गाडीमधून, बसमधून फिरण्याचा अनुभव तर नेहमीचाच. पण वाटेमधली लहान लहान गावं, शेतं, मंदिरं बघत लोकांना भेटत प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर सायकलला पर्याय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही वर्षांपूर्वी पनवेल-कन्याकुमारी सायकलिंग केलं होत, तेव्हा कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्याने कारवार, गोकर्ण, मुरुडेश्वर व मंगलोर असा काही भाग पाहून झाला होता. तेव्हा तिथल्या नितांत हिरवाईने भारावून गेलो होतो.
कर्नाटकातीलच बदामी व हंपी या दोन प्रेक्षणीय स्थळांविषयी ऐकून होतो. कर्नाटकातील मध्य भागातूनही कधी प्रवास झाला नव्हता. याच उत्सुकतेपायी आम्ही काही जणांनी ‘कोल्हापूर-गोकाक-बदामी-हॉस्पेट-हंपी’ अशी सायकल सफर ठरवली.
हो नाही करता करता आमचे सहा जणांचं टोळकं १७ जानेवारी २०१४ ला रात्री व्होल्व्हो बसमधून आपापल्या सायकलीसह कोल्हापूरला निघालं. तिथं स्नेही विजय पारखे यांचा पाहुणचार स्वीकारून आम्ही हिडकळच्या दिशेने सायकिलग सुरू केलं. दूधगंगा नदीवरील पूल पार करून कर्नाटकात प्रवेश केला आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाटय़ा व मैलांच्या दगडांवरील भाषा व लिपी बदलली. शिक्षित असूनही अशिक्षितासारखी गत व्हायला लागली. आपल्या शेजारच्या राज्याचीही भाषा इतक्या वर्षांत आपण शिकलो नाही, याचं वैषम्य वाटलं.
नदीपल्याड आणखी एक फरक जाणवला तो शेत जमिनीतील पिकांचा. इथं सर्व उपलब्ध असलेली जमीन लागवडीखाली दिसली. ऊस, कापूस, ज्वारी, मका तर मधूनच सूर्यफूल अशी पिकं शेतात डोलताना दिसायची. आसमंत हिरवागार दिसायचा.
सायकल चालवता चालवता ऊस वाहून नेणाऱ्या बैलगाडय़ा, ट्रॅक्टर-ट्रॉलीज व ट्रक यांचीच वाहतूक दिसायची. इथे एकाच ट्रॅक्टरला दोन-दोन ट्रॉलीज जोडलेल्या असायच्या. या ट्रॅक्टरांचा आवाजही मोठा. त्यात भर म्हणून ड्रायव्हर मोठय़ा आवाजात गाणी लावून ट्रॅक्टर चालवीत त्यामुळे ट्रॅक्टर येतोय याचा कानांना लांबूनच सुगावा लागायचा. ट्रॅक्टरचा आवाज मोठा असला तरी वेग मात्र संथ असायचा. मग कधी आमच्या सायकली पुढे व ट्रॅक्टर मागे, किंवा ट्रॅक्टर पुढे व आम्ही ‘उसाला लागलेल्या कोल्ह्य़ागत’ त्याच्या मागे असायचो.
बैलगाडय़ांत तर ऊस अगदी खचाखच भरलेला असायचा. ७-८ फुट उंचीपर्यंत ऊस रचून त्यावर
३-४ ऊस तोडणी कामगार व कुटुंब बसलेलं असायचं. हे प्रचंड ओझं ओढताना दोन बैलांची बरीच दमछाक होताना दिसे. असह्य़ ओझ्याने बैल तिरके तिरके चालत. त्यांच्या डोळय़ातील कारुण्य व असहायता पाहून मन गलबललं.
बऱ्याचदा उसाच्या मळय़ात आणि आसपास ऊस तोडणी कामगारांच्या राहुटय़ा लागलेल्या दिसायच्या. या राहुटय़ांतून मुलं आवाज द्यायची, हात हलवायची आम्हीही आनंदाने व उत्साहाने त्यांना प्रतिसाद द्यायचो.
वाटेत वल्लभगड नावाचे गाव व त्याच नावाचा किल्ला दिसला. किल्ला पाहण्याच्या मोहावर मात करीत, पेडल मारीत पुढे निघालो.
आता हिडकळ जवळ येत होते. उजव्या हाताला हिडकळ धरणाचा मातीचा उंच बंधारा लक्ष वेधून घेत होता. त्याला समांतर निर्मनुष्य रस्ता सुंदर होता, मोहात पाडणार होता. बंधाऱ्याजवळ एका झाडाखाली थांबलेल्या ट्रकच्या आडोशाजवळ सायकली लावल्या. ११० पायऱ्या चढून हिडकळ धरणाच्या बंधाऱ्यावर आलो. पलीकडे सर्वदूर पाणी पसरले होते. घटप्रभा नदीवरील हे धरण अगदी महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. हिडकळ धरणाऱ्या बंधाऱ्यावरून पुढे एका टेकाडावर एक किल्लाही दिसला. इथे (इन्स्पेक्शन बंगलो)मध्ये राहिलो. पहिला दिवस ९६ किमीचे सायकलिंग होऊन संपला.
पुढचा टप्पा हिडकळ ते गोकाक असा होता. सकाळच्या प्रहरात सायकलिंग करताना छान वाटत होते. रस्ता शेत-मळे, माळरान यांतून जात होता. आसमंतातील शांतता हिरवेपणा व तुरळक वाहतूक यामुळे युरोपमधील सायकल मार्गाची आठवण झाली. पुढे ‘गोकाक रोड’ स्टेशन लागले. थोडय़ाच वेळात गोकाक धबधब्याचे स्थळ गाठले. इथे ‘गोकाक मिल’देखील आहे. या मिलची संपूर्ण इमारत दगडी आहे. तिची बांधणी ब्रिटिश धाटणीची वाटली म्हणून चौकशी केली तर ही इमारत १८८७ साली बांधण्यात आली असे सांगण्यात आले. इथला घटप्रभा नदीवरील पूल हिमालयातील झुलत्या पुलांची आठवण करून देतो.
घटप्रभा नदी येथून १००-१२५ फूट खाली कोसळते. पावसाळय़ात या नदीचे व धबधब्याचे दृश्य धडकी भरवेल असं रौद्र असतं.
वाटेत एका कालव्याजवळ थांबलो. पल्याड एक शेतकरी होता, सहजच हात हलवून अभिवादन केले. थोडय़ा वेळाने तो सद्गृहस्थ जवळ आला, चौकशी करून परत शेताकडे गेला व येताना उसाच्या रसदार कांडय़ा घेऊन आला. शिवाय चहासाठी स्वत:च्या झोपडीवजा घराकडे आम्हाला घेऊन गेला. त्याचा पाहुणचार नाकारून पण घर-कुटुंब-मळा यांची चौकशी करून आम्ही एक सायकल मित्र जोडून पुढे निघालो.
गोकाक कधीच मागे पडले होते. स्वच्छ हवेतला गारवा अन् हिरवा परिसर यामुळे लवकरच आम्ही ‘यारगट्टी’ गाठले. इथेच राहायचा निर्णय घेतला. हॉटेल रेणुकाजवळ थांबलो तर लगेचच १०-१५ स्थानिक लोक आमच्या भोवती आमच्या सायकली पाहायला जमले.
रस्त्याच्या दुतर्फा वसलेली छोटी वस्ती. नाव लक्षात राहील असे- ‘यारगट्टी’. हे नाव आम्हाला खूपच आवडले. गावात एकमेव चौक. यातून डावीकडे बागलकोट, उजवीकडे बेळगाव, समोर सौंदत्ती- गडग या गावांकडे जाणारे रस्ते व मागून आलेला गोकाक स्टेशन रोड यामुळे हा चौक बऱ्यापैकी गजबजलेला होता.
सकाळी लवकरच यारगट्टीहून निघालो. रस्ता चांगला होता म्हणून बागलकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सायकली हाणायला सुरुवात केली तर अचानक काटकोळकडे जाणारा अरुंद रस्ता व तशी पाटीही दिसली करकचून ब्रेक दाबत साऱ्यांनीच वेग कमी केला व उजवा हात खुणेसाठी हलवत उजवे वळण घेऊन रस्ता बदलला. काटकोळ मार्गे बदामी असा आमचा आजचा टप्पा होता. खूप खड्डे असलेला तो अरुंद रस्ता आता आम्हाला कर्नाटकच्या आंतरभागातील रंग दाखवीत होता. लहान लहान वस्त्या, शेतं, शेतांतून राबणारे मजूर इतस्तत: फिरणारी गुरं, मेंढपाळ व मेंढरांचे कळप व खडय़ांमळे हलत डुलत येणारे एखादे वाहन असं अगदी भारतीयच वाटावं अस दृश्य आमचा सातत्याने पाठपुरावा करीत होतं. खड्डे व स्पीडब्रेकर चुकवण्यात सारं लक्ष लागून राहिल्याने सायकलिंगचा वेगपण कमी झाला व आजूबाजूच्या निसर्ग दृश्यांनाही पारखे व्हावे लागले.
काटकोळनंतर तोरगल हे गाव लागले. रस्त्याला लागूनच उजवीकडे किल्ला होता. आपसूकच पावलं तिकडे वळली. मेहबूब हा स्थानिक गृहस्थ बरोबर चालत राहिला. चालता चालता परिसर, गाव, किल्ला यांविषयी तो जुजबी माहिती देत होता. गावात राजाचा वाडा आहे व आज त्यात राजा आलेला आहे ही त्यानेच पुरवलेली माहिती. मग स्वप्निलच्या आग्रहाने आम्ही वाडय़ात जाऊन राजाला भेटलो. गावात मुस्लीम बहुसंख्येने दिसले पण राजा चक्क मराठी भाषिक- शिंदे आडनाव असलेला. १६६५ साली त्यांचे वंशज इथे आलेले होते.
किल्ल्याचं धावतं दर्शन घेऊन परततोय तर आमच्या सायकलींभोवती ३०-४० माणसांचा गराडा पडलेला. त्यांच्या चौकशा, प्रश्न, शंका, उत्सुकता, जिज्ञासा शमवत आम्ही रामदुर्गचा रस्ता धरला. गावापासून रामदुर्गचा रस्ता अधिकच लहान व खूप खराब झाला. रमाकांत महाडिकांच्या सायकलचे चाक पुन्हा पंक्चर झालं. हितेन व स्वप्निलने ते लगोलग दुरुस्त केलं.
आता परिसराने हळूहळू रंग पालटायला सुरुवात केली होती. तांबूस, तपकिरी, बदामी रंगांचे अवाढव्य खडक व त्यांचे एकावर एक रचलेले प्रचंड नैसर्गिक ढीग दिसायला लागले. लाखो वर्षांची धूप होऊन हे सारे खडक उघडे पडले होते व एकावर एक अस्ताव्यस्त रचल्यागत बदामी रंगाचे त्यांचे विविध आकृतिबंध आपले लक्ष वेधून घेत होते. खडकांचा बदामी रंग व मोहक आकृतिबंध यांमुळे परिसराचा नूर पालटला होता, मनाला उल्हसित करीत होता. ‘बदामी’ जवळ येत असल्याची ती खूणगाठ होती. सायकलवर असल्याने निसर्ग असा आठही दिशांनी न्याहाळता येत होता. ना वाहनावरील टपाचा अडथळा, ना काचांचा अडसर. सायकलिंग करायचे ते याचसाठी-निसर्गाचा संपूर्णत: आस्वाद घ्यायला, ऊन-थंडी-वाऱ्यासह!
