मेष प्रत्यक्षात वेळ आली की ज्या घडामोडी घडतील त्यामुळे तुमचे कष्ट वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. व्यापार-उद्योगात पूर्वी तुमच्या हातून कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर त्याची नुकसानभरपाई तुम्हाला करून द्यावी लागेल. अशा वेळी सबुरीचे धोरण ठेवा. नोकरीमध्ये सावध राहा. वरिष्ठांच्या आज्ञेचे काटेकोर पालन करा. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. त्यासाठी वेळ व पसे राखून ठेवा. जुने घरगुती प्रश्न तुमचे लक्ष वेधतील. स्वत:चे मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका.
वृषभ तुमच्या मनामध्ये नवीन वर्षांकरिता काही नवीन कल्पना घर करतील. त्या ताबडतोब अमलात आणाव्यात, असे तीव्रतेने वाटेल. व्यापार-उद्योगात संभाव्य धोक्यांचा अंदाज निष्णात व्यक्तीकडून जाणून घेणे चांगले. जे पसे हातात पडतील त्याचा काळजीपूर्वक वापर करा. नोकरीमध्ये घाई-गडबडीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचा भंग झालेला त्यांना पटणार नाही. घरामध्ये जोडीदाराशी, आप्तेष्टांशी किरकोळ कारणावरून समजुतीचा घोटाळा होण्याची शक्यता आहे. असे प्रश्न चिघळू न देता ताबडतोब सोडवून टाका.
मिथुन ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची परिस्थिती या आठवडय़ात होणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याकडून वेळेवर सहकार्य न मिळाल्यामुळे तुमचा पवित्रा बदलणे तुम्हाला भाग पडेल. व्यापार उद्योगात एखादे काम कायद्याची चौकट सोडून करावेसे वाटेल, पण त्यातून नवीन प्रश्न उद्भवतील. नोकरीमध्ये वरिष्ठ चांगले काम विसरून चुकांवर बोट ठेवतील. तुमचे हितशत्रू वरिष्ठांकडे तक्रारी करतील. स्वत:ची प्रकृती सांभाळा. घरामधल्या बुजुर्ग व्यक्तींशी तरुणांचे मतभेद होतील.
कर्क जेव्हा इतरांना मदतीची आवश्यकता असते, त्या वेळेला तुमचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून तुम्ही त्यांच्या मदतीला धावून जाता. व्यापार-उद्योगात बाजारातील परिस्थिती आणि हाताखालच्या व्यक्तीचे मूड याकडे नीट लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार घ्या. नोकरीमध्ये कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही. त्यामुळे शेवटी तुम्ही तुमच्याच पद्धतीने काम करायचे ठरवाल. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे जड जाईल. लहान मुले आणि मोठय़ा व्यक्तींचे हट्ट पुरवावे लागतील.
सिंह घरामधल्या ज्या प्रश्नांकडे गेल्या एक-दीड महिन्यापासून तुमचे दुर्लक्ष झालेले होते त्यामध्ये आता काही कारणाने लक्ष घालावे लागेल. घरामधल्या वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यापार-उद्योगात प्रत्यक्षात काम जरी कमी झाले तरी पूर्वी झालेल्या व्यवहारातून पशाचा ओघ चालू राहील. नोकरीमध्ये कोणतीही गोष्ट जास्त गंभीरपणे न घेता हसतखेळत काम करण्याकडे तुमचा कल राहील. पण कदाचित या गोष्टींचा वरिष्ठांना राग येईल.
कन्या एखादे जुने प्रकरण, जे तुमच्या ध्यानातून पूर्णपणे निघून गेले होते, ते लक्षात आल्यामुळे तुमची धावपळ सुरू होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामामुळे पशाचा ओघ सतत चालू राहील. सध्याचे काम जरी चांगले असले तरी अधिक पसे मिळविण्याची अभिलाषा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चालू नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. नाही तर त्यांची अवमर्जी सहन करावी लागेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामुळे थोडाफार त्रास होईल.
