानभूक हरपून रिहर्सलमध्ये तादात्म्य पावले होते. अचानक एके ठिकाणी बाबा चिश्तींना नुकताच सांगितलेला ‘पीस’ आठवेना. वादकांना तो सांगता येईना. त्यांच्या साहाय्यकाच्यादेखील तो लक्षात राहिला नव्हता. आपल्या कामात ‘पर्फेक्शनिस्ट’ असलेले बाबा तो ‘तुकडा’ आठवल्याशिवाय पुढं जाईनात. रिहर्सलचा स्वर न् स्वर कानात साठविणाऱ्या ख़य्यामसाहेबांना तो पीस ‘लख्ख’ आठवत होता. त्यांनी तो सांगण्याची परवानगी मागितली आणि शीघ्रकोपी बाबा एका आगंतुकाला आपल्या ‘रिहर्सल’मध्ये पाहून जाम खवळले. ‘‘तू कोण? या ठिकाणी कशासाठी आलास? इथं यायची परवानगी तुला कुणी दिली?’’ यांसारखी प्रश्नांची सरबत्ती झडल्यावर ख़य्यामसाहेबांनी विनम्रपणे सांगितले, ‘आपका क़द्रदान हूं, आपके दीदार के लिए आया हूं. आप इजाज़्ात दे तो मैं आपको वह ‘पीस’ अभी बता सकता हूं.’’
‘‘सुनाओ.’’’ बाबाजींनी साशंक मनाने अनुज्ञा दिली. ख़य्यामसाहेबांनी तत्क्षणी तो ‘पीस’ त्यांना सांगितला. बाबाजी विलक्षण प्रसन्न झाले. ख़य्यामजींची भीड आता चेपली होती. बाबाजींच्या अनुमतीने त्यांनी त्या ‘म्युझिक पीस’ची ‘सरगम’ म्हणजेच ‘नोटेशन’सुद्धा सांगितलं.
‘‘भई, कमाल है! तुमने इतनी कम उम्रमें ये सब कहाँसे सीखा है?’’ बाबाजींनी न राहून विचारलं. ख़य्यामजींनी मोठय़ा अदबीनं
पं. अमरनाथ, हुस्नलाल व भगतराम यांची नावे सांगितली. बाबाजींच्या चय्रेवर पंजाबी परंपरेचा अभिमान दाटून आला. त्यांनी त्याच क्षणी ख़य्यामना आपलं साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ दिली. राहण्या-जेवणाची सोय मोफत होणार होती; फक्त तूर्तास मानधन मिळणार नाही, अशी अट होती. एवढय़ा महान संगीतकाराकडे काम करायला मिळतंय या आनंदापोटी ख़य्याम यांनी ही अट आनंदाने मान्य केली. वर्षभर ख़य्यामसाहेब बाबांचे साहाय्यक होते. या काळात त्यांना बाबांकडून ऑर्केस्ट्रेशनमधील खुब्या, वाद्यमेळ जुळवणीचे कौशल्य, हार्मनी, ऑब्लीगाटोज, बॅक्ग्राउंड म्युझिक अशा सिनेसंगीताशी संबंधित अनेक तांत्रिक बाबी, ज्या पुढे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडल्या; शिकून आणि समजावून घेता आल्या.
एकदा सुटी घेऊन ख़य्याम गावी आले असता पसे कमवीत नाही म्हणून घरातल्या मंडळींनी फैलावर घेतलं. त्यामुळे ख़य्याम निराश झाले. ते १९४३ साल होतं. दुसरं जागतिक महायुद्ध ऐन भरात होतं. सन्यभरती धडाक्यात सुरू होती. ख़य्याम तिरीमिरीत उठले आणि सरळ फौजेत जाऊन भरती झाले. १९४५ साली युद्ध थांबलं. सन्यातून निवृत्ती घेऊन ते परतले. अंगात लष्कराची शिस्त बाणली होती व वक्तशीर कामाची सवय झाली होती. बऱ्यापकी आíथक स्थर्य लाभलं होतं. ख़य्यामजींच्या संगीताच्या वेडानं उचल खाल्ली आणि ते पुन्हा बाबा चिश्तींचे साहाय्यक म्हणून त्यांच्या आश्रयाला गेले.
बलदेव राज ऊर्फ बी. आर. चोप्रा लाहोरमध्ये ‘सिने-हेरॉल्ड’चे प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्यापासून बाबा चिश्तींकडे त्यांची उठ-बस होती. १९४७ साली त्यांनी सिनेपत्रकारिता सोडली आणि त्याच वर्षांत आय. एस. जोहरच्या कथेवर ‘चाँदनी चौक’ नावाचा चित्रपट बनवायला घेतला. संगीताची जबाबदारी बाबा चिश्तींवर सोपविली होती. चोप्रासाहेब नित्यनेमाने सकाळी स्टुडिओत येऊन बसत. चाललेल्या कामावर त्यांची करडी नजर असे. संगीत विभागात बाबाजींचे साहाय्यक म्हणून ख़य्याम यांना अथक परिश्रम करताना चोप्रासाहेब नेहमी पाहात. एकदा पगारवाटपाच्या दिवशी नेमके चोप्रासाहेब तिथे हजर झाले. प्रत्येकाला मोबदल्याची पाकिटे मिळाली, पण ख़य्यामना काहीच मोबदला दिला गेला नाही. चोप्रांनी बाबाजींना विचारलं, ‘‘बाबाजी, मनूं इक बात दस्सो जी आप, सारे बंदेनूं आप लिफाफे दित्तां. इस मुंडेनूं तनख़्वाह क्यूं नहीं भई? जबकी वो यहाँ सबसे ज़्यादा काम करदां सी.’’ त्यावर बाबाजी हसून म्हणाले. ‘‘बंदा अभी सीख रहा है. इसलिए मुआवज़ा शुरू नही किया; आप मालिक हो, आप तनख़्वाह देना चाहो तो मुझे कोई ऐतराज़्ा नहीं.’’ अध्र्या तासात मॅनेजरने ख़य्यामच्या हातात एक लिफाफा आणून दिला. त्यात कंपनीतर्फे एकशे पंचवीस रुपये दरमहा पगारावर त्यांची नेमणूक केल्याचं पत्र होतं. ही रक्कम इतर कलावंतांना मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा किती तरी जास्त होती. ख़य्यामसाहेब सांगतात, ‘‘मला चोप्रासाहेबांबरोबर कधी काम करायची संधी मिळाली नाही; परंतु माझ्या उमेदवारीच्या काळातला हा प्रसंग कायमचा मनात कोरला गेला आहे.’’
चिश्तीसाहेब काही काळ कलकत्त्याला स्थिरावले होते. ख़य्यामसुद्धा बरोबर होते. आपल्या शिष्यावाचून त्यांना अजिबात करमत नसे. मात्र फाळणीनंतर परिस्थिती बदलली. वाटा बदलल्या. इरादे बदलले. ध्येयांची फारकत झाली. बाबा चिश्तींचा कल ‘पंजाबी’ चित्रपटांकडे असल्यामुळे ते पंजाबी चित्रपटांची पंढरी असलेल्या लाहोरकडे आकर्षति झाले. ख़य्यामना िहदी सिनेमात करिअर करायची ‘ख़्वाहिश’ होती म्हणून ते मुंबईला हुस्नलाल-भगतरामच्या तंबूत परतले. चोप्रांचा रखडलेला ‘चाँदनी चौक’ १९५४ साली प्रदíशत झाला. या चित्रपटाचं संगीत रोशनने केलं. कालांतराने ख़य्यामसाहेब सिनेसंगीतातले एक मातब्बर नाव बनले आणि त्यांच्या सफलतेवर बाबा चिश्ती पाकिस्तानात भरून पावले. कृतार्थभावाने परिपूर्ण असं एक सुंदरसं काव्य लिहून त्यांनी ख़य्यामना पाठविलं. ते भावोत्कट काव्य खय्यामसाहेबांनी ‘मोरपिसा’सारखं जपून ठेवलं आहे..
