मेष ज्या गोष्टी तुम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर मार्गी लावल्या होत्या, त्यामध्ये अचानक वेगळी कलाटणी मिळेल.  तुम्हाला वाकडी वाट करून पुढे जावे लागेल. व्यापारउद्योगात ठरविलेले काम पूर्ण करण्याकरिता बरीच मेहनत करावी लागेल.  नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्यांच्या सूचना बदलल्यामुळे तुम्हाला गोंधळात पडल्यासारखे होईल. घरामध्ये प्रत्येकाच्या गरजा समजून घेणे थोडेसे जड जाईल. सप्ताह धावपळीचा जाईल.

वृषभ काही बदल असे असतात की, जे आपण प्रयत्न करूनही टाळू शकत नाही. या आठवडय़ामध्ये एखादा असा बदल स्वीकारावा लागेल.  व्यापारउद्योगात काही दिलासा देणाऱ्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवून वरिष्ठांचे मूड सांभाळा. नोकरीमध्ये बदल करण्यापूर्वी त्याचा साधकबाधक विचार करा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे तंत्र सांभाळावे लागेल. एखादा छोटा समारंभ ठरेल.

मिथुन सरळ चाललेल्या कामामध्ये  नवीन प्रयोग करून बघण्याची खुमखुमी येईल, पण त्यामुळे तुमचा तोटा होणार नाही याची खबरदारी घ्या. व्यापारउद्योगात तुमच्या कार्यपद्धतीमध्ये थोडेसे फेरफार करणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अचानक वेगळ्या प्रकारचे काम तुम्हाला सांगतील. त्यामुळे तुमचे नियोजन तुम्हाला उपयोगी पडणार नाही. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी शक्यतो वादविवाद टाळावा.

कर्क सभोवतालचे वातावरण जसे असते तसे तुम्ही तुमचे धोरण बदलता. या आठवडय़ात करियरमध्ये तुम्ही आधुनिक असाल तर घरामध्ये तुमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न कराल. व्यापारउद्योगात  कोणत्याही अडथळ्यांनी गांगरून न जाता तुम्ही हाती घ्याल ते तडीस न्याल. पशाची आवक वाढेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेच्या धोरणामध्ये काही मोठे बदल होण्याचे संकेत दिसू लागतील. घरामध्ये इतरांना तुमचा आधार वाटेल.

सिंह एखादी गोष्ट मिळविण्याकरिता या आठवडय़ात तुम्ही वेडावाकडा निर्णय घ्याल, त्यामुळे थोडासा धोका संभवतो. व्यापारउद्योगात सभोवतालच्या व्यक्तींचा मतलब समजल्याशिवाय तुमचे विचार व्यक्त करू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी फटकून वागलात तर त्याचा पुढे त्रास होईल. ठरविलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. घरामध्ये दोन पिढय़ांतील तफावत जाणवेल. मुलांच्या उपद्व्यापाकडे लक्ष देणे भाग पडेल.

कन्या काही बदल असे असतात जे आपल्याला बिलकूल नको असतात, अशा वेळेला जास्त विचार न करता ‘कालाय तस्म नम:’ असे म्हणून पुढे जाणे योग्य ठरेल. व्यापारउद्योगात बाजारातील चढ-उतारांचा अभ्यास केल्यानंतर तुमचे ठरविलेले बेत थोडे फार बदलावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड बदलत राहतील. त्यानुसार काम करणे कठीण होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या विचित्र वागणुकीला तोंड द्यावे लागेल.

तूळ या आठवडय़ात काही नवीन बदलांची नांदी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या हालचालींकडे लक्ष असू द्या. जे पसे मिळतील ते हातात राखून ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. आपण केलेल्या कामाचे काहीच महत्त्व नाही असे वाटेल. घरामधे प्रत्येकाची मोट बांधणे थोडेसे कठीण होईल. एखादा कार्यक्रम निश्चित होण्यापूर्वी त्यावर उलटसुलट चर्चा होईल

वृश्चिक एखाद्या घटनेमुळे किंवा कारणांमुळे या आठवडय़ात तुमचे ठरलेले बेत अचानक रद्द करावे लागतील. त्यामुळे पर्यायी योजनेचा विचार करून ठेवा. व्यापारउद्योगात पूर्वी जे खर्च तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला होता ते आता अनिवार्य होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड बदलत राहिल्याने तुमची तारांबळ उडेल. घरामध्ये छोटय़ा कारणावरून तुमचा रागाचा पारा वर जाईल. रक्तदाब, हृदयविकार असेल तर अतिश्रम टाळा.

धनू माणूस अनुभवाने शहाणा होतो. जे अनुभव तुम्हाला नुकतेच आले होते त्यावरून निष्कर्ष काढा. कदाचित त्याकरिता तुम्हाला तुमची वागण्या-बोलण्याची पद्धत बदलावी लागेल. व्यापारउद्योगात स्पध्रेला तोंड देण्यासाठी नवीन व्यक्तींशी हातमिळवणी करण्यापूर्वी त्याच्यासंबंधी नीट माहिती मिळवा. नोकरीमध्ये स्वत:ची पात्रता वाढविण्याकरिता एखादे नवीन प्रशिक्षण घ्यावे लागेल. नवीन भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या.

मकर तुम्हाला कामाचा थोडासा कंटाळा आला असेल. आपले कर्तव्य करायचे, पण ते आरामात करायचे असे तुम्ही ठरवाल. पण अचानक घडणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला तुमचा बेत रद्द करावा लागेल. व्यापारउद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जे नियोजन केलेले होते त्यामध्ये फेरफार करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा मूड बदलल्यामुळे तुम्हाला त्यांच्या तालावर नाचावे लागेल. घरामध्ये आपुलकीची व्यक्ती हजेरी लावेल.

कुंभ या आठवडय़ात तुम्ही किती काम करता याला महत्त्व नसून समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही काम कसे करून घेता हे महत्त्वाचे. व्यापारउद्योगात एखादा विचित्र अनुभव येईल. त्यामुळे कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आधी ठरलेले बेत बदलतील त्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींशी एखाद्या प्रश्नावरून तात्त्विक मतभेद होतील. अशा वेळी त्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या.

मीन दोन वेगवेगळ्या आघाडीवर दोन वेगळे अनुभव देणारा आठवडा आहे. घरामध्ये एखादा विचित्र अनुभव येईल. तर करियरमध्ये तुम्ही कोणतेही काम धाडसाने पूर्ण कराल. व्यापारउद्योगात पशासंबंधी निर्णय घेताना त्याचा किती फायदा होईल याचे गणित कागदावर मांडून बघा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नका.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader