01vijayमेष  सर्व ग्रहमान तुमच्यामधल्या इच्छा-आकांक्षा वाढवायला उपयोगी पडणार आहेत. प्रत्येक आघाडीवर एक नवीन विचारधारा तुम्हाला आकर्षति करत असेल. ती पूर्ण करण्याकरिता अथक मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल. व्यवसाय-उद्योगात नवीन संकल्प मनात असतील तर त्यासंबंधी आवश्यक असणारी जमा-खर्चाची आकडेमोड करा. नोकरीमध्ये संस्थेमध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे बदली किंवा कामात बदल होईल. घरामध्ये सर्व काही ठीक असेल.

वृषभ तुमची रास अर्थतत्त्वाची रास आहे. या तुमच्या वृत्तीला अनुसरून जे आपल्याकडे आहे त्यात वाढ कशी करायची याचाच विचार तुमच्या मनात घोळत असेल. व्यवसाय-उद्योगात प्रतिस्पध्र्याना शह देण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत कदाचित बदल करावा लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी काही अंतर्गत फेरफार केल्याने मनाचा गोंधळ उडेल. स्वत:च्या प्रकृतीचे चढ-उतार जाणवत राहतील. महत्त्वाची कामे शक्यतो याच आठवडय़ात उरका.

मिथुन काहीतरी नवीन करून आपले अस्तित्व इतरांसमोर आणावे ही तुमच्यातील भावना आता तीव्र होणार आहे. व्यापार-उद्योगात कोणतेही बेत ठरण्यापूर्वी आपली आíथक कुवत आणि स्पर्धकांची तयारी या दोन गोष्टींचा अंदाज घ्या. नोकरीच्या ठिकाणी एखादी कामाची वेगळी पद्धत वरिष्ठ तुमच्यावर लादतील. त्यामध्ये रुळायला वेळ लागेल. घरामध्ये तुमचे विचार आणि सल्ला इतरांना पटायला थोडा अवधी लागेल. आवडत्या व्यक्तींशी रुसवे-फुगवे होतील.

कर्क  अनेक नवीन कल्पना तुमच्या मनात कायम घोळत असतात. त्याला अनुसरून हे ग्रहमान आहे. पण व्यापार-उद्योगात एखादा नवीन उपक्रम सुरू करायचा असेल तर त्याकरिता आवश्यक त्या महत्त्वाच्या व्यक्तींशी संधान साधावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या संस्थेने काही धोरणात्मक बदल केले असतील तर त्याचा तुमच्या कामावर, दैनंदिनीवर परिणाम होईल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींनी एखादी घोषणा केल्यामुळे त्यावर विचारविनिमय करतील.

सिंह नवीन वर्षांच्या प्रारंभाला तुम्हाला अनेक महत्त्वाच्या ग्रहांची चांगली साथ लाभणार आहे. त्यामुळे तुमचे इरादे बुलंद असतील. एकंदरीत नेहमीसारखे काम न करता काहीतरी भव्य-दिव्य नवीन वर्षांत करून दाखविण्याचा तुमचा मानस असेल. व्यापार-उद्योगात पसा आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढविण्याकरिता अथक मेहनत करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले काम करून आपले महत्त्व वाढविण्याकरिता तुम्ही प्रयत्नशील राहाल. घरामध्ये इतर सदस्यांना एखादे मोठे स्वप्न दाखवून तुम्ही खूश कराल.

कन्या थोडक्यात महत्त्वाचे ग्रह तुमच्यावर प्रसन्न असल्यामुळे आता तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे संकेत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी कामाच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा संकेत दिला असेल तर त्याचा विचार करावा लागेल. घरामध्ये कर्तव्य, मौजमजा या दोन्हींचा समन्वय साधताना तुमची धावपळ उडेल. पण अखेर तुम्ही तुमचे ठरविलेले उद्दिष्ट साध्य करू शकाल. छोटय़ा समारंभामुळे चांगला बदल होईल.

