विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष व्यापारउद्योगात शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला तर तुम्हाला चांगले यश मिळेल. नोकरीमध्ये नियोजनबद्ध कामातून अवघड उद्दिष्ट साध्य कराल. या आठवडय़ात मंगळ दशमस्थानात प्रवेश करेल. तेथे तो नोव्हेंबपर्यंत राहील. हा संपूर्ण कालावधी तुम्हाला दगदगीचा, पण उत्तम यश देणारा आहे. नोकरीमध्ये तुमची बढतीकरिता रदबदली होईल. घरामध्ये चांगले काम केल्यामुळे कौतुकाला पात्र ठराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ अगदी साधी आणि सोपी वाटणारी कामे बरीच दगदगीची ठरतील. त्यामुळे कधीकधी नको ते काम असे तुम्हाला वाटेल. व्यापारउद्योगात देण्या-घेण्यावरून कोणाशीही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीमध्ये संस्थेतल्या राजकारणाकडे लक्ष न देता केवळ आपल्या कामावर लक्ष द्या. नोव्हेंबपर्यंतच्या कालावधीमध्ये  गुरू आणि शनी चांगले नसले तरी मंगळामुळे येणाऱ्या प्रश्नांमधून तुम्ही तरून जाल.

मिथुन बहुतांशी ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे नवनवीन कल्पना तुमच्या मनात येत राहतील.  व्यापारउद्योगातील एखादी चांगली संधी पसे मिळवून द्यायला उपयोगी पडेल. नोकरीच्या कामात वरिष्ठांचा सल्ला आणि सहकाऱ्यांची मदत या दोन्हींचा उपयोग होईल. घरामध्ये एखादे कार्य ठरविताना मनात गोंधळ असेल. नोव्हेंबपर्यंतचा कालावधी फसवा आहे. ज्या गोष्टी तुम्ही करायला नकोत त्याचा मोह होईल.

कर्क व्यापारउद्योगात सप्ताहाच्या मध्यात नशिबाची तुम्हाला साथ मिळेल.  घरामध्ये प्रत्येक जण तुमच्या मदतीवर अवलंबून असेल. या आठवडय़ात मंगळ राशीबदल करून सप्तमस्थानात प्रवेश करणार आहे. त्याचे वास्तव्य नोव्हेंबपर्यंत असेल. या दरम्यान जीवनात मोठे बदल संभवतात. नोकरीच्या निमित्ताने देशात किंवा परदेशात जाण्याचे योग संभवतात.  त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिगत आणि सांसारिक जीवनावर होईल.

सिंह व्यापारउद्योगात एखादे धाडस करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामगिरीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवाल. या आठवडय़ात मंगळ राशीबदल करून षष्ठस्थानात प्रवेश करेल तेथे तो नोव्हेंबपर्यंत राहील. हा संपूर्ण कालावधी तुमच्या दृष्टीने खूप धावपळीचा जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात खूप मोठे आव्हान आहे अशा कामाकरिता तुमची निवड होईल.

कन्या व्यापारउद्योगात जे काम होईल त्यावर तुम्ही समाधानी असाल. नोकरीच्या ठिकाणी अवघड काम नियंत्रणात आल्यामुळे बरे वाटेल. घरामधल्या व्यक्तीविषयी तुम्ही थोडेसे हळवे बनाल. या आठवडय़ात मंगळ पंचमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य पुढील सहा महिने असेल. दरम्यान व्यापारउद्योगात मोठी मजल माराल.  घरामध्ये मात्र मुलांच्या प्रगतीविषयी/ आवडत्या व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी तुम्हाला चिंता जाणवेल.

तूळ तुमच्या राशीचा अधिपती बुध असल्यामुळे तुम्ही सतत काहीतरी विचार करत असता. या आठवडय़ात तुमचे अंदाज आडाखे बरोबर ठरतील. व्यापारउद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला पसे मिळाल्याने तुम्ही खूश असाल. नोकरीतल्या कामाच्या निमित्ताने वेगळ्या व्यक्तींची ओळख होईल. घरामधील वातावरण आनंदी व उत्साही असेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला आवडते ते मिळाल्याने जास्त पशाची अपेक्षा ठेवाल.

वृश्चिक व्यापारी वर्गाला सप्ताहाच्या मध्यानंतर चांगले पसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान मिळाल्याने तुम्ही खूश असाल. घरामध्ये प्रिय व्यक्तींकडून तुमची विचारपूस केली जाईल. या आठवडय़ात राश्याधिपती मंगळ तृतीयस्थानात प्रवेश करणार आहे. नोव्हेंबपर्यंतचा कालावधी प्रगतिकारक ठरेल. जवळजवळ २०१५ सालापासून अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण होतील. घरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे काही बदल होतील.

धनू व्यापारउद्योगात भरपूर काम करावेसे वाटेल. त्याला योग्य व्यक्तींची साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचा संस्थेला फायदा मिळेल. त्याचे श्रेय मिळण्याचे आश्वासन मिळेल. घरामध्ये एखादा प्रश्न सोडविण्याकरिता धाडसी निर्णय घ्याल. या आठवडय़ात मंगळ राशीच्या धनस्थानात प्रवेश करेल. नोव्हेंबपर्यंतचा कालावधी आíथकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल.

मकर या आठवडय़ात मंगळ तुमच्याच राशीत येणार आहे. तेथे तो ६ महिने राहील. हा कालावधी तुमच्यासाठी मोठय़ा संक्रमणाचा आहे. या दरम्यान व्यापारउद्योगात दीर्घकाळ चाललेले काम बंद करून त्याच्या जागी नवीन कामाला सुरुवात होईल. नोकरदार व्यक्तींना बदली, बढती किंवा परदेशागमनामुळे स्थलांतर करावेसे वाटेल. व्यक्तिगत जीवनात मोठे वैचारिक बदल आणि प्रकृती यामुळे एक प्रकारचे वेगळेपण जाणवेल.

कुंभ या आठवडय़ात तुम्ही किती काम करता याला महत्त्व नसून समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही काम कसे करून घेता हे महत्त्वाचे. त्यामुळे सगळ्यांशी सलोख्याचे बंधन ठेवा. व्यापार-उद्योगात एखादा विचित्र अनुभव येईल. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या निर्णयामुळे तुमचा गोंधळ उडेल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींचे मत शांतपणे ऐकून घ्या. जोडीदाराला सांभाळण्यासाठी त्याचे हट्ट पुरवावे लागतील.

मीन व्यापारउद्योगात वसुली करताना गिऱ्हाईकांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून टाका. घरामध्ये सगळ्यांना तुमचा आधार वाटेल. मंगळ राशीच्या लाभस्थानात प्रवेश करून नोव्हेंबपर्यंत राहील. हा संपूर्ण कालावधी आíथकदृष्टय़ा उत्तम राहणार आहे.  नोकरीमध्ये जादा पगारवाढ किंवा पदोन्नती शक्य आहे. घरामध्ये अनेक नवीन गोष्टी पूर्ण करू शकाल.