01vijay1मेष एखाद्या कारणाने तुम्हाला खूप निराशा आली असेल, तर ती दूर करणारी एखादी चांगली घटना घडेल. सर्व ताणतणावांचा काही क्षण तुम्हाला विसर पडेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात पूर्वी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमची कार्यक्षमता उत्तम असेल. त्याच्या बदल्यात एखादी सवलत मिळेल. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरेल किंवा पूर्वी ठरलेले काही कार्यक्रम पार पडतील.

वृषभ एखादा घरगुती प्रश्न काही कारणाने ठप्प झाला असेल तर त्याला पुन्हा एकदा वेग मिळेल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीसंबंधी काही विचार चालू असतील तर त्यावर शिक्कामोर्तब होईल. व्यापार-उद्योगात तुमच्याकडे असलेल्या अनेक नव्या कल्पना कृतीत उतरविण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचे मत घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढतील. घरामध्ये शुभसमारंभाच्या निमित्ताने पाहुण्यांची बडदास्त ठेवली जाईल. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्यावर मन मोकळे होईल.

मिथुन आवडती खबरबात कळल्यामुळे जो आनंद मिळायला पाहिजे तसा आनंद या आठवडय़ात घेऊ शकाल. नेहमीच्या स्वभावानुसार एखाद्या गोष्टीचा जास्त विचार न करता तुम्ही कामाला न लागल्याने समोरच्या व्यक्तीला जरा जास्तच आश्चर्य वाटेल. कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्तींकडून उपयुक्त टिप्स मिळतील. नोकरीमध्ये विशेष भत्त्याकरिता किंवा परदेशगमनाकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात इतरांना तुमची गरज भासेल.

कर्क ज्या चांगल्या गोष्टीविषयी तुमच्या मनात बरेच दिवस उत्सुकता निर्माण झाली होती त्याचा तुम्ही मनमुराद आनंद लुटाल. व्यापार-उद्योगात तुमची महत्त्वाकांक्षा वाढविणाऱ्या घटना घडतील. मोठय़ा व्यक्तींचे साहाय्य मिळाल्याने मनोधर्य वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर खूश होऊन विशेष आश्वासन देतील. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाकरिता परदेशात जायचे आहे त्यांना चांगले ग्रहमान आहे. घरामध्ये प्रत्येक कामात तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल.

सिंह ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही तुमचे वर्चस्व प्रस्थापित करता. या आठवडय़ात तुमच्या नेतृत्वगुणांना भरपूर वाव असेल. व्यापार-उद्योगात पशाची आवक सुधारण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही पूर्ण करून दाखवाल. तुम्ही तुमचा मतलब साध्य करण्यात सफल व्हाल. नवीन जागी किंवा टेबलावर बदली हवी असल्यास प्रयत्न करा. घरामध्ये कार्यक्रम ठरवाल. विवाह, वास्तुशांत, इतर कार्यक्रमांना तुमची हजेरी लागेल.

कन्या कोणतेही काम करण्यापूर्वी पशासंबंधी विचार तुमच्या मनात अगोदर येतो. ते गणित जमले तरच तुम्ही पुढे जाता. पण या आठवडय़ात तुमची स्थिती कळतं पण वळत नाही अशी होणार आहे. व्यापार-उद्योगात बरेच पसे खर्च होतील. पण हे खर्च भविष्यात उपयोगी पडतील. एखाद्या जुन्या कामातून नवीन काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी जादा सवलत मिळेल. घरामध्ये कोणतीही जादाची जबाबदारी तुम्हाला नको असेल. छोटय़ा ट्रिपचे बेत ठरतील.

तूळ काही कामे अशी असतात, ज्यामध्ये एक प्रकारचे केवळ आंतरिक समाधान लाभते. असे एखादे चांगले काम या आठवडय़ात तुमच्या हातून होईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाइकांच्या शब्दाला मान द्या. त्यातून तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा होईल. जोडधंदा असणाऱ्यांना नवीन अशील मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रावीण्याला महत्त्व मिळाल्यामुळे  कॉलर ताठ असेल. वृद्धांना दीर्घकाळानंतर लांबच्या नातेवाइकांना भेटता येईल.

वृश्चिक अडचणी, अडथळे कोणालाच नको असतात. पण त्यातूनच कधी कधी चांगला मार्ग निघतो आणि प्रगतीच्या नवीन वाटा मिळतात, असा दृष्टिकोन ठेवून काम केलेत तर तुम्ही आशावादी राहाल. व्यापार-उद्योगातून पूर्वी तुमच्या हातून निसटलेली एखादी संधी परत येण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी तुमचे धोरण लवचीक ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या अडचणीवर एखादा मार्ग काढतील. घरामध्ये इतरांच्या विचारांशी जुळवून घेतले तर सगळ्यांना आनंद होईल.

धनू स्वभावत: तुम्ही थोडेसे बंडखोर आहात. एखादी गोष्ट मनावर घेतली की ती तुम्ही पूर्ण करून दाखवता. या आठवडय़ात किचकट आणि कंटाळवाणे काम जरूर हातात घ्या. त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात एक आव्हानात्मक काम तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. योग्य व्यक्तींची योग्य कामाकरिता निवड केलीत तर तुमचा मतलब साध्य होईल. नोकरीमध्ये आवडते काम हातात असल्यामुळे झालेल्या कष्टाविषयी तुमची तक्रार नसेल.

मकर कोणतेही काम तुमच्यावर सोपवले की त्यामध्ये तुम्ही जातीने लक्ष घालता आणि स्वत:चे वेगळेपण सिद्ध करता. या आठवडय़ात तुमच्या स्वभावातील हा कंगोरा विशेषरूपाने दिसून येईल. व्यापार-उद्योगात फार धावपळ करायची नाही असे ठरवाल. नोकरीमध्ये वरिष्ठांना नेमके काय पाहिजे आहे याचा अंदाज घेऊन कामाला प्राधान्य द्याल. नातेवाईक आणि आप्तेष्टांना तुमचा सहवास आणि सक्रिय मदत या दोन्हीमुळे आदर वाटेल.

कुंभ जी गोष्ट तुम्हाला मनापासून पाहिजे आहे ती मिळविण्याकरिता तुम्ही तुमचे कौशल्य पणाला लावाल. व्यापार-उद्योगात आपले चांगले काम गिऱ्हाइकांना आवडावे यासाठी प्रयत्नशील राहाल. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना केलेल्या कामाची पावती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना नेमके काय हवे आहे अशा कामांना प्राधान्य द्याल. घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडेल. त्यामध्ये तुमच्या हुशारीची चुणूक इतरांना दिसून येईल.

मीन स्पर्धा किंवा चुरस असल्याशिवाय माणसाच्या कौशल्याची खरी परीक्षा होत नाही. या आठवडय़ात एखाद्या कारणाने तुम्हाला तुमचे प्रावीण्य खऱ्या अर्थाने दाखवावे लागेल. व्यापार-उद्योगात तुमच्या क्षेत्रातील स्पर्धा काही कारणाने तीव्र होईल. भांडवलाची सोय झाल्यामुळे काही कामांना गती येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमची एखादी मागणी मान्य करतील. त्याच्या बदल्यात जादा काम करावे लागेल. घरामध्ये सर्वाच्या आवडीचा एखादा बेत ठरेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader