मेष स्वभावत: तुम्ही भावनाप्रधान नाही. पण या आठवडय़ात ज्या घटना घडतील त्यामुळे तुम्ही थोडेसे हळवे बनाल. व्यवसाय-उद्योगात पसे कमविण्याचा एखादा नवीन मार्ग शोधाल. मात्र त्याकरिता कायद्याचा भंग होऊ देऊ नका. नोकरीमध्ये तुम्ही चांगले काम कराल. पण वरिष्ठांचे समाधान न झाल्यामुळे तुमची चिडचिड होईल. घरामधल्या नतिक जबाबदाऱ्या जाणवतील. कामाच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही, असे तुम्हाला वाटेल.

वृषभ ज्या व्यक्तींना त्यांच्या अडचणीच्या वेळी पूर्वी तुम्ही मदत केली होती, त्या व्यक्तींकडून परतफेडीची अपेक्षा ठेवू नका. कारण आयत्या वेळी त्यांचीच काही तरी अडचण निघेल. त्याऐवजी स्वयंभू राहणे चांगले. व्यवसाय-उद्योगात कामाचे प्रमाण तात्पुरते कमी असल्यामुळे तुमच्या मनात उलटसुलट विचार चालू असतील. पण सद्य:स्थितीत मोठे बदल न करता जैसे थे ठेवणे चांगले. घरामधील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आणि स्वतचे मन:स्वास्थ्य जपा.

मिथुन एखादे काम, जे बरेच दिवस लांबत आले होते ते पूर्ण करण्याची आता तुम्हाला घाई असेल. त्याकरिता वेळप्रसंगी अयोग्य व्यक्तीशी संगत धरण्याचा तुम्हाला मोह होईल. असा मोह तुम्हाला नंतर महागात पडेल. व्यापार-उद्योगात पूर्वी तुमच्या हातून बेकायदेशीर काम झाले असेल तर त्याची भरपाई करावी लागेल. नोकरीमध्ये तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून जोडीदाराशी रुसवे-फुगवे होतील.

कर्क काही तरी कमवण्यासाठी काही तरी गमवावे लागते, याचा अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. व्यापारात एकंदरीत कामकाज चांगले होईल. जुनी आणि लांबलेली वसुली करायला हा कालावधी चांगला आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची एखादी चूक दाखवून देतील. त्याचा नकारार्थी विचार न करता भविष्यात आपल्याला उपयोग होईल असा विचार करा. घरामधल्या मोठय़ा व्यक्तीचे बोलणे जरी योग्य असले तरी इतरांना ते पटणार नाही.

सिंह निरभ्र आकाशात अचानक ढग गोळा झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशी परिस्थिती आता तुम्ही अनुभवाल. व्यापार-उद्योगातील नवीन करार करण्यापूर्वी त्यातील अटींचा अभ्यास करा. कायद्याची बाजू नीट सांभाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. तुमचे बेत गुप्त ठेवा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. रक्तदाब किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळणे चांगले.

कन्या प्रत्येक माणूस काही तरी चांगले घडेल या आशेवर जगत असतो. व्यापार-उद्योगात ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करणार आहात त्यांची नीट माहिती मिळवा. सरकारी नियम आणि कोर्ट व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या कलाने वागता तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल. घरामधल्या लहान आणि मोठय़ा व्यक्तींच्या गरजांना तोंड देणे जड जाईल. तुमच्या हातून चूक झाली तर त्यांना ती परवडणार नाही.

तूळ सध्याचे ग्रहमान तुमच्या जीवनात ढवळाढवळ निर्माण करणारे आहे. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या कामा-संबंधीची बोलणी आठवडय़ाच्या सुरुवातीला करा. जोडधंद्यात ‘आज रोख, उद्या उधार’ असे धोरण ठेवा. नोकरीमध्ये बरीच कामे तुमच्या मागे लागलेली असतील. त्यामध्ये एखादे काम तुमच्या हातून विसरले तर वरिष्ठांना ते आवडणार नाही. घरामध्ये वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा जुन्या प्रश्नांवरून उलटसुलट चर्चा होईल.

वृश्चिक ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असाल त्यांची काही तरी अडचण निघाल्यामुळे तुम्हाला पर्यायी विचार करून ठेवणे गरजेचे होईल. व्यापार-उद्योगात काम वाढविण्याकरिता भागीदारी किंवा मत्रीकराराचे नवीन प्रस्ताव  पुढे आले तरी त्याला ताबडतोब होकार देऊ नका. नोकरीमध्ये तुम्ही चांगले काम कराल, पण वरिष्ठांना त्याची किंमत नसल्याने तुम्हाला वाईट वाटेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील. त्यांचा सल्ला धुडकावून लावू नका.

धनू अनेक विचार आणि अनेक बेत मनात असल्यामुळे नेमके काय करायचे हे तुम्ही ठरवू शकणार नाही. व्यापार-उद्योगात कोणतेही काम करताना सरकारी नियमांचा भंग होऊ देऊ नका. कामगारांकडून मदत हवी असेल तर त्यांना काही आमिष दाखवावे लागेल. आíथक बाजू थोडीफार  सुधारण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही बरेच काम कराल. पण वरिष्ठांना त्याचे महत्त्व नसल्यामुळे केलेले काम वाया गेले असे तुम्हाला वाटेल.

मकर तोंड झाकले तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड उघडे पडते, अशी तुमची स्थिती निर्माण होईल. व्यापार-उद्योगात सरकारी नियम आणि कोर्ट व्यवहार याकडे लक्ष द्या. सबसे बडा रुपया नियमानुसार पशाच्या देण्याघेण्याला प्राधान्य द्या. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर प्रमाणाबाहेर अवलंबून राहू नका. नाही तर तुमच्या कामात गोंधळ होईल. संस्थेच्या धोरणाविषयी मतप्रदर्शन न करणे चांगले. बुजुर्ग व्यक्तींच्या स्वास्थ्याला जपा. जोडीदाराशी खटके उडतील.

कुंभ तुम्हाला कामही पाहिजे आणि विश्रांतीही हवी असेल, तर या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यामुळे काही तरी तडजोड करावी लागेल. व्यापार-उद्योगात कोणतेही बेत करण्यापूर्वी सरकारी नियमांचा अभ्यास करा. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा तुम्हाला कंटाळा आला आहे तेच काम वरिष्ठ तुम्हाला करायला लावतील. जोडधंदा असणाऱ्यांनी जास्त पशाची हाव धरू नये. घरामध्ये किरकोळ कारणावरून तुमचे मतभेद होतील. त्याचा जास्त विचार करू नका.

मीन एखादे महत्त्वाचे काम करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या माणसांची साथ मिळवावी लागेल. व्यापार-उद्योगामध्ये कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून राहू नका. तुमच्याकडे काही वेगळा पर्याय असेल तर त्याचाही विचार करून ठेवा. पशाचे व्यवहार हाताळताना तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बोलण्यावर एकदम विश्वास न ठेवता सत्य परिस्थिती समजून घ्या. वरिष्ठांच्या सूचना शांतपणे ऐकून मग कामाला सुरुवात करा.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader