01vijayमेष सूर्यग्रहण लाभस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसेल. पशाविषयी, माणसांविषयी  तुमचाच पवित्रा सावध ठेवा. व्यापार-उद्योगात तुमची भरपूर काम करण्याची इच्छा असेल. भागीदारी किंवा मत्री कराराचे नव्या प्रस्तावावर निष्णात व्यक्तीचे मत घ्या आणि नंतर पावले उचला. नोकरीच्या ठिकाणी जे काम चालू आहे त्यातून होणारी प्राप्ती तुम्हाला कमी वाटेल. घरामध्ये सर्व काही सकृत्दर्शनी ठीक वाटले तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अनामिक चिंता राहील.

वृषभ सूर्यग्रहण राशीच्या दशमस्थानात होणार आहे. स्वभावत: तुम्ही शांत आहात. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात खोटय़ा प्रतिष्ठेच्या मागे लागून विनाकारण मोठा धोका पत्करू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. महत्त्वाची कामे इतरांवर न सोपवता शक्यतो स्वत: हाताळा. नवीन नोकरीचा स्वीकार करणाऱ्यांनी नवीन ठिकाणची कामाची पद्धत या गोष्टींचा नीट अंदाज घ्यावा. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून कोणाशी तरी मतभेद होतील. त्यातून शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन सूर्यग्रहण राशीच्या भाग्यस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. ज्यांना आपण आपले म्हणतो, त्यांच्यापासून  तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापार-उद्योगात नवीन कामासंबंधी बोलणी किंवा करार करताना त्यातील मथितार्थ नीट समजून घ्या. घाईने निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर जास्त विसंबून राहिलात तर तुमची गरसोय होईल. त्यापेक्षा स्वत:चे काम स्वत: उरका. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी जपून बोला आणि वागा.

कर्क सूर्यग्रहण राशीच्या अष्टमस्थानात होणार आहे. ते भारतात दिसेल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात अचानक काही अडचणी आल्याने तुमचे कामाचे गणित मागे-पुढे होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे विचार आणि निर्णय तुम्हाला पटणार नाहीत आणि तुमची परिस्थिती ‘अडला नारायण गाढवाचे पाय धरी’ अशी होईल. तुमचे मन शांत ठेवा. घरामध्ये इतर सदस्य तुमच्या कामातील चुका काढतील. त्याचा तुम्हाला राग येईल. एखादी नतिक जबाबदारी पूर्ण करावी लागेल.

सिंह सूर्यग्रहण राशीच्या सप्तमस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. तुमचे करिअर आणि व्यक्तिगत जीवनात ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही हितसंबंध ठेवाल त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहे असा अनुभव येईल.  व्यापार-उद्योगात शक्यतो नवीन करार करू नका. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नवीन नोकरीच्या कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. घरामध्ये जोडीदाराशी किरकोळ कारणांवरून रुसवेफुगवे होतील.

कन्या सूर्यग्रहण राशीच्या षष्ठस्थानात होईल. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे. तुमच्या राशीला उत्तम बुद्धिमत्तेचे वरदान लाभले आहे. परंतु शारीरिक कष्ट जेव्हा प्रमाणाबाहेर वाढतात, त्यावेळेला तुमची कार्यक्षमता कमी पडते. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे स्वत: हाताळा. नोकरीमध्ये हाताखालच्या व्यक्तींनी केलेले काम वरिष्ठांसमोर ठेवण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासून पाहा. घरामध्ये इतर सदस्यांना तुम्ही त्यांच्या गरजेनुसार मदत कराल. त्यांच्याकडून परतफेडीची अपेक्षा ठेवू नका.

वृश्चिक सूर्यग्रहण राशीच्या पंचमस्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. या आठवडय़ात प्रयत्नांवर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्टीत कर्तव्यदक्ष राहाल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्या. ज्यांच्याकडून पसे उसने घेतले असतील तर त्यांना ते परत करा. वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामध्ये आवडत्या व्यक्तींच्या प्रगतीविषयी,  स्वास्थ्या-विषयी चिंता वाटेल. त्यांना आपलेसे करून घेण्यासाठी गोड बोलावे लागेल.

धनू सूर्यग्रहण राशीच्या चतुर्थस्थानात होईल. या आठवडय़ात एखादी घरगुती जबाबदारी ज्याकडे पूर्वी दुर्लक्ष झाले असेल तर आता त्याला महत्त्व द्यावे लागेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात जुने काम बंद करून नवीन कामाला महत्त्व द्यावेसे वाटेल, पण निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी वरिष्ठांना ते अपुरेच वाटेल. तुमचे मन बंड करून उठेल. घरामध्ये वडिलोपार्जति इस्टेट, जमीनजुमला यासंबंधी चर्चा होईल.

मकर सूर्यग्रहण राशीच्या तृतीयस्थानात होईल. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही नको इतका विश्वास ठेवता आणि त्यामुळे तुमचीच कधी कधी दिशाभूल होते. ती गोष्ट कटाक्षाने सांभाळा. व्यापार-उद्योगात नवीन सौदे किंवा करार करताना त्यातील अटी नीट समजून घ्या. महत्त्वाची व्यावसायिक कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा.  नोकरीच्या ठिकाणी कोण काय सांगते याला महत्त्व न देता तुमच्या कर्तव्याला प्राधान्य द्या. सहकाऱ्यांशी जपून बोला. घरामध्ये वागताना राग कटाक्षाने आवरा.

कुंभ सूर्यग्रहण याच स्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. आíथक व्यवहाराच्या बाबतीत जरा जरी मागे पुढे झाले तरी तुम्ही अस्वस्थ होता. व्यापार-उद्योगात काम भरपूर असेल. ते पूर्ण करण्याकरिता तात्पुरते कर्ज घ्यावे लागेल. नोकरीमध्ये वातावरण उत्साहवर्धक असेल. घाईने वरिष्ठांना शब्द दिला तर तो पाळणे नंतर तुम्हाला जड होईल. घरामधल्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक,  इतर सदस्यांची उलटसुलट चर्चा होईल. मात्र कोणालाही टाकून बोलू नका.

मीन सूर्यग्रहण तुमच्याच राशीत होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. तुमचे करिअर आणि नतिक जबाबदाऱ्या या दोन्ही गोष्टी एकाच वेळी महत्त्वाच्या ठरल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दबाव जाणवेल. व्यापार-उद्योगात सरकारी नियम आणि कायदेकानून यांची पायमल्ली होणार नाही याकडे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत तर त्यांचा राग ओढवेल. घरामध्ये काही अनपेक्षित कारणामुळे पूर्वी ठरलेले बेत बदलावे लागतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader