विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष व्यापार-उद्योगात कितीही पैसे मिळाले तरी ते अपुरे असतात, असे वाटून थोडासा आराम करावासा वाटेल. पूर्वी लांबवलेली कामे पूर्ण करून टाका. नोकरीच्या ठिकाणी न आवडणारे काम वरिष्ठांच्या आग्रहामुळे पूर्ण करावे लागेल. नवीन नोकरीच्या कामात तांत्रिक कारणामुळे विलंब होईल. घरामध्ये अचानक पाहुणे हजेरी लावतील. त्यामुळे तुमची धावपळ उडेल. मोडतोड दुरुस्ती याकरिता पसे खर्च करावे लागतील.
वृषभ एकीकडे कामाचा आणि दुसरीकडे मौजमजा करण्याचा इरादा निर्माण होईल. कर्तव्याला प्राधान्य द्या. व्यापार-उद्योगात ज्यांच्याकरिता पूर्वी चांगले काम केले होते, त्यांच्याकडून नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी बठे आणि फिरतीचे अशी दोन्ही प्रकारची कामे करावी लागतील. कोणत्याही कामात घाईने निर्णय घेऊ नका. घरात वयोवृद्ध व्यक्तीच्या जीवनातील शुभप्रसंग साजरा होईल.
मिथुन सोपी वाटलेली कामे सहजगत्या पार पडणार नाहीत. त्यासाठी स्वत:ला कंबर कसून उभे रहावे लागेल. व्यापारीवर्गाला आठवडय़ाचा मध्य लाभदायक ठरेल. कामाचे पसे हाती पडल्यामुळे काही जुनी देणी देता येतील. नोकरीमध्ये काही जणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल, पण वरिष्ठांच्या बऱ्याच अटी असतील. घरामध्ये एखाद्या मुद्दय़ावरून मोठय़ा व्यक्तीशी तात्त्विक मतभेद होतील. प्रकृतीच्या तक्रारींवर उपाय मिळेल.
कर्क काम, काम आणि काम यामुळे मधूनच तुमच्या रागाचा पारा वर जाईल. व्यापारउद्योगात बऱ्याच दिवसांनंतर एखादी चांगली घटना घडल्यामुळे तुमच्यातला आशावाद जागृत होईल. पण अतिउत्साहाच्या भरात कोणतेही धाडस करायला जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी सरळ वरिष्ठांच्या हो ला हो म्हणा. जवळच्या पाहुण्यांमुळे तुम्हाला आलेला कंटाळा कमी होईल. मुलांची एखादी मागणी तुम्ही पूर्ण कराल.
सिंह ठरविलेल्या बेतामध्ये बदल कराल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात लाभदायक होईल. तुम्हाला चांगले काम झाल्यासारखे वाटेल. एखादा गुंतागुंतीचा व्यवहार मार्गी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य देतील. त्यामध्ये जास्तीचे काम हसतखेळत करा. घरामध्ये एखादा आनंददायी सोहळा पार पडेल. वयोवृद्ध व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रॉपर्टीसंबंधी प्रश्नात मार्ग निघेल.
कन्या पूर्वी खूप अवघड वाटलेले काम सोपे होईल. व्यापारउद्योगात तुमच्या हातून चांगले काम होईल. पशाची आवक वाढेल. एखाद्या कमिटीवर तुमची नेमणूक होईल. नोकरीत चांगल्या संधीकरिता निवड होईल. काहीजणांना थोडय़ा अवधीकरिता परदेशी जाता येईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींच्या जीवनातील आनंददायी प्रसंग साजरा होईल. वृद्धांना लांबच्या व्यक्ती भेटतील.
तूळ पूर्वी वाया गेले आहे असे वाटत होते अशा कामाचा उपयोग होईल. व्यापार उद्योगाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या मोठय़ा कमिटीवर नेमणूक होईल. पशाची आवक समाधानकारक राहील. नोकरदार व्यक्तींना आठवडा यशदायक ठरेल. एखादे अवघड काम सहज पार पडेल. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान देतील. नवीन जागेमध्ये स्थलांतर होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळानंतर एखाद्या बुजुर्ग व्यक्तीला भेटण्याचा योग येईल.
वृश्चिक घरामध्ये इतरांच्या कलाने वागावे लागेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल. तिचे विचार ऐकून काही नवीन कल्पना सुचतील. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे विचार जरी योग्य असले तरी तुम्हाला ते पटणार नाहीत. त्यावरून इतरांशी थोडेसे खटके उडतील. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.
धनू सध्या महत्त्वाच्या ग्रहांनी तुमच्या विरुद्ध जणू काही संप पुकारला आहे. त्यामुळे काही करायला गेले की त्यातून नवीन प्रश्न उभा राहतो. कोणतेही प्रयोग न करता जे आणि जसे चालू आहे त्यावर समाधान माना. हातातले पसे काटकसरीने वापरा. नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते याची आठवण ठेवून वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामध्ये नातेवाईकांशी जपून बोला. आवडत्या छंदामध्ये मन रमवा.
मकर केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. त्यातून फायदा होईल. त्यामुळे तुमच्या हालचालीत एक प्रकारचा रुबाब दिसून येईल. व्यापारउद्योगात पसे कमावण्याची संधी चालून येईल. कारखानदारांना कामाचा विस्तार करता येईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते तुम्ही पूर्ण करून दाखवाल. बढतीचे योग संभवतात. घरामध्ये तुमचा सल्ला सर्वाना उपयोगी पडेल. तरुण मंडळींना नवीन व्यक्तीशी मत्री करता येईल.
कुंभ कोणत्याही प्रश्नावर उत्तर शोधून काढण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हाल. व्यापारी वर्गाचे इरादे बुलंद असतील. त्यांच्या कामात अडथळे येतील, पण त्याला न डगमगता ते पुढील मार्गक्रमण चालूच ठेवतील. नोकरीच्या ठिकाणी एखादा ‘गॉडफादर’ तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुमचे कामातील मनोधर्य वाढेल. मात्र संस्थेच्या सवलतींचा गरफायदा घेऊ नका. घरामध्ये तुमचा आधार वाटेल. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात.
मीन कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला आराम असा फॉम्र्युला ठेवाल. व्यापारउद्योगात तुमच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळेल. पसे कमी मिळाले तरी गरजा भागतील. वरिष्ठांना खुश करण्याकरिता त्यांच्या आवडीचे काम कराल. जुने सहकारी भेटल्यामुळे थोडा वेळ आनंदात जाईल. नवीन नोकरीचे काम होईल. घरामध्ये एखाद्या समारंभाच्या निमित्ताने पाहुण्यांची हजेरी लागेल.