तूळ शुक्र तुमच्यातील चनी आणि विलासी वृत्ती वाढवणार आहे. मात्र त्याला घरातल्या व्यक्तींकडून विरोध होईल. व्यापार-उद्योगात तुमचे काम थोडेसे कमी झाले असले तरी पशाची फारशी चिंता नसेल, परंतु ज्यांना तुम्ही पसे द्यायचे कबूल केले होते, त्यांचे पसे वेळेत परत करा म्हणजे त्यांच्याशी असणारे हितसंबंध बिघडणार नाही. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि वेळेत काम पूर्ण करा. घरामध्ये वडिलोपार्जति प्रॉपर्टी, जमीनजुमला यासंबंधीचे प्रश्न असतील तर ते डोके वर काढतील.
वृश्चिक या आठवडय़ात एखादी सुप्त भीती तुमच्या मनात तरळत असेल तर ती खरी ठरण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात घाई-गडबडीमध्ये सरकारी नियमांचे तुमच्या हातून उल्लंघन झाले असेल तर त्याचा तुम्हाला त्रास संभवतो. कोणाला पसे द्यायचे कबूल केले असेल तर त्या व्यक्तीकडून त्याची आठवण करून दिली जाईल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जपून बोला. घरामधल्या वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी वाटेल. तुमच्या स्वत:च्या मन:स्वास्थ्याला जपा. कारण अनेक उलटसुलट विचार तुमच्या मनात दौडत असतील.
धनू एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही फारसा काही विचार न करता कृती करता तर कधी कधी छोटय़ाशा मुद्दय़ावर नको इतका विचार करून हातची संधी दवडता. व्यवसाय-उद्योगात पशाचा ओघ थोडासा कमी झाल्याने तुम्हाला चिंता वाटेल. वसुलीच्या कामातून पसे मिळू शकतील, पण त्याकरिता गिऱ्हाईकांशी हितसंबंध तोडू नका. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात थोडी जरी कसूर झाली तरी वरिष्ठांना ते आवडणार नाही. घरामध्ये एखाद्या जुन्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा होईल, पण निष्पन्न मात्र काहीच होणार नाही.
मकर एखाद्या व्यक्तीला पसे द्यायचे असतील किंवा कोणाकडून पसे मिळायचे असतील तर त्यात मागे-पुढे झालेले तुम्हाला सहन होत नाही. व्यापार-उद्योगात तुम्ही कोणाकडून पसे कर्जाऊ घेतले असतील तर त्याची वेळेवर परतफेड करा. नोकरीमध्ये जादा पसे मिळविण्याकरिता हातात असलेल्या अधिकाराचा गरवापर करण्याचा मोह होईल. व्यक्तिगत जीवनात मत्री आणि पशाची गल्लत केलीत तर तुमचाच तोटा होईल. सांसारिक जीवनात सर्व काही ठीक असेल. एखादा समारंभ साजरा होईल.
कुंभ हे ग्रहमान थोडेसे कोडय़ात टाकणारे आहे. तुमच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बऱ्याच असतील. त्या पूर्ण करण्याची तुम्हाला प्रचंड घाई असेल. व्यवसाय-धंद्यात गेल्या एक-दीड महिन्यात कामाच्या घाई-गडबडीत तुमच्या हातून सरकारी नियम अणि कोर्टव्यवहार याकडे दुर्लक्ष झाले असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ चांगले केलेले काम विसरून त्याची प्रशंसा करण्याऐवजी टीका करतील या गोष्टीचा राग येईल. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तींनी तुम्हाला जरी चांगला सल्ला दिला तरी तुम्हाला तो पटणार नाही.
मीन ज्यांच्यावरती तुम्ही अवलंबून असाल त्यांच्याकडून म्हणावी तशी साथ न मिळाल्यामुळे ‘दुसऱ्यावरी जो विसंबला..’ या म्हणीची आठवण येईल. व्यापार-उद्योगात गेल्या दीड-दोन महिन्यात तुमच्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याची भरपाई करावी लागेल. नवीन नोकरीचा निर्णय घाईने घेऊ नका. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींचे स्वास्थ्य आणि लहानांचे उपद्व्याप या दोन्हीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. अनोळखी व्यक्तींवर एकदम विश्वास टाकू नका.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com