तूळ गृहसौख्याच्या बाबतीत काहीतरी कमतरता स्वीकारून तुम्हाला प्रगती करीत राहायचे आहे. एकंदरीत तुमचे करिअर आणि तुमचे घर या दोन आघाडय़ांवर तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला बाजारातील चढउतार लक्षात घेऊन त्यानुसार काम करावे लागेल. नोकरीमध्ये स्वत:च्या कर्तव्यास विसरू नका. घरामधल्या व्यक्तींवर विनाकारण राग काढलात तर त्यातून तात्पुरता दुरावा आणि गरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. शक्यतो मन शांत ठेवून काम करा.

वृश्चिक  तुम्हाला खरी काळजी आहे ती साडेसातीच्या मध्यभागाची. व्यक्तिगत जीवनातील नतिक कर्तव्ये तुम्हाला जखडून टाकतील. अशा परिस्थितीत ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी तुमची गत होईल. व्यापार-उद्योग आणि नोकरीच्या क्षेत्रात महत्त्वाच्या बदलांची नांदी यापूर्वीच झालेली असेल. बाजारातील चढउतार आणि स्वत:ची मर्यादा याचा कारखानदारांनी विचार करावा. सांसारिक जीवनामध्ये सकृद्दर्शनी सर्व काही चांगले वाटेल.

धनू ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा ठेवा. म्हणजे सर्व काही तुमच्या पद्धतीने पार पडेल. राशीमध्ये होणारी रवी-प्लूटो युती तुमच्या करिअर, व्यवसायामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल आहेत असे दर्शवितात. नोकरीमध्ये जरी काटय़ाकुटय़ाचा मार्ग असला तरी स्वत:च्या प्रगतीकरिता भरपूर काम करण्याची तयारी ठेवाल. घरामध्ये तुमचा हट्टी स्वभाव इतरांना सुरुवातीला पटणार नाही. पण त्याचा उद्देश समजल्यानंतर तुमच्या विषयीचा गरसमज दूर होईल.

मकर तुमच्या इच्छा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा बळावतील. राशीमध्ये असणारा बुध कल्पनाशक्तीला भरपूर वाव देणारा आहे. अष्टमस्थानातील गुरू मात्र काही प्रमाणात मर्यादा आणेल. त्याचा तुम्ही साकल्याने विचार केलात तर यश द्विगुणित होईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात नवीन कामाकरिता जुळवाजुळव करावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे तुमच्या हालचालीत एक प्रकारची लगबग राहील. घरामध्ये इतरांवर अधिकार गाजवाल.

कुंभ चांगले काम करून निवडलेल्या क्षेत्रामध्ये भरपूर कमाई करण्याकरिता धाडस करण्याची तुमची तयारी असेल. सप्तम स्थानातील गुरू नवीन हितसंबंध प्रस्थापित करायला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या बदलाकरिता तुम्ही सिद्ध झाले असाल. नोकरीच्या ठिकाणी वेगळी पद्धत स्वीकारून कामाचा दर्जा वाढवावासा वाटेल. घरामध्ये तुमच्या कल्पना इतरांनी उचलून धराव्यात असा तुमचा आग्रह असेल. थोडक्यात चांगले संकेत मिळतील.

मीन ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असा पवित्रा ठेवा. कोणत्याही कामामध्ये आपल्याला बरीच धडपड करावी लागेल, अशी मनाशी खूणगाठ बांधली तर सर्व काही शक्य आहे. नवीन वर्षांत काळाची गरज म्हणून तुम्हाला तुमचा पवित्रा लवचीक ठेवून काम करावे लागेल. त्यामध्ये जर तुम्ही सफल झालात तर बरेच काही मिळवू शकाल. व्यापार-उद्योगात तुमचे बेत गुप्त ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या बदलत्या मूडनुसार कामाची पद्धत ठरवा.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

 

Story img Loader