विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष या आठवडय़ात प्रत्येक काम वेळेच्या आधी पार पाडण्याकडे तुमचा कल असेल. त्यात चूक होऊ देऊ नका. व्यापारउद्योगातील सरकारी कामे आणि कोर्टव्यवहार मार्गी लावाल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग अचाट-अफाट राहील. पूर्वी आळसाने लांबविलेली कामे तुम्ही मार्गी लावाल. कुटुंबीयांसह लांबच्या प्रवासाला जाण्याचे बेत ठरतील/ पार पडतील. सप्ताहाच्या मध्यात खरेदी किंवा मेजवानीचे बेत पार पडतील.
वृषभ एखाद्या कामामध्ये संथ गतीने होणारी प्रगती तुम्हाला थोडीशी त्रासदायक ठरेल. व्यापारउद्योगात पशाची आवक वाढण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्ही स्वत कराल त्याचा दर्जा उत्तम राहील. पण सोपवलेल्या कामामध्ये गडबड-गोंधळ झाल्यामुळे पश्चात्ताप होईल. घरामध्ये एखाद्या शुभ समारंभाला हजेरी लागेल. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या मध्यानंतर मार्गी लागतील.
मिथुन एखाद्या छोटय़ाशा घटनेमुळे तुमचा आशावाद जागृत होईल. व्यापारउद्योगात लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल. हातामध्ये केलेल्या कामाचे पसे पडतील. नोकरीच्या ठिकाणी काम नेहमीचेच असेल, पण घाईगडबडीमध्ये तुमच्या हातून चूक होणार नाही याची काळली घ्याल. कामात आळस होणार नाही. घरामध्ये नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्याकडून एखादी शुभवार्ता कळेल. सगळ्यांचा पार्टीचा मूड असेल.
कर्क प्रत्येक काम विचारपूर्वक करणारी तुमची रास आहे. या आठवडय़ात आधी कृती मग विचार असा तुमचा पवित्रा असेल. प्राप्तीचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे तुमचा कामाचा उत्साह बळावेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून तुमचा फायदा आहे अशा कामांना प्राधान्य द्या. ज्यांना नोकरीत बदल पाहिजे आहे त्यांना चांगले ग्रहमान आहे. घरामध्ये तुमचे एक वेगळेच रूप इतरांना बघायला मिळेल. माझे तेच खरे असा तुमचा बाणा राहील.
सिंह ग्रहमान तुमची महत्त्वाकांक्षा वाढणारे आहे. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या कामातून गिऱ्हाईकांकडून स्तुती ऐकायला मिळेल. वसुली झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या स्वरूपात जे बदल होतील ते तुमच्या पथ्यावर पडतील. एखाद्या सवलतीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये सर्वाना उपयोगी पडेल असा निर्णय तुम्ही घ्या. कुटुंबीयांसह देशात किंवा परदेशात प्रवास करण्याची वेळ येईल.
कन्या गेल्या १-२ महिन्यांमध्ये तुमची जी गरसोय झालेली असेल त्याची कसर भरून काढायचे तुम्ही ठरवाल. व्यापारउद्योगात जी कामे लांबलेली होती त्यांना सप्ताहाच्या मध्यात मुहूर्त लाभेल. तुमच्या गरजेइतके पसे मिळतील. नोकरीमध्ये तुमचा कामाचा उरक दांडगा असेल. सहकारी त्यांच्या स्वार्थाकरिता तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. प्रवासाच्या वेळेला धाडस करू नका.
तूळ या आठवडय़ात तुम्ही तुमचे करिअर आणि व्यक्तिगत आनंदाला महत्त्व द्या. आठवडय़ाची सुरुवात व्यापारात थोडी खर्चीक होईल. बरेच दिवस लोंबकळलेले काम तुम्ही आटोक्यात आणाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला नवीन कामासंबंधी माहिती काढण्याची सूचना देतील. घरामध्ये सर्वानुमते एखादा आनंददायी कार्यक्रम ठरेल. त्यामध्ये तुमच्या कौशल्याला बराच वाव असेल. मुलांच्या हट्टाला तुम्ही बळी पडाल.
वृश्चिक ग्रहमान संमिश्र आहे. व्यापार-उद्योगात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहिला होतात, त्यांच्याकडून आयत्या वेळेला नकारघंटा ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या व्यक्तींकडून काम करून घेण्यासाठी ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ अशी नीती तुम्हाला वापरणे भाग पडेल. घरामध्ये एखादी चांगली गोष्ट तुम्ही इतरांना समजून सांगायला जाल. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तुम्हाला वाईट वाटेल.
धनू एकदा कामाला लागल्यानंतर कामाचा पसारा इतका वाढेल की तुम्हाला थोडीही विश्रांती मिळणार नाही. त्यातून पसे चांगले मिळतील, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी तुमचा गरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. अशा कामात लक्ष घालू नका. घरामधल्या व्यक्तींच्या हट्टापायी तुम्हाला ठरविलेल्या कामात बदल करावा लागेल. त्यातून वेळ चांगला जाईल, पण खिशावर ताण येईल. नातेवाईकांशी फटकळ बोलू नका.
मकर या आठवडय़ामध्ये आधी कृती आणि नंतर विचार, असा तुमचा प्रकार असेल. व्यापारउद्योगात जे काम विनाकारण रेंगाळलेले होते त्या कामात गती आणण्यासाठी धक्का स्टार्ट या पद्धतीचा अवलंब कराल. आठवडय़ाच्या मध्यात अपेक्षित लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक काम संपवण्याची घाई असेल.एखादा खर्चीक बेत सर्वाच्या समाधानाकरिता हातात घ्यावा लागेल. प्रवासाच्या वेळेला घाईगडबड टाळा.
कुंभ एकाच वेळी तुमचे घर आणि करिअर या दोन आघाडय़ा तुम्हाला सांभाळायच्या असल्याने तुमचा गोंधळ होईल. व्यापारउद्योगातील महत्त्वाच्या गाठीभेटी आणि प्रवास आठवडय़ाच्या सुरुवातीला उरका. नोकरीच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक कामे करायला जाऊ नका. घरामध्ये एखादा सोहळा ठरला असेल तर त्याकरिता पशाची तरतूद करावी लागेल. त्या वेळी बजेटचे भान राहणार नाही.
मीन आठवडय़ाचे ग्रहमान संमिश्र आहे. व्यापारउद्योगात तुम्ही शांतपणे काम करायचे ठरवाल. पण पसे मिळवून देणारे काम मिळाल्याने पुन्हा तुमची धावपळ होईल. आठवडय़ाच्या सुरुवातीला छोटासा प्रवास करावा लागेल. नोकरदार व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतील. घरामध्ये सगळ्यांनी आपल्याला समजून घेतले पाहिजे असे तुम्हाला वाटेल. विरोध करू नये.