01vijayमेष चंद्रग्रहण राशीच्या षष्ठस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसेल. आठवडय़ात एखाद्या कारणाने विशिष्ट व्यक्तींच्या बाबतीत तुम्ही हळवे बनाल. व्यापार-उद्योगात तुमच्या उत्साही स्वभावामुळे कामकाज चांगले होईल. परंतु हातामध्ये पसे शिल्लक राहणार नाहीत. कारण अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात काटेकोर रहिलात तर वरिष्ठ खूश होतील. घरामध्ये भावना आणि व्यवहार याच्या विचित्र गुंत्यामध्ये तुम्ही अडकून पडाल.

वृषभ चंद्रग्रहण पंचमस्थानात त्याच आठवडय़ात होणार आहे. अशा वेळी कोणताही निर्णय घाईने न घेता तुमचे मन शांत ठेवा. व्यापार-उद्योगात नवीन आणि जुनी अशी दोन्ही प्रकारची कामे हाताळावी लागतील. पशाची आवक चांगली असेल. मात्र वेळेचे नियोजन चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या अवलंबून न राहता तुमचे काम वेळेत पार पाडा. घरामध्ये भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्या.

मिथुन चंद्रग्रहण राशीच्या तृतीयस्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपल्यापासून खूप लांब असते. त्या वेळी आपल्याला त्याचे खूप आकर्षण वाटते. व्यापार-उद्योगात आíथक व्यवहारात काटेकोर राहा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढतील. नेमके कोणत्या कामाला महत्त्व द्यावे याविषयी मनात गोंधळ उडेल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला समाधानी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण एखाद्या व्यक्तीचा रोष उद्भवण्याची शक्यता आहे.

कर्क चंद्रग्रहण राशीच्या धनस्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. ज्या समस्यांमुळे तुमच्या मनात कोडे निर्माण झाले होते त्यामध्ये मार्ग दिसू लागेल. व्यवसाय-उद्योगात हातात घेतलेले काम पूर्ण करण्याकरिता एखादी शक्कल लढविणे भाग पडेल. कर्ज घेऊन पशाची व्यवस्था कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या भिडस्त स्वभावाचा पुरेपूर फायदा घेऊन कामाचा बोजा वाढवतील.  घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीमुळे किंवा वागण्या-बोलण्यामुळे कोडे पडेल.

सिंह ज्या कामाची तुम्हाला घाई आहे असे काम लांबल्यामुळे तुमचा  थोडासा विरस होईल आणि जे काम तुम्हाला नको आहे ते काम मिळाल्यामुळे त्यात रस वाटणार नाही. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला मदतीचे आश्वासन दिले होते त्यांच्याकडून ते पाळले न गेल्यामुळे तुमची त्रेधातिरपीट उडेल. अखेर तुम्हीच ते काम पूर्ण कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ प्रत्येक काम ताबडतोब करण्याकरिता आग्रह धरतील. घरामध्ये वस्तूची मोडतोड, डागडुजी अशा कामाकरिता पसे खर्च होतील.

कन्या चंद्रग्रहण तुमच्याच राशीत होणार आहे. हे  ग्रहण भारतात दिसणार आहे. स्वभावत तुम्ही खूप हळवे असल्यामुळे तुम्हाला कोणी काही बोलले तर त्याचा खूप विचार करता. व्यापार-उद्योगात आपल्या हातून व्यवस्थित आणि वेळेत काम होण्याकरिता जिवाचे रान कराल. नोकरीच्या ठिकाणी एखादे महत्त्वाचे काम वरिष्ठांनी विश्वासाने तुमच्यावर सोपवले असल्याने तुम्ही थोडेसे बचेन दिसाल. घरामधल्या व्यक्तींना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी पुरेसा अवधी द्या.

तूळ चंद्रग्रहण राशीच्या लाभस्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. ‘सर्वेगुण: कांचनम् आश्रयन्ते’ याची आठवण करून देणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात मत्री आणि पसा  यांची गल्लत होऊ देऊ नका. हाताखालच्या व्यक्तींवर प्रमाणाबाहेर अवलंबून नका राहू. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताणतणाव वाढेल. घरामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात गर्क असल्याने सगळ्यांचीच चिडचिड होईल. तुमचे मन शांत ठेवणे आवश्यक आहे.

वृश्चिक चंद्रग्रहण राशीच्या दशमस्थानात होईल. हे ग्रहण भारतात दिसेल. तोंड झाकलं की पाय.. आणि पाय झाकले की तोंड उघडे पडते अशी स्थिती निर्माण करणारे ग्रहमान आहे. व्यवसाय-उद्योगात प्रतिस्पर्धी एखादी अफवा पसरवून तुमच्याविषयी गरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता शांत राहा. नोकरीतील बदल घाईने करू नका. घरामध्ये सगळ्यांशी जुळवून घेताना तत्त्वांशी तडजोड करावी लागेल.

धनू चंद्रग्रहण राशीच्या भाग्यस्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. व्यवसाय किंवा उद्योगात दैनंदिन काम जरी व्यवस्थित चालू असले तरी त्यातून पाहिजे तशी कमाई होत नाही, अशी तुमची तक्रार असेल. नवीन काम मिळविण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये योग्य व्यक्तींशी संपर्क होण्यास विलंब होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा शब्द शिरसावंद्य माना. घरामध्ये अनेक डगरींवर हात ठेवायला लागल्यामुळे तुमची तारांबळ उडेल. नातेवाईक, आप्तेष्टांशी विचारपूर्वक बोला.

मकर चंद्रग्रहण राशीच्या अष्टमस्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी तुमची स्थिती होणार आहे. आपण कुठेतरी कमी पडतो ही संवेदना तुम्हाला मधूनच त्रास देईल. व्यापार-उद्योगात अतिसाहस टाळा. पशाचे मोठे वायदे घाईने करू नका. नवीन गिऱ्हाईकांना खूश ठेवा. पण जुन्या गिऱ्हाईकांना विसरू नका. नोकरीच्या ठिकाणी काम नेहमीचेच असेल, पण तुमच्या हातून छोटी-मोठी चूक झाल्याने वरिष्ठांना बोलायला संधी मिळेल.

कुंभ चंद्रग्रहण राशीच्या अष्टमस्थानात होईल. एखाद्या विशिष्ट घरगुती प्रसंगामुळे किंवा आवडत्या व्यक्तीविषयी या आठवडय़ात तुम्ही थोडेसे हळवे बनाल. व्यवसाय किंवा उद्योगात सगळ्या  कामात लक्ष द्यावेसे वाटेल, पण आíथक आणि तांत्रिकदृष्टय़ा जी महत्त्वाची कामे आहेत त्यावर भर द्या. अत्यावश्यक असले तरच कर्ज  घ्या. नोकरीच्या ठिकाणी  स्वतच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये सर्व काही करूनही ‘ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे’ असा अनुभव येईल.

मीन चंद्रग्रहण सप्तमस्थानात होणार आहे. तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळविणे हीच या आठवडय़ातील तुमची परीक्षा आहे. व्यापार-उद्योगात तुमचे स्पर्धक एखादी अफवा पसरवून तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. त्याला भुलून न जाता तुमचे काम वेळेत उरका. नोकरीमध्ये एखाद्या विक्षिप्त व्यक्तीशी सामना होईल. त्याला शांतचित्ताने हाताळा. जोडीदाराशी रुसवेफुगवे होतील. त्यातून कोणतेही निष्कर्ष काढू नका. एखादा छोटासा कार्यक्रम ठरेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader