मेष या आठवडय़ात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही गोष्ट विसरून चालणार नाही. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी घाईघाईने काही तरी करण्याचा मोह अनावर होईल, परंतु अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे काहीही करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला न विचारता एखादी जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्याचा तणाव जाणवेल. घरामध्ये सर्व प्रश्नांतून मुक्तता करण्यासाठी करमणुकीचा किंवा हवापालटाचा एखादा बेत ठरवाल. मात्र कदाचित त्यामध्ये सर्वाचे एकमत होणे कठीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ या आठवडय़ामध्ये तुमचा आग्रही स्वभाव इतरांना थोडा जाचक ठरेल. व्यवसाय-उद्योगात स्पर्धकांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे सिद्ध करण्याकरिता एखादे धाडस करण्याची तुमची तयारी असेल. सरकारी कामे अर्धवट राहिली असतील तर ती हातावेगळी कराल. व्यावसायिक लोकांना नवीन ऑर्डर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांचा इतरांसमोर गरसमज झाला असेल तर तो दूर होईल. घरामध्ये तुमच्याविषयी थोडासा आकस निर्माण होईल.

मिथुन गेल्या एक-दोन आठवडय़ांत ज्या कामात काही अनपेक्षित अडथळे निर्माण झाले होते ते निपटून काढणे हेच तुमच्यापुढे मुख्य ध्येय असेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या कामांमध्ये स्वत: लक्ष घाला. म्हणजे बरीच नवीन माहिती मिळेल. पशाचा वापर जपून करा. नोकरीमध्ये हाताखालच्या व्यक्तींना एखादी गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांना ती न समजल्याने शेवटी अधिकाराचा वापर कराल. घरामध्ये सर्वाची मोट बांधणे जड जाईल. एखाद्या प्रश्नात तुमच्या रागाचा पारा चढण्याची शक्यता आहे.

कर्क सतत कामाची राहणारी तुमची रास आहे आणि तुमचा कामाचा वेगही उत्तम असतो. व्यवसाय-उद्योगात नवीन व जुन्या अशा दोन्ही कामांमध्ये तुम्हाला सारखेच लक्ष घालावे लागेल. पशासंबंधी मोठे निर्णय घाईमध्ये घेऊ नका. नोकरीमध्ये हसतखेळत काम करण्याचा तुमचा इरादा असेल. वरिष्ठ मात्र तुमच्याकडून जास्त कामाची अपेक्षा ठेवतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात तातडीने हालचाल करावी. घरामध्ये महत्त्वाचा निर्णय लवकर होण्यासाठी निगुतीने प्रयत्न कराल. मुलांच्या उपद्व्यापाकडे लक्ष द्या.

सिंह जी गोष्ट तुमच्या मनाला पटलेली आहे त्यावर कृती करण्याचा मोह तुम्हाला अनावर होतो. व्यवसाय-उद्योगात एखादी संधी आपल्या हातातून निसटून जाऊ नये, या भीतीने तुम्ही घाईघाईने गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वसुली करताना गिऱ्हाईकांच्या अडचणी समजून घ्या, म्हणजे गरसमजाला वाव राहणार नाही. नोकरीमध्ये सकृद्दर्शनी तुम्ही शांत दिसाल, पण मनामध्ये मात्र आपले उत्पन्न कसे वाढवावे, याविषयी तुमच्या मनात विचार घोळत असतील. घरामध्ये व्यक्तींचे मन दुखावले जाईल, असे शब्द वापरू नका.

कन्या मोठे प्रश्न तुम्ही शांतपणे हाताळू शकाल, पण छोटय़ा प्रश्नात मात्र लवकर चिडून टोकाची भूमिका घेण्याची तुमची तयारी असेल. व्यवसाय-उद्योगात नवीन वर्षांकरिता काही तरी सनसनाटी करावे या कल्पनेने तुम्ही अस्वस्थ दिसाल. त्या नादात चालू असलेल्या कामातील गिऱ्हाईकांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नोकरीमध्ये संस्थेमध्ये बदलाचे वारे वाहू लागतील. नवीन नोकरीकरिता कोणताही निर्णय घाईने घेऊ नये. घरामध्ये इतरांनी तुमच्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे न वागल्यास तुम्हाला राग सहन होणार नाही.

तूळ तुमच्या मनामध्ये अनेक तरंग उठत राहतील. त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यापार-उद्योगात प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवाल, पण तुम्हाला ‘दुरून डोंगर साजरे’ असा अनुभव यायला लागेल. कर्ज प्रकरणामध्ये घाईने काम होणार नाही. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला खऱ्या अर्थाने आवडते त्यामध्ये तुम्ही चांगले लक्ष घालाल. घरामध्ये कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल, पण तुमच्या मनामध्ये मात्र मौजमजा करण्याचा मूड तरळत असेल.

वृश्चिक नित्यक्रमातील अडथळ्यांची पर्वा न करता या आठवडय़ात ‘हाती घ्याल ते तडीस न्याल.’ व्यापार-उद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता एखादे साहस करण्याचा तुमचा संकल्प असेल, पण त्याचे भविष्यात काय परिणाम असतील याचा अंदाज घेतल्याशिवाय तुमचा पवित्रा ठरवू नका. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हातून अनवधानाने काही चूक झाली असेल तर ती निस्तरावी लागेल. नवीन कामात लक्ष घालण्याचा वरिष्ठ हट्ट धरतील. घरामध्ये एखाद्या समारंभाच्या निमित्ताने तुम्हाला ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.

धनू ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. तुमच्या दृष्टीने कोणत्या कामाला किती महत्त्व द्यावे हे मात्र तुम्ही ठरवू शकणार नाही. व्यापार-उद्योगात तुमच्या हातात पसे असल्यामुळे ज्यांचा तुमच्याकडे मतलब आहे अशा व्यक्ती तुम्हाला खूश ठेवून तो साध्य करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या वागण्या-बोलण्याला भुलू नका. तुमच्या पद्धतीने केलेले काम योग्य वाटेल. घरामध्ये इतर सदस्यांचा मुद्दा जरी बरोबर असला तरी तुम्हाला तो काही पटणार नाही. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारींपासून त्रास संभवतो.

मकर या आठवडय़ात मात्र एखाद्या कारणाने तुमचा संयम सुटण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात जे काम आज चालू आहे, त्यामध्ये तुम्हाला फारसा रस वाटणार नाही. मात्र नजीकच्या भविष्यात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यावर तुमची नजर असेल. पूर्ण झालेल्या कामाचे पसे सहजगत्या न मिळाल्याने त्याकरिता एखादी युक्ती योजावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा तुमच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्यामुळे तुम्हाला आवश्यक ते स्वातंत्र्य दिले जाईल. घरामध्ये मुलांच्या उपद्व्यापाकडे लक्ष द्यावे लागेल.

कुंभ एखादे काम आपल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा तुमचा हेका असतो. त्यामध्ये थोडासा जरी फरक पडला तरी तुम्ही अस्वस्थ होता. व्यापार-उद्योगात ‘अति घाई संकटात जाई’ हे लक्षात ठेवून महत्त्वाची कामे विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये तुम्ही जर वरिष्ठ असाल तर हाताखालच्या व्यक्तींशी गोडीगुलाबीने राहणे भाग पडेल. एखाद्या नवीन कामासंबंधी वरिष्ठ सूतोवाच करतील. घरामध्ये इतरांनी तुमचे विचार ऐकून घेऊन ते मान्य करावे, असा तुमचा आग्रह असेल; पण इतर व्यक्ती त्याला विरोध करतील.

मीन एखाद्या पद्धतीने काम करायचे असा तुम्ही निश्चय करता, पण थोडा काळ गेल्यानंतर तुमची चुळबुळ सुरू होते. व्यापार-उद्योगात  आपले कौशल्य, नपुण्य दाखविण्यासाठी आपल्याला काही तरी नावीन्यपूर्ण करावेसे वाटेल. त्यासाठी बरीच माहिती गोळा कराल. नोकरीमध्ये सध्या चालू असलेल्या कामात वरिष्ठ प्रयोग करण्याच्या मूडमध्ये असतील, पण त्यामुळे तुमची कार्यक्षमता थोडीशी कमीच राहील. घरामध्ये इतरांना तुम्ही शिस्तीचे धडे शिकवाल, पण स्वत: ते पाळणार नाही.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com