ख़ुदा ने तुझ को दिया है
बडा मक़ाम ख़य्याम
मेरी तरफसे सलाम
और इक पयाम ख़य्याम
तुम्हारे प्यार अक़ीदत पर
जान-ओ-दिल है निसार
के तूने हक़ अदा कर दिया
तमाम ख़य्याम
पाकिस्तानची ‘मलिका-ए- तरन्नुम’ नूरजहाँला ग़ुलाम हैदर साहेबांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला आणि रसिकांपुढे आणलं असं मानलं जातं. नूरजहाँनेदेखील अनेक मुलाखतींतून मास्टर गुलाम हैदरसाहेबांचा आवर्जून उल्लेख केला आहे. तथापि हे पूर्ण सत्य नसून ‘अर्धसत्य’ आहे. मास्टर ग़ुलाम हैदरसाहेबांनी नूरजहाँचे सुप्त गुण ओळखून तिला चित्रपटात संधी दिली ही गोष्ट जरी खरी असली तरी तिला कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपुढे सादर करण्याचं श्रेय बाबा चिश्तींकडे जातं. लाहोरला १९३५ साली जेव्हा बाबा चिश्ती आगा हश्र काश्मिरींकडे साहाय्यक म्हणून काम पाहात होते; तेव्हा नऊ वर्षांच्या ‘अल्लाह वसाई’ला (नूरजहाँचे मूळ नाव) घेऊन तिचे वडील बाबांकडे आले. म्हणाले, ‘माझ्या या मुलीला गाण्याचे व संगीताचे खूप वेड आहे. हिला एकदा ऐका. हिचा गायकीचा ‘बेस’ फार पक्का आहे. जमल्यास हिचा एखादा कार्यक्रम करा. बाबा चिश्तींच्या गुणग्राहक वृत्तीने तिच्यातला ‘स्पार्क’ ओळखला. त्यांनी तिच्याकडून दोन ग़ज़्ाला, दोन नात, दोन पंजाबी गाणी आणि दोन लोकगीते अशा एकूण आठ गाण्यांची चांगली तयारी करून घेतली आणि लाहोरमध्ये तिचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. हा कार्यक्रम न भूतो न भविष्यति असा गाजला. आगा हश्र काश्मिरींनी तिला कार्यक्रमासाठी आपल्या मालकीचं थिएटर उपलब्ध करून दिलं व तिचं मूळ नाव बदलून ‘बेबी नूरजहाँ’ असं नाव ठेवलं. या यशाने तिला नवी ओळख मिळवून दिली. नंतर तिने मागे कधी वळून पाहिलंच नाही.
नूरजहाँकडून पाकिस्तानात बाबा चिश्ती यांनी अनेक भावस्पर्शी गाणी गाऊन घेतली असली तरी ‘लख़्ते-जिगर’ (१९५६) या सिनेमात बाबा चिश्तींनी कंपोज केलेली लोरी पाकिस्तानातील अजरामर अंगाई मानली जाते. ‘अलबेला’त लताने गायलेल्या ‘धीरे से आ जा रे अखियन मे’ इतकीच ती पाकिस्तानात लोकप्रिय आहे. नाज़िम पानिपतीचे शब्द आणि नूरजहाँचा नितळ भावस्पर्शी स्वर लाभलेली ही हळुवार अंगाई ऐकत राहावी इतकी असरदार आहे.
चंदा की नगरीसे आऽजा री नििदया
तारों की नगरी से आ ऽजा
परियोंकी दुनिया के नग़में
सुना कर नन्हे को मेरे सुला जा
आऽजा तारों की नगरी से आ ऽजा.