बदामीची लेणी व त्याचे स्थापत्य अप्रतिम आहे. ही लेणी पाहताना श्रीलंकेतील ‘सिगिरिया रॉक’या जागतिक वारसा स्थळाचीच आठवण येते. बरचंसं साम्य वाटलं या दोन भिन्न स्थळांत. दगडांचा रंग, लेण्यांची कलाकुसर, वरून दिसणारा विस्तीर्ण अगस्ती तलाव असं सारं दृश्य मनाला मोहवतं. फक्त खटकते ती या परिसराला खेटून असलेली वस्ती.
बदामीचा किल्ला आणि रॉक क्लाइबिंग ट्रेनिंग सेंटर पाहायचे राहून गेले. बदामीत आणखी एक मुक्काम करून आम्ही पडत्क ल व ऐहोले ही दोन जागतिक वारसा स्थळं पाहायचं ठरवलं. अमितनेच ही स्थळे सुचविली होती. त्यासाठीच त्याने सायकलिंगचा मार्ग आखला होता. आम्ही पाच जण या स्थळांविषयी अनभिज्ञच होतो.
जागतिक वारसा स्थळ असले तरी इथले रस्ते म्हणजे थेट चंद्रावरचेच खड्डे. हा परिसर पाहण्यासाठी रिक्षातून गेलो. भयानक खड्डय़ांमुळे आमच्या पाठ, मान व डोकी यांचं चांगलंच धिरडं झालं.
ऐहोलेच्या वास्तूंच्या आसपास गलिच्छ वस्ती व वाहती गटारं दिसली. एका पुरातन वास्तूच्या मागेच कपडे वाळत टांगलेले पाहिले आणि मन खट्ट झालं. हे सारं पाहून खूप लाज वाटत होती. परदेशी पर्यटकांच्या मनात भारताविषयी काय चित्र रेखाटलं जात असेल असा उदासीन विचार करीत आम्ही ऐहोले सोडलं.
पुढील टप्पा बदामी कुकनूर असा होता. अंतर होतं ७५ किमी. रस्ता चांगला निघाला. रमाकांत महाडिकांची ही पहिलीच मोठी सायकल सफर. आता सरावाने ते पुढे राहू लागले. हितेन राणे कधी पुढे तर कधी मध्ये राहायचा. पंक्चर दुरुस्त करण्याचं काम हितेन मोठय़ा हिरिरीने, न कंटाळता करायचा. भर दुपार होती. कुकनुर अगदी जवळ आलं होतं. डावीकडे रस्त्यालगत एक चिंचेचं झाड दिसलं. ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनारवृक्षापरी..’ असे रोमँटिक गाणं म्हणत स्वप्निल व कपिल विसावले व आम्हालाही निमित्त मिळालं. आम्ही मग दगड मार-मारून चार-दोन चिंचा पाडल्या. ‘तेवढंच लहानपण जगता आलं,’ असं समाधान मनात घोळवत आणि चिंचा चघळत कुकनुर गाठलं.
इथेही इन्स्पेक्शन बंगलो (आयबी) मध्येच राहिलो. मेहबूब नावाचा तरुण केअर टेकर खूपच उत्साही व प्रसन्न वृत्तीचा होता. हंपीला जाण्यासाठी जवळचा रस्ताही त्याने सांगितला व आमच्या जेवणाची तयारी करायला पळाला.
येथे जवळच कॉलेज होतं. त्यामुळे सकाळी निघताना अनेक मुलं-मुली सायकलवरच दिसत होते. कर्नाटकमध्ये अनेक शालेय विद्यार्थी व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी सायकल वापरताना दिसले. इथल्या सरकारने विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करून एक चांगला पायंडा पाडला आहे. सायकलिंगमुळे मुला-मुलींचा वेळ वाचतो, वाहनांमुळे होणारे प्रदूषण टळतं व सायकलिंगचं महत्त्वही कळतं.
थोडय़ाच वेळात हॉस्पेटला जाणारा मोठा रस्ता लागला. आता वाहतूक वाढली होती. डंपर सुसाट जात होते. आम्ही खूप दिवसांनी अशी जीवघेणी वाहतूक अनुभवत होतो. सायकलिंगवरच लक्ष केंद्रित करून हॉस्पेटपुढील कमलापूर गाठलं व तिथंच इन्स्पेक्शन बंगलोमध्ये राहिलो. तेथून हंपी केवळ ४ कि.मी. दूर होतं. गंमत म्हणून रात्री ७-८ कि.मी. सायकलिंगचा आनंद घेतला. ‘अब दिल्ली दूर नही’, असं म्हणत, सकाळी हंपी पाहण्याचे मनोरथ रचत झोपी गेलो.
फोनाफोनी करून अमितने गाइड मिळविला. त्याचे नाव भानू. हा अगदी तरुण व सच्चा होता. सायकलनेच हंपी पाहाण्याचा आमचा इरादा भानुलाही आवडला. त्यामुळे तो मोटरबाइकवरच आला. तो पुढे मोटारबाइकवर व आम्ही त्याच्या मागे सायकलवर अशी आमची वरात हंपीमध्ये ३-४ तास चालू होती.
हंपीमध्ये बरेचशे परदेशी पर्यटक सायकल भाडय़ाने घेऊन हंपीभर भटकतात, हंपी पाहतात. हंपीचं वास्तू वैभव, रचना, पसारा व स्वच्छता या गोष्टी जागतिक वारसा हक्काच्या दर्जाच्या वाटल्या. विजयनगराची ही राजधानी पाहताना केलेल्या सायकलिंगचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
विशेष म्हणजे येथील विठ्ठल मंदिर या पुरातन वास्तू परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. पण सायकली व बॅटरीवरील खास वेगळी वाहनं इथे सरकारनेच वापरात आणली आहेत. महत्त्वाचं म्हणजे या बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचं सारथ्य मुलीच करीत असतात. आमच्याकडे सायकल्स असल्यामुळे आम्ही अगदी भाव खाऊन गेलो. शिवाय रस्ताही निसर्ग व परिसराशी अगदी मिळताजुळता, मातीचाच. त्यामुळे सायकलिंगच्या आनंदात अधिकच भर पडली.
महाराष्ट्रात पर्यटन स्थळी अशी बॅटरीवर चालणारी वाहनं ठेवल्यास हवा व आवाजी प्रदूषण टाळता येईल.
हंपीतून पुन्हा कमलापूरला जाताना भानूने कॅनॉल रोड हा जवळचा रस्ता दाखवला. डावीकडे खळाळत वाहणारा कालवा, त्याला लागून मातीचा वळणा वळणांचा रस्ता व उजवीकडे शेतं, मळे व झाडं असा सारा हिरवागार, तजेलदार मामला. या ३-४ किमीच्या रस्त्याने सायकल चालवताना भानच हरपून गेलं.
दुसऱ्या दिवशी परत हंपीला आलो. आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. तेथील तुंगभद्रा नदीपल्याड जाऊन आम्हाला हॉस्पेट गाठायचं होतं. इथे या नदीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. कुबट वास, कचरा व मानवी विष्ठा यामुळे सारा परिसर गलिच्छ झाला आहे.
फेरीबोटीने आम्ही तुंगभद्रा ओलांडली. नको ती दृश्यं मागे सोडीत व बदामी, पडत्कल येथील कारागिरी, हंपीचं वैभव व सौंदर्य, सायकलिंगचा आनंद, लोकांची उत्सुकता, मुलांचे हलणारे हात अशा दृश्यांची उजळणी करीत हंपीचा निरोप घेतला.