जीवनामध्ये नेहमीच चढउतार चालू असतात. कधी कधी  आपल्याला साथ मिळते तर कधी एकटय़ाने उद्दिष्ट साध्य करावे लागते. या दोन्हीची तयारी ठेवा. व्यवसाय-उद्योगात नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे काम  मिळाल्यामुळे तुम्हाला उत्साह येईल, पण त्यातील अडथळे पाहिल्यावर थोडेसे बिचकल्यासारखे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ नवीन कामगिरीकरिता तुमची निवड करतील. त्यामुळे कामाचा तणाव वाढेल. घरामध्ये सर्व जणांना तुमची आठवण येईल.

प्रत्येक व्यक्ती आशावादी असते. अडथळे असले तरी पुढे काही तरी चांगले होईल या इच्छेने काम करीत राहाल. व्यापार- जुने काम संपवून नवीन कामासंबंधी कुणकुण लागेल. आíथक स्थिती जेमतेम असेल. नोकरीमध्ये सप्ताहाची सुरुवात दगदगीची होईल. पण नंतर एखादी युक्ती शोधून कामामध्ये तुम्ही शॉर्टकट शोधून काढाल. घरामध्ये किचकट जबाबदारी स्वीकारून त्यावर सर्वाना उपयोगी पडेल असा एखादा चांगला मार्ग शोधून काढाल.

तुमचा मानसिक उत्साह खूप असेल, पण प्रत्येक कामाकरिता कोणावर तरी अवलंबून राहावे लागल्यामुळे तुमच्यावर काही मर्यादा येतील. व्यापार-उद्योगात कुवतीबाहेर जाऊन आíथक धोका पत्करू नका. स्वीकारलेले काम वेळेत पार पाडण्याचा निश्चय करा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या बऱ्याच अपेक्षा असतील. त्याला पुरे पडण्यासाठी तुम्हाला पड खावी लागेल. अनपेक्षित खर्चाकरिता थोडे पसे हातात ठेवा. विद्यार्थ्यांनी प्रकृती सांभाळावी, पाठांतरावर भर देऊ नये.

भरपूर काम करण्याची तयारी आणि प्रचंड आशावाद या दोन्हीचा आता पुरेपूर फायदा मिळेल. व्यापार-उद्योगात एखादे काम मार्गी लागल्यामुळे तुमच्यातील जोम आणि उत्साह वाढेल. तुमचे छोटे-मोठे अंदाज बरोबर ठरल्यामुळे काही धोके तुम्ही टाळू शकाल. आíथक आवक साधारण राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे वेगळे काम तुमच्यावर सोपवतील. त्यामध्ये तुम्ही सफल व्हाल. घरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनाला रुखरुख लागेल.

ग्रहमान थोडेसे बुचकळ्यात टाकणारे आहे. अनेक नवीन योजना येतील; परंतु दैनंदिन कामामध्ये तुम्ही जखडून गेल्याने त्याकडे म्हणावे तसे लक्ष तुम्हाला देता येणार नाही. त्याची मनामध्ये कुठे तरी खंत राहील. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता तुम्ही सर्वोतोपरी प्रयत्न कराल. तुमचा कामाचा झपाटा त्यांना आवडेल. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या मतलबाकरिता तुमची खुशामत करतील, पण कामाचा बोजा वाढवतील.

तुमच्या व्यक्तिमत्त्वातले दोन वेगवेगळे कंगोरे या आठवडय़ात सभोवतालच्या व्यक्तींना दिसून येतील. तुमच्या नेहमीच्या कामात तुम्ही बिनचूक आणि कर्तव्यदक्ष राहाल. या उलट घरगुती प्रश्न सोडविताना हळवे बनाल. व्यापार-उद्योगात कमाईचे प्रमाण चांगले असल्यामुळे तुम्ही खूश असाल. घरामधल्या एखाद्या नेहमीच्या व्यक्तीची अनुपस्थिती असल्यामुळे तुमचा कामाचा बोजा वाढेल. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे बेत मनात येतील.

एकीकडे व्यावसायिक कामाचा व्याप वाढत असेल तर दुसरीकडे तुमचे लक्ष हळूहळू काही घरगुती गोष्टींकडे वळवावे लागेल. व्यवसाय-उद्योगात जास्त कमाई करून देणाऱ्या कामात लक्ष टाकताना आपल्या दैनंदिनीला धक्का पोहोचणार नाही ना याचा आढावा घ्या. घरामध्ये एखादे शुभकार्य निश्चित होईल. नवीन वस्तूंची खरेदी, डागडुजी व आपुलकीच्या व्यक्तींचा पाहुणचार याकडे तुम्ही तुमचे लक्ष द्याल.

या आठवडय़ात स्वत:च्या प्रगतीकरिता थोडेसे धाडस करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात बरेच काम वेळेत पूर्ण करण्याकरिता तुम्हाला आळस झटकून काम करावे लागेल. गिऱ्हाईकांचे समाधान करणे गरजेचे होईल. नोकरीमध्ये ज्या कामातून तुमचा फायदा आहे अशा कामाला महत्त्व द्याल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींना खूश करण्याकरिता तुमच्या कार्यक्रमात थोडेफार फेरबदल करा. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचे विचार मनात येतील.

एकाच पद्धतीने काम करण्याचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येतो आणि त्यामध्ये बदल शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता. असा बदल तुम्हाला या आठवडय़ात मिळेल. व्यापार-उद्योगात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता एखादी विशेष मोहीम हातात घ्याल. कारखानदार आधुनिक तंत्राचा वापर करतील. नोकरीमध्ये विशेष सवलतीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये प्रत्येक कामामध्ये आपले महत्त्व वाढावे याकरिता तुम्ही पुढाकार घ्याल.

एखाद्या महत्त्वाच्या कामात ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची परिस्थिती असेल, पण लवकरच त्यात मार्ग निघेल. व्यापार-उद्योगात हाताखालच्या व्यक्तींकडून काम करून घेण्यासाठी एखादे आमिष दाखवावे लागेल. कारखानदारांना नवीन पद्धतीचे काम सुरू करण्याासाठी माहिती मिळवतील. नवीन नोकरीच्या कामात शुभसंकेत मिळतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तीकरिता तुम्ही वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांची थोडीशी नाराजी राहील.

तुमच्या मनामध्ये नवीन तरंग उठत असतील. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याकरिता बरीच मेहनत घ्यायची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात भरपूर आणि मनासारखे काम असल्याने तुम्ही उत्साही दिसाल. मात्र कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवल्याशिवाय पुढे जाऊ नका. नोकरीमध्ये सगळ्या डगरींवर हात ठेवणे जमणार नाही. संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. अधिकाराचा वापर जपून करा. घरामध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार असेल.

सभोवतालची परिस्थिती खूप काही चांगली नसेल, पण तुम्ही मात्र एखाद्या कारणाने बरेच आशावादी दिसाल. व्यापार-उद्योगात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात इतरांना अडथळे आले होते, त्यामध्ये एखादी शक्कल लढवून चांगला मार्ग शोधून काढाल. मात्र स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये प्रत्येकाची गरज ओळखून ती पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. त्या नादात तुमची धावपळ होईल.
विजय केळकर

Story img Loader