मेष प्रत्येक कामात पुढाकार घेऊन स्वत:ची जबाबदारी तुम्ही  वाढवून घेता. कधी कधी यामुळे तुम्हाला विनाकारण त्रास होतो. व्यापारउद्योगात एखाद्या नवीन कल्पनेने तुम्ही भारावून जाल. हातातले पसे योग्य आणि आवश्यक कारणाकरिताच खर्च करा. नोकरीच्या ठिकाणी तुमची इच्छा नसली तरी हाताखालच्या व्यक्तीकडून काम करून घेण्यासाठी त्यांना चुचकारून आणि गोंजारून काम करून घ्यावे लागेल. मुलांकरिता वेळ, पसे राखून ठेवणे चांगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ या आठवडय़ात काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याची तुम्हाला प्रचीती येईल. बाजारातील एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये सहभागी व्हाल. नोकरीमध्ये तेच तेच काम पुन्हा करायला लागल्यामुळे तुमच्याकडून आळस होईल. पण तुम्ही वरिष्ठांना ही गोष्ट कळू देणार नाही. बदलीच्या कामात थोडा विलंब होईल. घरामध्ये सुट्टीतील काही कार्यक्रम अर्धवट राहिले असतील तर ते पूर्ण कराल. घरामध्ये जोडीदाराकडून तुमचे हट्ट पूर्ण करून घ्याल.

मिथुन काय योग्य आणि काय अयोग्य याविषयी तुमच्या मनात संभ्रम असेल. त्यातून बाहेर पडण्याकरिता बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यापार-उद्योगात जरी नवीन कल्पना मनात आल्या तरी त्यावर लगेच कृती करू नका. जमा-खर्चाची आकडेमोड कागदावर व्यवस्थितपणे करा. नोकरीमध्ये वरिष्ठ छोटेसे आमिष दाखवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. ही गोष्ट नंतर तुमच्या लक्षात येईल. हातातले पसे खर्च कराल आणि नंतर त्याचे तुम्हाला वाईट वाटेल.

कर्क ग्रहमान तुमची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढविणारे आहे. ग्रह तुम्हाला अनुकूल असल्याने ‘नाही’ हा शब्द तुम्हाला खपणार नाही.  पशाचे व्यवहार आणि गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या मतलबाकरिता तुमची स्तुती करून तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील. त्या नादात तुम्ही नेहमीपेक्षा जास्त काम कराल. घरामध्ये तुम्ही तुमचे म्हणणेच खरे कराल. त्यांचा  इतरांना राग येईल. मुलांच्या प्रगतीविषयी मनात काळजी वाटेल.

सिंह सर्व ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमची परिस्थिती ‘मन की खुशी, दिल का राज’ अशी असणार आहे. कोणीही आणि कोणत्याच बाबतीत विरोध केलेला तुम्हाला चालणार नाही. व्यवसाय-उद्योगात तुमचा कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. अर्धवट राहिलेली सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार बऱ्याच कष्टानंतर तुम्ही मार्गी लावू शकाल. पूर्वी केलेल्या कामातून नवीन काम मिळेल. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळाल्याने तुम्ही जास्त हुरळून जाल.

कन्या जीवनामधील काही गणिते अशी असतात की ज्याचे पशामध्ये मोजमाप करता येत नाही. एखाद्या व्यवहारात तुम्ही अडकून पडाल. व्यापार-उद्योगात जास्त पसे गुंतवण्याची तुमची तयारी नसेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी वेळेत काम संपवण्याची खात्री करून घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने काम करण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकाल.

तूळ नवीन कल्पना तुमच्या मनात घोळत असतात. त्या लगेच अमलात आणाव्याशा वाटतात. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येतील. वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुम्हाला भूलभुलय्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. नीट विचार केल्याशिवाय कामाला हात घालू नका. घरामध्ये सर्व जण आनंदी आणि उत्साही मूडमध्ये असतील. त्यांना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला हात सल सोडावा लागेल.

वृश्चिक ज्या कामाला तुमच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही अशा  कामाला वेग येईल. याउलट ज्याची आवश्यकता आहे असे काम रखडल्याने तुमची थोडीशी चिडचिड होईल. व्यापार-उद्योगात सहज आणि सोप्या वाटलेल्या कामात थोडीफार गुंतागुंत निर्माण होईल. खेळत्या भांडवलाची तात्पुरती सोय होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ एकाच वेळी बरीच कामे सांगतील. कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचे याविषयी कामे सांगतील. मोठय़ा व्यक्तींना सांभाळताना तारेवरची कसरत होईल.

धनू आपुलकीच्या व्यक्ती जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला समजून सांगतात त्या वेळी ती गोष्ट तुम्हाला पटत नाही. पण तीच गोष्ट बाहेरच्या व्यक्तींनी सांगितली की तुम्हाला लगेच पटते याचे दर्शन इतरांना घडेल. व्यापार-उद्योगात जे बेत तुम्ही मनाशी ठरवाल त्यामध्ये बदल न करता ते निश्चयाने पार पाडाल. आíथक व्यवहारात काटेकोर राहा. घरामध्ये मोठय़ा व्यक्ती काय सांगतात ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतले तर तुमचाच फायदा होईल. जोडीदाराची सक्रिय मदत उपयोगी पडेल.

मकर ज्या कामात तुम्ही जातीने लक्ष घालाल त्या कामाला चांगला वेग येईल पण आळस महागात पडेल. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचा मोह होईल. त्यातून तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञा उलट-सुलट असल्याने तुमचा गोंधळ होईल. शांतचित्ताने विचार करून काम करायला सुरुवात करा. घरामध्ये प्रिय व्यक्तींच्या मागण्या थोडय़ाशा महागडय़ा असतील. एखादे शुभकार्य घाईत पार पडेल.

कुंभ बुद्धिमान रास म्हणून तुमच्या राशीची विशेष ओळख आहे. पण एखाद्या प्रश्नावर खऱ्या हितचिंतकाची तुम्हाला मदत होईल. व्यापार-उद्योगात नेहमीच्या कामाचा कंटाळा येईल. पशाची आकडेमोड करून मग निर्णय घ्या. नोकरीच्या ठिकाणी इतरांना तुम्ही आत्मीयतेने मदत कराल. पण तुमच्या कामामध्ये मात्र तुम्हाला गोंधळून गेल्यासारखे होईल. घरामधला एखादा प्रश्न तातडीने सोडवावा लागेल. अशा वेळी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवा.

मीन तुम्ही ज्यांच्याशी व्यवहार करता त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता. व्यापारी वर्गाला आणि कारखानदारांना कामाचा विस्तार करावासा वाटेल. नवीन व्यक्तींशी हातमिळवणी करण्यापूर्वी त्यांच्या अटी समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामात तुमच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमची कॉलर ताठ असेल. घरामध्ये सगळ्यांचे हट्ट पुरविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. त्या नादात तुमचा वेळ आणि पसे कसे खर्च झाले हे तुम्हाला कळणार नाही.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com