विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष
ग्रहमान संमिश्र आहे. कोणत्या कामाला किती वेळ द्यावा हे तुम्ही ठरवा नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होईल. प्रकृतीचे काही जुने आजार असतील तर त्यावर योग्य उपचार करा. व्यापार उद्योगात एखादा जुना प्रश्न  सोडवण्यात बराच वेळ जाईल. जुनी देणी द्यावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी केलेले चांगले काम विसरून वरिष्ठ चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद,  भांडणे होतील.

वृषभ ग्रहमान संमिश्र आहे. मनातल्या कल्पना कृतीत आणण्यासाठी स्वयंभू बनणे चांगले. व्यापारउद्योगात स्पर्धकांशी तुलना करून दु:खी होऊ नका. गिऱ्हाईकांना चांगली सेवा देऊन जास्तीत जास्त फायदा कमविण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. व्यक्तिगत जीवनात सरकारी नियम आणि कायदे यांचे उल्लंघन महागात पडेल. घरामध्ये एखादे चुकवता येणारे कर्तव्य पार पाडावे लागेल.

मिथुन तुम्ही सतत नावीन्याच्या शोधात असल्यामुळे या आठवडय़ात काहीतरी वेगळे केले पाहिजे, ही भावना तुम्हाला स्वस्थ्य बसू देणार नाही. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांची वर्दळ कमी असल्यामुळे तुम्हाला झालेल्या उलाढालीवर नजर टाकता येईल. पशाची आवक थोडीशी कमी असल्यामुळे मनामध्ये एक प्रकारची हळहळ वाटत राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यामागे एखादे नवीन काम लावून देतील.

कर्क आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल. तुमचा आत्मविश्वास कमी असेल, पण एकदा काम हातात घेतल्यानंतर तुम्ही त्याचा फडशा पाडाल. व्यापारउद्योगात  आठवडय़ाच्या शेवटी पूर्वी केलेल्या कामातून वसुली होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याकरिता बरीच मेहनत घ्याल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आवश्यक कर्तव्य पार पाडले जाईल.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती सहजगत्या मिळेल असा तुमचा समज असेल, पण प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर त्यातील अडचणी लक्षात येतील.  व्यापारउद्योगात सरकारी कर आणि इतर काही देणी असतील तर ती वेळेत देऊन टाका. गिऱ्हाईकांकडून पसे वसूल करताना त्यांचा अपमान होणार नाही याकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या पुढे पुढे करू नका.

कन्या दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळा अनुभव देणारा हा सप्ताह आहे. करियरमध्ये अनेक नवीन कल्पना तुम्हाला दंग ठेवतील. पण घरामध्ये मात्र कर्तव्यापासून तुमची सुटका होणार नाही. या दोन्हीचा समन्वय साधणे थोडे जड जाईल. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या कामातून चांगली वसुली होईल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामगिरीकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल.

तूळ आठवडय़ाची सुरुवात चांगली होईल. व्यापारउद्योगात एकंदरीत पैशाची गोळाबेरीज केल्यावर असे लक्षात येईल की, उधारीचे व्यवहार जास्त आहे. जुनी वसुली करताना गिऱ्हाईकांना नाराज करू नका. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी अर्धवट ठेवलेले काम पूर्ण  होईल. त्यामुळे नवीन कामात थेडेसे दुर्लक्ष कराल. घरामध्ये मौजमजेच्या वेळेला मात्र कोणीच साथ देणार नाही. प्रकृतीच्या जुन्या तक्रारींकडे लक्ष द्या.

वृश्चिक दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारा हा आठवडा आहे. तुमच्या करियरमध्ये काहीतरी चांगले काम करावे ही इच्छा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. याउलट घरामध्ये न चुकवता येणाऱ्या कर्तव्याला सामोरे जावे लागेल. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांची ये-जा कमी असल्याने तुम्हाला थोडासा कंटाळा येईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या शब्दाला मान द्या.

धनू सध्या शनीचे भ्रमण तुमच्या राशीत असल्याने तुम्हाला मधूनच निराशा येते. पण या आठवडय़ात एखादी चांगली घटना घडल्यामुळे तुमच्यात एक नवीन आशावाद निर्माण होईल. व्यापार-उद्योगातील सरकारी कामे आणि कोर्टव्यवहार याकडे लक्ष द्या. पशाची आवक समाधानकारक असल्याने त्या आघाडीवर तुम्हाला चिंता नसेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून एखादे आश्वासन घेऊन तुम्हाला शब्दात पकडतील.

मकर तुमची रास अत्यंत संयमी आहे. कोणताही निर्णय तुम्ही घाईने घेत नाही. व्यापारउद्योगात बाजारपेठेमध्ये आपले महत्त्व वाढवावे या उद्देशाने एखादी सवलत किंवा सूट द्याल. गिऱ्हाईकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय महत्त्वाचा निर्णय अंमलात आणू नका. काहीजणांना बदली किंवा कामातील बदलाकरीता प्रयत्न करावासा वाटेल. घरामध्ये सगळ्यांशी हसून खेळून रहा.

कुंभ ग्रहमान परस्परविरोधी आहे कोणतेही काम सरळ होणार नाही  पण प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. व्यापारउद्योगात एखादा अनपेक्षित प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. तो सोडविण्यात बराच वेळ जाईल. पूर्वी तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर त्याचा भरुदड सोसावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड सांभाळण्याकरीता त्यांच्या तालावर नाचावे लागेल. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीविषयी चिंता वाटेल.

मीन या आठवडय़ात तुम्हाला सुरुवातीला काहीच काम करू नये असे वाटेल, पण नंतर तुमचा उत्साह हळूहळू वाढेल. कोणतेही काम करताना त्यातील बारकावे समजून घ्या. व्यापारात घाईगडबडीत तुमच्या हातून कायदेशीर चूक झाली असेल तर त्याचा भरुदड सहन करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमच्या उत्साही स्वभावाचा फायदा होईल.

Story img Loader