युरोप, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, मलेशिया ही पर्यटकांची आवडती ठिकाणं. त्या पलीकडे काहीतरी नवं अनुभवायला म्हणून बालीला गेलेल्या पर्यटकांचा हा एकदम ताजातवाना अनुभव-

डिसेंबरच्या सुट्टीत जायचं कुठे हा आमच्याकडे चच्रेचा विषय. आम्ही चार जणांनी चार नावं सांगितली. कोणाचंच एकमत नाही. शेवटी नवरा म्हणाला, ‘इंडोनेशिया- बालीला जाऊया’.
बाली हे नाव फारसं ऐकण्यात नव्हतं, या ठिकाणाबद्दल जास्त काही माहिती नव्हतं आणि तिकडे भारतातून टूर्स पण जात नाहीत. ते कसं असेल याची काहीच कल्पना नव्हती. असं असेल तर मग जायचं की नाही? शेवटी ठरवलं ‘बाली’ला जाऊ या.. पण सिंगापूर, युरोपला जाताना जितकी उत्सुकता होती तितकी मात्र बालीबद्दल नव्हती. एका बेटावर जाणार आहोत, खूप स्वीिमग करायला मिळेल म्हणून मुली एकदम खूश! नेहमीप्रमाणे जायच्या आधी तिकडचं हवामान इंटरनेटवर बघितलं आणि निघालो..
इंडोनेशियाच्या अनेक बेटांपकी बाली हे एक बेट. विमानातून उतरल्यावर आधी लक्ष वेधून घेतलं ते विमानतळावरच्या सुंदर गणपतीच्या मूर्तीने. आपले गणपतीबाप्पा बघितल्यावर त्या जागेविषयी आपोआप आपुलकी निर्माण झाली. इंडोनेशिया हे जरी मुस्लीम राष्ट्र असलं तरी इथे जवळपास ९५ टक्के लोक हे िहदू आहेत आणि तिथे हजारपेक्षा जास्त मंदिरे!! ‘बहासा इंडोनेशिया आणि मलय’ या इथल्या प्रमुख भाषा आणि ‘इन्डोनेशियन रुपया’ हे इथलं चलन. हे बेट चारही बाजूंनी सुंदर समुद्र किनाऱ्याने वेढलेलं, ताजी हवा, हिरवेगार डोंगर, खळखळत्या नद्या, भातशेतीचे हिरवेगार गालिचे, अप्रतिम रस्ते, अधूनमधून पडणारा पाऊस, चोहीकडे मंदिरे आणि वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे इथे जोपासली जाणारी आपली िहदू संस्कृती.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
Kolhapur video Rankala Lake
“कोल्हापूरकरांसाठी सुखाचं एक ठिकाण म्हणजे…” कोल्हापूरातील लोकप्रिय ठिकाणचा VIDEO होतोय व्हायरल
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

इथली माणसं विनम्र आणि हसतमुख आहेत. अमेरिकन, ब्रिटिश लोकांसारखं ‘हाय, हॅल्लो’ करायची पद्धत इथे नाही बघायला मिळत. तर हे लोक आपल्यासारखं हात जोडून प्रत्येकाचं स्वागत करतात.

पाच दिवसांच्या या टूरमध्ये भरपूर आगळ्यावेगळ्या गोष्टी समजल्या. सर्वप्रथम, इथल्या लोकांची नावं! इथली मुलांची नाव ठेवायची आगळीवेगळी पद्धत आहे. एका घरात जर चार मुलं असतील तर मोठय़ा मुलाचं नाव हे ‘वायन’, दुसऱ्याचं ‘माडे’, तिसरा ‘काडेक’ आणि चौथा ‘केतुत’. आणि याहून मोठं नवल म्हणजे या नावापुढे आठवडय़ाची नावं लावायची, म्हणजे सोमवारी जर जन्म झाला असेल तर ‘सोमा’, मंगळवारी ‘अंगारा’, बुधवारी जन्म झाला असेल तर ‘बुडा’ असं. आमच्या टूर गाइडचे नाव होते ‘केतुत बुडा’. थोडं मजेशीर वाटलं. नावाप्रमाणेच इथली माणसं विनम्र आणि हसतमुख आहेत. अमेरिकन, ब्रिटिश लोकांसारखं ‘हाय, हॅल्लो’ करायची पद्धत इथे नाही बघायला मिळत. तर हे लोक आपल्यासारखं हात जोडून प्रत्येकाचं स्वागत करतात. आपल्या संस्कृतीमध्येही दोन्ही हात जोडायची पद्धत आहे, पण आज किती लोक ते करतात?
मला सगळ्यात आश्चर्य याचं वाटलं की, इथे प्रत्येकाला रामायण आणि महाभारतातील गोष्टी आणि त्यातील व्यक्तिरेखांची इत्थंभूत माहिती होती आणि याचं कारण म्हणजे रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी इथल्या शालेय अभ्यासक्रमात आहेत. ऐकावं ते नवलंच. बरं रस्त्यांची नावंसुद्धा ‘जलान हनुमान’, ‘जलान जटायू’ अशी. इथल्या भाषेत ‘जलान’ म्हणजे ‘रोड’. रस्त्यांवर राम, लक्ष्मण, अर्जुन, हनुमान यांचे भलेमोठे पुतळे. हे सगळं बघून माझ्या मुलीने मला एक साधा प्रश्न केला, ‘आई, हे असं आपल्याकडे का नाही?’ रामायणातला राजा ‘बाली’ हा माकडांचा राजा होता म्हणून की काय पण इथे माकडांना खूप महत्त्व आहे! ‘एलास केडेतोण’ नावाचं माकडांचं मंदिर पण आहे. ‘मंकी फॉरेस्ट’ हे तर पर्यटकांचं अगदी आवडीचं ठिकाण आहे. प्रत्येक मंदिरात माकडांसाठी पाण्याची खास सोय केलेली असते. उलवातु मंदिरात तर त्यांच्यासाठी फळं विकली जातात.
चारही बाजूंनी मनमोहक सागरी किनारा लाभल्यामुळे इथे भरपूर वॉटर स्पोर्ट्स चालतात, पण कोणत्याही प्रकारची फसवेगिरी नाही. बनाना बोट, स्नोर्किलग, पॅरॉसेिलग सगळं काही आहे. पाणी स्वच्छ आणि नितळ असल्यामुळे समुद्राच्या आत जाऊन तिथले मासे आणि इतर जीव आपल्याला बघायला मिळतात. ‘तान्जुंग बेनोआ’ आणि ‘नासा दुआ’ हे वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. ‘लोविना बीच’ हे बालीतलं अजून एक आकर्षण. हा बीच डॉल्फिन मासे बघण्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळची मस्त सागरी हवा, नुकत्याच उगवलेल्या सूर्याची सोनेरी किरणं आणि समुद्रात मनसोक्त उडय़ा मारणारे भरपूर डॉल्फिन्स. असा अद्भुत देखावा बघून डोळ्यांचं पारणं फिटलं.
सागरी किनाऱ्यांबरोबर वेड लावतात ते इथले हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारे धबधबे, भातशेती, हिरवीगार शेतं, नद्या, तलाव आणि इथली छोटीछोटी गावं. इंडोनेशियामध्ये आढळणाऱ्या जिवंत ज्वालामुखींपकी एक बालीमध्ये माऊंट बातूर नावाचा डोंगर आहे. तिकडे ढग नसतील आणि आकाश निरभ्र असेल तर या डोंगरातून वाफा आणि ज्वाला निघताना दिसतात. ‘बातूर लेक’ नावाचं तळं हे याच ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलं आहे. याच्या जवळच गरम पाण्याचे कुंड आहेत. ‘कीर्ता गोसा’ इथलं कुंड हे इंद्रदेवाने बनवलं आहे असं तिथले लोक सांगतात. या पाण्यात आंघोळ केल्याने आपली सगळी पापं नाहीशी होतात, सगळे आजार आणि त्वचेचे रोग बरे होतात असं मानलं जातं.

आपल्याकडे देवघर घरात असतं तर इथे घराच्या बाहेर असतं. सकाळ-दुपार-संध्याकाळ इथे देवाची पूजा केली जाते. आपल्यासारखाच फुलांचा आणि फळांचा भोग इथल्या देवांना पण लावतात.

बालीमध्ये अतिशय सुंदर आणि देखणी मंदिरं आहेत. सगळी मंदिरं पौराणिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. ‘बसख’ हे बालीमधलं सगळ्यात मोठं िहदू मंदिर आहे. िहदू लोकांचे सगळे मोठे धार्मिक विधी याच मंदिरात केले जातात. या मंदिराच्या जवळपास गरम पाण्याचे कुंडं आहेत. ‘तनाह लॉट’ आणि ‘उलावातु’ ही मंदिरं खास सूर्यास्ताच्या वेळी बघितली जातात. उंच सुंदर मंदिरामागे अथांग समुद्र आणि अस्ताला जाणारा सूर्य, किरणांच्या वेगवेगळ्या छटा. हा देखावा तर अगदी विलोभनीय दिसतो. तनाह लोटचा शब्दश: अर्थ समुद्रातली जमीन. समुद्रात असलेल्या एका खडकावर हे देऊळ १५व्या शकतात, निराथा नावाच्या संताने बांधले.
भरती असताना तिथे जाता येत नाही. आम्ही पोहोचलो त्या वेळी भरतीची सुरुवात झालीच होती त्यामुळे थेट त्या देवळाजवळ जाता आलं नाही.
तसंही बालीतल्या देवळात सर्वाना प्रवेश नसतोच. काही उत्सवांच्या दिवशीच ती उघडतात. ‘तमन आयून’ नावाचं मंदिर इथलं राजेशाही मंदिर आहे. ‘उलान्दाणु’ मंदिर हे निसर्गरम्य ‘बेरातन’ तलावाच्या जवळ आहे. हा तलाव नेहमी ढगांनी आच्छादलेला असतो आणि बऱ्याच वेळा या परिसरात पाऊस असतो. अशी बरीच मंदिरं आहेत इथे. प्रत्येक मंदिर हे दुसऱ्यापेक्षा वेगळं. ‘जीव्हीके कल्चरल पार्क’ हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण. हे मंदिर नाही पण इथे गरुड आणि विष्णूचे सगळ्यात मोठे आणि उंच दगडी पुतळे आहेत. अतिशय सुंदर असं हे ठिकाण अप्रतिम शिल्पकलेचा प्रत्यय आणून देतं.
तसं बघायला गेलं तर इथली सगळी घरं म्हणजे मंदिरासारखीच दिसतात. कारण प्रत्येक घरात त्यांच्या कुलदैवतेचं मंदिर असतं किवा गणपतीची मूर्ती असते. आपल्याकडे देवघर घरात असतं तर इथे घराच्या बाहेर असतं. सकाळ-दुपार-संध्याकाळ इथे देवाची पूजा केली जाते. आपल्यासारखाच फुलांचा आणि फळांचा भोग इथल्या देवांना पण लावतात. एका मोठय़ा बास्केटमध्ये सगळी फळं घेऊन त्याचा भोग देवांना दाखवायचा आणि घरी जाऊन या फळांचं सेवन करायची पद्धत आहे. बाली लोक दिवसातून तीन वेळा असा नैवेद्य दाखवतात. यातले तबक ते लोक रोज स्वत:च्या हाताने तयार करतात (नारळाच्या कोवळ्या पानांपासून). त्यात फुले, समुद्री शेवाळे आणि घासभर का होईना खाऊ असतोच.
अशी तबकं जागोजाग दिसतात. घरोघरच्या स्तंभांवर, दुकानाच्या समोर इतकेच नव्हे तर आमच्या हॉटेलसमोर अगदी विमानतळावरच्या डय़ुटी फ्री शॉपमधेही हे होतेच. पण एक सगळ्यात वेगळं वाटलं ते म्हणजे मंदिरात जाताना इथे त्यांचा पारंपरिक पोशाख परिधान करावा लागतो. हे अगदी पर्यटकांनासुद्धा लागू होतं. बर्मुडा किवा जीन्स घातली असेल तर तुम्हाला इथली पारंपरिक ‘लुंगी’ लावावी लागते. बायकांना पण एक लांब वस्त्र नेसावं लागतं. ही अशी पद्धत आपल्याकडे नाही. पण मला ही परंपरा आवडली. अशाने त्या ठिकाणाचं पावित्र्य राखलं जातं.
बालीमध्ये मोठमोठय़ा कंपन्या आणि कारखाने नाहीत की मोठे उद्योगधंदे नाहीत. पर्यटन आणि मासेमारी हे दोन मुख्य व्यवसाय. शेती, हातमाग आणि वूड काìव्हग हे व्यवसाय पण प्रामुख्याने इथे चालतात. इथले चांदीचे दागिने, लाकडी मूर्ती, बाटिक यांना तर परदेशात खूप मागणी आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शुद्र आणि वैश्य हे चार वर्ण इकडेही बघायला मिळतात.
बाली संगीत आणि नृत्य हेदेखील अप्रतिम आहेत. ‘कीचक’ नावाच्या नृत्य प्रकारात तर कोणत्याही वाद्यांचा उपयोग न करता केवळ दातांच्या आणि तोंडाच्या सहायाने संगीत दिलं जातं. ‘वाली’ आणि ‘बेबेरिअन’ नावाचे नृत्यप्रकार आहेत. तसेच ‘बारोंग’ आणि ‘लागोंग’ हे पर्यटकांचे आवडीचे नृत्यप्रकार आहेत. एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे इथल्या नृत्यप्रकारात रामायण आणि महाभारतातल्या कथा दर्शवल्या जातात.
तर असं हे बाली बेट! सगळ्यांपासून वेगळं, देश विदेशातले लाखो पर्यटक आले तरीही आपली संस्कृती जपणारं, संस्कृतीची जाणीव करून देणारं, निसर्गरम्य आणि अगदी थक्क करून सोडणारं आहे.