01vijayमेष एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार उघडते याचा प्रत्यय देणारा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता तुम्हाला तुमची पूर्वीची ध्येय-धोरणे बदलणे भाग पडेल. इच्छा नसतानाही वेगळ्या पद्धतीचे काम करावे लागेल.  आíथक बाबींवर लक्ष ठेवा. नोकरीत एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असली, तरी त्याविषयी मतप्रदर्शन करू नका. घरामधल्या व्यक्तींचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. पण त्याकडे लक्ष दिले तर तुमचाच  फायदा होईल.

वृषभ परिस्थितीचा अंदाज नसल्यास पवित्रा सावध ठेवा.  व्यवसाय-उद्योगातील नवीन गोष्टींसाठी सर्व व्यवस्था करण्यात तुम्ही मग्न असाल. जोडधंद्यातून उत्पन्न वाढविण्याचा विचार तुमच्या मनात येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची खुशामत करतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींना सुखी आणि समाधानी ठेवणे हे तुमच्या पुढील मुख्य आव्हान असेल. त्याकरिता स्वत:च्या दैनंदिनीत बदल कराल.

मिथुन तुमच्या नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी आवश्यक धडपड करण्याची केलीत तर तुमचे यश द्विगुणित होईल. व्यापार-उद्योगात जे बेत तुम्ही आखले आहेत, त्यांच्या  कार्यवाहीसाठी प्रतिस्पध्र्याच्या तयारीचा अंदाज घ्या. धनप्राप्ती थोडीशी वाढेल. नोकरीमध्ये वेगळया स्वरूपाचे काम मिळाल्याने तुम्ही खूश असाल. मात्र ‘पुढील पाठ मागील सपाट’ असा प्रकार होऊ देऊ नका. घरामधल्या सदस्यांना तुमच्या सल्ल्यांचा उपयोग होईल. एखाद्या समारंभाचे नियोजन कराल.

कर्क सतत उद्योगात राहिल्याने या आठवडय़ात तुम्ही खूश असाल. नवीन आíथक वर्षांकरिता तुम्ही आखलेल्या बेतांच्या पूर्वतयारीसाठी वेगवेगळ्या स्तरांवरील व्यक्तींना भेटाल. नोकरीत नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखाद्या नवीन पद्धतीच्या कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असाल तर त्या कामाला वेग येईल. घरामध्ये बऱ्याच अवधीनंतर एखादा मेळावा आयोजित केला जाईल.

सिंह सर्व ग्रहस्थिती हळूहळू तुम्हाला अनुकूल होणारी आहे. एखाद्या कामात थोडीफार निराशा येईल. पण त्याचा जास्त विचार करू नका. व्यापार-उद्योगात एखादे किचकट काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या ओळखीचा उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या व्यक्तीने केलेले काम पुन्हा तपासून बघा. घरामध्ये तुमचे काम कर्तव्य म्हणून पार पाडा. तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कन्य ठरविलेले काम वेळेत पार पाडण्यासाठी या आठवडय़ात तुम्हाला जिवाचे रान करावे लागेल. सगळी कामे एकटय़ाने न करता केवळ महत्त्वाची कामे स्वत: हाताळा. हाताखालच्या व्यक्तीच्या कामावर नीट लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी व वरिष्ठांसमोर बढाया मारू नका. नेमून दिलेले काम वेळेत आणि संस्थेच्या नियमाप्रमाणे पार पाडा. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना वेगळी कार्यपद्धती अवलंबावीशी वाटेल. घरामध्ये तुमच्या शिस्तबद्ध वागण्याचा इतरांना राग येईल.

तूळ टाळवाण्या नित्यकर्मातून पळवाट काढण्यासाठी एखादा शॉर्टकट शोधून काढाल. व्यापार-उद्योगात  लांबलेल्या कामांमध्ये प्रगती करण्याचा एखादा धागा मिळेल. जुन्या ओळखींचा उपयोग होईल. नवीन काम स्वीकारण्यापूर्वी त्यातील खाचाखोचा समजून घ्या. नोकरीमध्ये तुमच्या हातून नकळत चालढकल होईल. घरामध्ये  प्रत्येकाचे काम महत्त्वाचे असल्यामुळे कोणालाच कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल.

वृश्चिक  कोणत्याही कामाचे नियोजन करणे या पद्धतीचा तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात अपेक्षित व्यक्तींकडून हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तुम्हाला एखादा नवीन मार्ग शोधावा लागेल. आíथक स्थिती थोडीफार सुधारेल. नोकरीमध्ये  वरिष्ठ कामाची पद्धत अचानक बदलण्याची शक्यता आहे. घरामधल्या बुजुर्ग व्यक्तींचे मूड सांभाळावे लागतील. एखादे कष्टदायक काम मार्गी लावाल.

धनू  व्ययस्थानातील शनी-मंगळामुळे मनावर एक प्रकारचा तणाव असला तरी थोडासा आराम करावासा वाटेल. व्यापारी वर्गाला अडकून राहिलेले पसे हातात पडल्यामुळे बरे वाटेल. तातडीच्या कामानिमित्त प्रवास घडेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा खूप असल्या तरी तुम्ही मात्र तुमच्या पद्धतीने काम कराल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकरिता वरिष्ठ तगादा लावतील. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात गर्क असेल. नवीन वास्तूच्या खरेदीसंबंधी विचार मनामध्ये येईल.

मकर अनेक डगरींवरती एकाच वेळी लक्ष ठेवण्याचा तुम्हाला उपयोग होईल. नवीन कामे सुरू करण्याकरिता आवश्यक व्यक्तीशी गाठीभेटी ठरवाल. सध्याची कामाची पद्धत बदलण्याची गरज भासेल. जोडधंद्यामध्ये एखादे नवीन तंत्र वापरण्याची गरज तुमच्या लक्षात येईल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेच्या बदलत्या धोरणामुळे  मनात शंका निर्माण होतील. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याचा उपयोग होईल.

कुंभ ग्रहमान परस्परविरोधी आहे. व्यापार-उद्योगात प्राप्ती वाढविण्याकरिता कामाची पद्धत अधिक सुटसुटीत कराल. एखादे काम पूर्ण करण्याकरिता वेगळ्या स्थळाला धावती भेट द्यावी लागेल. त्यातून काही नवीन कल्पना सुचतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता तुमच्या वेळापत्रकात बदल कराल. घरामध्ये कोणाशी मतभेद झाले असतील तर मोठय़ा मनाने संपवून टाका.

मीन राश्याधिपती गुरू षष्ठस्थानात असला तरी बाकी ग्रहांची उत्तम साथ आहे. तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक वातावरण लाभेल. पूर्वीचे अडथळे जिद्दीने पार पाडाल. पूर्वी केलेल्या कामाचे पसे हातात पडण्याची शक्यता आहे. स्पर्धकांच्या हालचालींकडे मात्र लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. घरामध्ये कर्तव्य आणि मौजमजा या दोन्हीचा समन्वय तुम्ही उत्तम रीतीने साधाल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचे विचार मनात डोकावतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader