विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष
मंद गतीने काम करायला तुम्हाला आवडत नाही, पण या आठवडय़ात काही कारणाने ठरविलेल्या कामात अडथळे आल्यामुळे तुमचा नाइलाज होईल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी व्यवहार करताना त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहा.  नोकरीच्या ठिकाणी सहकारी त्यांच्या मागणीकरिता तुमची ढाल करतील. तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास करावा लागेल. घरामधील जबाबदारी पूर्ण करण्याकरिता महागडा पर्याय निवडावा लागेल.

वृषभ ग्रहमान बदलले की सर्व काही बदलते. अशा वेळी आपल्या नियोजनाचा फारसा उपयोग होत नाही याची आठवण ठेवा. प्रत्येक काम करताना एखादा पर्याय हातात ठेवणे हितावह ठरेल. व्यापार-उद्योगात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांची काहीतरी अडचण निघण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे वागणे-बोलणे बदलल्यामुळे कोडय़ात पडाल. घरामधल्या प्रश्नावरून मोठय़ा व्यक्तींशी मतभेद होतील.

मिथुन खूप नियोजन करून आखलेल्या गोष्टीला अचानक काही घटना घडल्यामुळे आपल्या नियोजनाला अर्थ राहात नाही, असा अनुभव या आठवडय़ात येईल. त्यामुळे पर्यायी योजना तयार ठेवणे आवश्यक आहे. व्यापार-उद्योगात केलेल्या कामाची वसुली करताना गिऱ्हाईकांशी वादविवाद होतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे वरिष्ठांना महत्त्व वाटणार नाही. घरामध्ये तात्त्विक मुद्दय़ावर वयोवृद्ध व्यक्तीशी मतभेद होतील.

कर्क तुमची रास नेहमी कर्तव्यालाच प्राधान्य देते. या तुमच्या स्वभावानुसार तुम्ही स्वत:ला कामामध्ये जखडून घ्याल. व्यवसाय उद्योगात सरकारी कामे पूर्ण करण्यात बराच वेळ जाईल. व्यापारीवर्ग आणि कारखानदार यांना कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी आपले काम संपल्याशिवाय इतरांना मदत करण्याच्या भानगडीत पडू नका. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.

सिंह वातावरणामध्ये एकदम बदल झाल्यामुळे तुम्हाला तुमची तत्त्वे बाजूला ठेवून काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या विरुद्ध तुम्ही काही खेळी केली असेल तर त्यांच्याकडून प्रतिकार होईल. सरकारी कर किंवा कोर्ट व्यवहार यामध्ये जातीने लक्ष घाला. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वादविवाद न करता तुम्ही तुमचे काम त्यांच्या सूचनेनुसार करत राहा. घरामध्ये मुलांच्या प्रगतीमुळे थोडी चिंता राहील

कन्या कर्तव्य आधी की मौजमजा असा प्रश्न उद्भवल्यास कर्तव्याला महत्त्व द्यावे लागेल. व्यापार-उद्योगात  पशाचा ओघ चालू राहील. कोर्ट व्यवहार किंवा सरकारी कामांना प्राधान्य देणे भाग पडेल. नोकरीमध्ये तुमच्यामधील पशाचे आकर्षण जागृत होईल. अधिकाराचा गरवापर करून स्वत:च्या फायद्याकरिता कमाई करून घेण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तीचा चांगला सल्ला तुम्हाला पटणार नाही.

तूळ ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला मोठेपणा देतील. त्याच्या बदल्यात नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. व्यापार-उद्योगात  महत्त्वाचे करार करताना त्यातला गíभतार्थ समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल, पण वरिष्ठ मात्र चुकांवर बोट ठेवतील. घरामध्ये तुम्ही माझे तेच खरे असा हट्ट धराल. वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद होतील.

वृश्चिक तुमचा मानसिक उत्साह खूप असेल. पण त्यामध्ये मिळणारे यश प्रकृतीवर अवलंबून असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. व्यापारउद्योगात स्वत:ची प्रतिष्ठा टिकविण्याकरिता काही पसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काय वाटते, याला महत्त्व न देता वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. बेकार व्यक्तींना नोकरीकरिता तडजोड करावी लागेल. घरामध्ये एखादे काम जर तुमच्या हातून विसरले तर बुजुर्गाना राग येईल.

धनू पसा ही एक अशी गोष्ट आहे की जी हितसंबंध जोडते किंवा तोडते. या आठवडय़ात या गोष्टी आठवण ठेवून पशाचे व्यवहार जपून करा. व्यापार-उद्योगात हातातोंडाशी आलेले आíथक व्यवहार काही कारणाने लांबण्याची शक्यता आहे. जोडधंद्यामुळे तुम्हाला थोडीशी साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना काही आश्वासन दिले असेल तर ते न विसरता पूर्ण करा. घरामध्ये जुन्या प्रॉपर्टीसंबंधीचे प्रश्न अचानक उद्भवतील.

मकर तुम्ही कोणताही निर्णय सावधतेने घेता. पण या आठवडय़ात तुमचा एखादा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात एखादा मोठा प्रतिस्पर्धी निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला कदाचित तुमच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचे निगुतीने पालन करा. महत्त्वाची कामे विसरून जाऊ नका. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे, प्रगतीमुळे चिंता वाटेल.

कुंभ कामाचा दर्जा टिकून राहण्यासाठी मन आणि शरीर या दोन्हीचे स्वास्थ्य जपणे आवश्यक आहे. व्यवसाय-उद्योगात स्पर्धक एखादी चाल करून तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणण्याची शक्यता आहे. एखादी हाताखालची व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या पूर्ण परवानगीशिवाय महत्त्वाचे कोणतेही काम करू नका. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तीच्या गरजांमुळे तुम्ही गोंधळात पडाल.

मीन गेल्या काही महिन्यांत तुम्हाला अडचणी येऊनही पशाची गरसोय सहन करावी लागत नव्हती. पण आता मात्र १-२ महिने तुम्हाला कमी पशात भागवावे लागेल. व्यापार-उद्योगात गेल्या आठवडय़ात जी कामे बाकी राहिली होती ती कामे पूर्ण करण्यावर तुमचा भर असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. घरामध्ये मुलांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल.

Story img Loader