याच चित्रपटात नूरजहाँचं ‘वो ख़्वाब सुहाना टूट गयाऽ उम्मीद गई अरमान गये.’ हे एक नितांतसुंदर विफलगीत आवर्जून ऐकण्यासारखं आहे. बाबा चिश्तींनी ‘तूफान’ (१९५५) या चित्रपटात पाश्र्वगायिका पुखराज पप्पू व इनायत हुसन भट्टीच्या आवाजात कंपोज़्ा केलेलं ‘बरसात की वो रात कहो कैसे भुलाएं’ हे ‘हमेशांजवाँ’ गीत डोलायला लावते. ‘सच्चाई’ (१९४९)तलं ‘दिल को राहत नही क़रार नही.’ हे मुनव्वर सुलतानाने गायलेलं ‘िवटेज-साँग’ मनाला मोहून टाकतं. ‘घुंगट की ओट गोरी बालम को देखे गोदी में लालना रेऽ’ व ‘िज़्ादगी के प्यार भरे गीत कोई गायेगा. नाचूंगी म झूऽम झूऽमके.’ ही ‘नौकर’ (१९५५) चित्रपटातली गाणी कौसर परवीनने गाऊन धमाल केली आहे. त्याचबरोबर ‘सल्तनत’मधील ‘मेरा फूल सा बदन है मेरी चाँद सी जवानी’ (१९५९) यासारखी अवीट गोडीची गाणी बाबा चिश्तींच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवून देतात.
चिश्तींनी ‘अजब ख़ान’ (१९६१) या चित्रपटात पाश्र्वगायिका नाहीद नियाज़्ाीच्या गोड आवाजात ‘कोई मख़मूर नज़्ार गई यूं दिल से ग़ुज़्ार िज़्ादगी झूम गई.’ हे विलक्षण कर्णमधुर गाणं स्वरबद्ध केलं आहे. या सदाबहार गाण्याचं वैशिष्टय़ म्हणजे यात ऑर्केस्ट्रेशनमध्ये शहनाईचा जो शानदार ‘पीस’ अरेंज केला आहे त्यावर संगीतकार रोशनच्या ‘बडे अरमानों से रख्खा है बलम तेरी कसम’ची अगदी पुसटशी छाया आहे. हे हलकंसं सावटही या गाण्याला मौलिकतेचं परिमाण बहाल करून वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. शब्द आणि सुरांची श्रीमंती लाभलेलं हे ‘प्रणय-गीत’ बाबा चिश्तींनी फारच तरल आणि लोभस चालीत गुंफलं आहे. वाद्यमेळ जुळविताना फ्ल्यूट, क्लॅरोनेट्स, व्हायलिन्स आणि सोबतीला ‘खेमटय़ा’चा लुभावना ठेका आहे. ढोलकवर आकर्षक ‘लग्ग्या’ आणि ‘पिकअप्स’ची रेलचेल आहे. हे गाणं ‘हुस्ना’ नामक नायिकेवर चित्रित झालं आहे. तिला पाहताना अपऱ्या नाकाच्या ‘निम्मी’ची प्रकर्षांने आठवण येते..
बाबा चिश्तींनी १९५८ च्या सुमारास रुबिना कुरेशी या सुफी गायिकेकडून गाऊन घेतलेल्या एका पंजाबी गाण्यामुळे भारतात टीकेचं मोहोळ उठलं होतं. गाण्याचे बोल होते. ‘दाचि वालिया मोड मुहार वे साणूं ले चल अपने नाल रे.’ हे गाणं राज कपूरच्या ‘आग’ (१९४८) या चित्रपटातल्या शमशाद बेग़मने गायलेल्या ‘काहे कोयल शोर मचाये रे मोहे अपना कोई याद आये रे.’ या गाण्याशी तंतोतंत जुळत होतं. ‘आग’ची गाणी राम गांगुलीने संगीतबद्ध केली होती. शंकर-जयकिशन ही जोडगोळी तेव्हा राम गांगुलीचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम पाहात होती. जवळपास दहा वर्षांनंतर बाबा चिश्तींनी हे गाणं पाकिस्तानात दूरदर्शनसाठी कंपोज केल्यानंतर हा वाद उफाळून आला होता. बाबाजींनी हे लोकगीत असून याची चाल पारंपरिक असल्याचा खुलासा केला. काही काळानंतर नूरजहाँनेदेखील ‘दाचि वालिया मोड मुहार वे..’ हे गाणं गाऊन बाबा चिश्तींच्या बचावाचे समर्थन केले. तरीही भारतातल्या काही जाणकारांच्या मनात संशय होताच. जेव्हा भारतात सुप्रसिद्ध पंजाबी लोकगीत-गायिका सुिरदर कौरने हे लोकगीत पारंपरिक शैलीत गायलं; तेव्हा कुठे बाबा चिश्तींच्या खरेपणावर शिक्कामोर्तब झालं.
प्रश्न असा पडतो की, हे लोकगीत जर पारंपरिक असेल, तर ‘आग’मध्ये राम गांगुलीने ‘काहे कोयल शोर मचाये रे’ या गाण्याला लावलेली चाल ‘ओरिजनल’ कशी म्हणता येईल? बाकी काहीही म्हणा, शमशाद बेगमने गायलेलं ‘काहे कोयल शोर मचाये रे’ हे गाणं नूरजहाँ, रुबिना कुरेशी, सुिरदर कौर या सर्वानी गायलेल्या मूळ लोकगीतापेक्षा किती तरी पटीने सरस असल्याने या ठिकाणी ‘परछाई’ श्रेष्ठ ठरल्याचा धक्कादायक निष्कर्ष निघतो.
बाबा चिश्तींनी संगीतबद्ध केलेला पहिला पंजाबी चित्रपट ‘फेरे’ (१९४९) हा रौप्यमहोत्सवी हिट चित्रपट होता, तर ‘सस्सी’ (१९५४) व ‘नौकर’ (१९५५) ला सुवर्णमहोत्सवी यशाची सोनेरी किनार लाभली होती. १९५६ मध्ये त्यांचा पंजाबी चित्रपट ‘दुल्हा-भट्टी’ हा पाकिस्तानातला पहिला ‘ब्लॉकबस्टर’ सिनेमा ठरला. यातून मिळालेल्या पशातून लाहोरला ‘एव्हरन्यू’ या अत्याधुनिक स्टुडिओची उभारणी करण्यात आली. १९५७ साली प्रदíशत ‘एक्केवाली’ या चित्रपटाने एकूण निर्मिती खर्चाच्या ४५ पट निधी गोळा करून ‘मेगा हिट’ चित्रपट होण्याचा मान मिळविला. ‘एक्केवाली’च्या निर्मात्याने मिळालेल्या नफ्यातून चक्क लाहोरचा ‘बारी स्टुडिओ’ विकत घेतला.
बाबा चिश्तींनी आपल्या गुणग्राहक स्वभावाला अनुसरून नूरजहाँसारख्या अनेक प्रतिभावंतांना संधी देऊन त्यांना लोकाभिमुख केलं. बाबा चिश्तींनी पाकिस्तानी सिनेइंडस्ट्रीला पन्नासच्या दशकात इनायत हुसेन भट्टीसारखा अष्टपलू पाश्र्वगायक दिला जो पुढे अव्वल दर्जाचा पाश्र्वगायक बनला. बाबा चिश्तींनी आपल्या ‘चन्न मख़ना’, ‘सजनप्यारा’ व ‘ज़िन्द जान’ या सुपरहिट पंजाबी चित्रपटांतून इनायत हुसेन भट्टीला गाण्याची संधी दिली.
सलीम रज़ा या प्रतिभाशाली पाश्र्वगायकाला आपल्या ‘नौकर’ या चित्रपटातून बाबांनीच लोकांपुढे आणले. नज़्ाीर बेग़मसारख्या गुणी गायिकेला ‘मिस ५६’मधून गाण्याची संधी दिली, तर नसीम बेग़मला ‘गुड्डा-गुड्डी’ (१९५६) तून गाण्याचा ‘मौका’ दिला. ‘आबरु’ (१९६१) या चित्रपटातून पाश्र्वगायिका मालाला पाश्र्वगायनाची संधी बाबांनीच दिली. मेहदी हसनसाहेबांचा लाडका शिष्य परवेज़्ा मेहदीला ‘चाँद-तारा’ (१९७३) या सिनेमातून पहिला ‘ब्रेक’ दिला.
मसूद राणा हा पाकिस्तानचा नाणावलेला पाश्र्वगायक! मेहदी हसनसाहेबांबरोबर त्याची कायम चढाओढ असायची. मसूद राणाला बाबा चिश्तींनी आपल्या ‘रिश्ता’ (१९६३) या चित्रपटात प्रथम गाण्याची संधी देऊन पाकिस्तानी सिनेसंगीताला अव्वल दर्जाचा पाश्र्वगायक दिला. सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका रुना ललाने ज्या ‘जग बीती’ (१९६७) या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसंगीतात चंचुप्रवेश केला त्याला बाबा चिश्तींचंच संगीत होतं.
बाबा चिश्तींनी एकूण पाच हजार चाली तयार केल्या. केवळ भारत आणि पाकिस्तान मिळून २५० चित्रपटांना संगीत दिलं. अनेक उर्दू आणि पंजाबी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. बाबांचं राहणीमान अगदी साधंसुधं होतं. प्रत्येकाशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव होता. पशासाठी किंवा कामासाठी त्यांनी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. भारतातल्या िहदी आणि पाकिस्तानातल्या काही उर्दू चित्रपटांना त्यांनी संगीत दिले असले तरी पंजाबी चित्रपटांचे ते आघाडीचे संगीतकार होते. बाबा चिश्तींचा १९३६ साली ‘दीन-ओ-दुनिया’पासून सुरू झालेला कर्णमधुर सिनेसंगीताचा दौर १९७६ सालात संपला. त्यांचा उशिरा प्रदíशत झालेला शेवटचा पंजाबी चित्रपट ‘वहशी टोला’ १९८३ साली रीलीज झाला होता.
बाबांनी आयुष्याचे शेवटचे काही दिवस आध्यात्मिक सिद्धांतामुळे फकिरी अवस्थेत कंठले. २५ डिसेंबर १९९४ रोजी त्यांचे लाहोर येथे हृदयविकारामुळे निधन झाले. पाकिस्तानात फाळणीनंतर नव्याने उभारण्यात आलेल्या सिनेइंडस्ट्रीचे ते आद्य प्रवर्तक मानले जातात. पाकिस्तानी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर करणारे प्रमुख शिलेदार या नात्याने या महान संगीतकाराचे योगदान मोठे आहे. म्हणूनच तिथल्या सिनेइंडस्ट्रीत जी.ए. चिश्तींचं नाव मोठय़ा अदबीनं घेतलं जातं.
‘परछाईयाँ’च्या पुढच्या भागात पाकिस्तानातले ख्यातनाम संगीतकार तसेच अनेक कर्णमधुर गाण्यांचे जनक रशीद अत्रे यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाहू.. तोवर अलविदा! (उत्तरार्ध)
फाळणीनंतर परिस्थिती बदलली. वाटा बदलल्या. बाबा चिश्तींचा कल ‘पंजाबी’ चित्रपटांकडे असल्यामुळे ते लाहोरकडे आकर्षति झाले. ख़य्यामना िहदी सिनेमात करिअर करायची ‘ख़्वाहिश’ होती म्हणून ते मुंबईला परतले.
बाबा चिश्तींनी १९५८ च्या सुमारास रुबिना कुरेशी या सुफी गायिकेकडून गाऊन घेतलेल्या एका पंजाबी गाण्यामुळे भारतात टीकेचं मोहोळ उठलं होतं. ते गाणं राज कपूरच्या ‘आग’ (१९४८) या चित्रपटातल्या शमशाद बेग़मने गायलेल्या ‘काहे कोयल शोर मचाये रे मोहे अपना कोई याद आये रे.’ या गाण्याशी तंतोतंत जुळत होतं.
बाबा चिश्तींनी आपल्या गुणग्राहक
स्वभावाला अनुसरून नूरजहाँसारख्या अनेक प्रतिभावंतांना संधी देऊन त्यांना लोकाभिमुख केलं. त्यांनी पाकिस्तानी सिनेइंडस्ट्रीला पन्नासच्या दशकात इनायत हुसेन भट्टीसारखा अष्टपलू पाश्र्वगायक दिला जो पुढे अव्वल दर्जाचा पाश्र्वगायक बनला.
यूटय़ुबच्या सर्च बॉक्समध्ये Aasifali Pathan या नावाचा सर्च दिल्यास या लेखाशी संबंधित सर्व गाणी ऐकता येतील.