मेष एखादे काम अवघड असले तरी त्यांचा नाद  सोडून न देता पिच्छा पुरवत राहाल. व्यापार-उद्योगात ज्या कामात  विलंब झाला होता त्यामध्ये गती आणण्याचा प्रयत्न कराल. तुमचे हितचिंतक काही प्रमाणात उपयोगी पडतील. तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास घडेल. नोकरीमध्ये  सहकाऱ्यांशी शक्यतो मोजकेच बोला. घरामध्ये लागणारा वेळ आणि पसे तुमच्याकडे नसल्याने थोडेसे अस्वस्थ व्हाल.

वृषभ आर्थिक स्थिती ज्यावेळी चांगली असते त्यावेळी तुमचा मूड चांगला असतो. आता हळूहळू ही स्थिती सुधारण्याची शक्यता असल्याने तुमच्यात एक प्रकारचा उत्साह संचारेल. व्यवसाय-उद्योगात आíथक आणि इतर स्थितीचा आढावा घेऊन सध्याची कार्यपद्धती बदलावीशी वाटेल. नोकरीमध्ये कंटाळवाणे काम संपल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकाल. एखादे आवडते काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. घरामध्ये वादविवाद झाले असतील तर त्यावर समेट घडेल.

मिथुन मनामध्ये एखाद्या प्रश्नासंबंधी उलट-सुलट विचार येत राहतील. पण सप्ताहाच्या मध्यानंतर तुम्ही आशावादी बनाल. व्यापार-उद्योगात ज्यांना पसे द्यायचे कबूल केले होते त्यांची देणी वेळेत द्या. प्राप्ती वाढविण्याकरिता एखादी नवीन कल्पना तुम्हाला सुचेल. जोडधंद्यातून थोडीफार कमाई होण्याची आशा दिसू लागेल. नोकरीमध्ये किचकट आणि कंटाळवाणे काम संपण्याची चिन्हे दिसू लागतील.  घरामध्ये वादविवाद झाले असतील, तर त्यावर तोडगा निघू शकेल.

कर्क छानछोकी, फॅशन किंवा आधुनिक जीवन या गोष्टींविषयी तुम्हाला विशेष आकर्षण नसते. त्यापेक्षा तुम्ही साधी राहाणी पसंत करता, पण या आठवडय़ात मात्र स्वत:चे व्यक्तिमत्त्व खुलवण्याकरिता प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांची पसंती बदलल्यामुळे विक्री थोडीशी कमी होईल. जुनी देणी असतील तर ती वेळेत देऊन टाका. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या व्यक्तींनी केलेले काम तपासून पहा. घरामध्ये काही अपरिहार्य खर्च उद्भवतील.

सिंह कोणतेही काम करताना ते काम घाईत पूर्ण करण्याची तुमची सवय असते. पण या आठवडय़ात तुमच्या कृतीला युक्तीची जोड दिलीत तर सोन्याहून पिवळे. व्यापार-उद्योगात एखादा प्रश्न कठीण होऊन बसला असेल तर त्यावर तुम्ही मार्ग शोधून काढाल. नोकरीच्या ठिकाणी आवडत्या कामामध्ये संस्थेतर्फे तुमचा समावेश केला जाईल. त्यानिमित्ताने परदेशगमन किंवा इतर सवलती मिळतील. घरामध्ये ताणतणाव निर्माण झाला असेल तर त्यावर सोयीस्कर तोडगा निघेल.

कन्या ग्रहमान सुधारत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आता वाढणार आहे. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम गिऱ्हाईकांना आवडल्यामुळे त्यांच्याकडून नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी न जमलेले काम हातात घेऊन तुम्ही युक्तीच्या जोरावर संपवाल. काही जणांची पगारवाढ किंवा बढतीकरिता रदबदली होईल. घरामध्ये तुमच्या सल्ल्याचा सर्व जणांना उपयोग होईल.  नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी वार्तालाप झाल्यावर तुम्हाला बरे वाटेल.

तूळ ग्रहमान चकवा निर्माण करणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला सगळ्या गोष्टी कठीण वाटतील, पण नंतर  तुमचा आत्मविश्वास बळावेल. व्यापार-उद्योगात किचकट काम संपवणे भाग पडेल. त्यानिमित्ताने खरे आणि खोटे साथीदार कोण आहेत याची परीक्षा होईल. नोकरीमध्ये कोणत्याही कामाचा जास्त तणाव न घेता तुमच्या पद्धतीने काम करत राहा. घरामध्ये ज्यांनी नकारघंटा ऐकविली होती त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

वृश्चिक प्रतिकूल वातावरणामध्ये लवचिक धोरण ठेवून तुम्ही तुमचा बचाव करता, या गुणाचा तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना किंवा कल्पना तुमच्यामध्ये चतन्य निर्माण करेल. आíथक स्थिती थोडीफार सुधारेल. नोकरदार व्यक्तींना पूर्वी केलेल्या कामाचा कुठे ना कुठे तरी शॉर्टकट मिळून अवघड काम सोपे होईल. घरामध्ये मुलांच्या प्रगतीकरिता वेळ आणि पसे दोन्ही बाजूला काढून ठेवा. शेजारी आणि सहकाऱ्यांशी समेट घडवून येईल.

धनू वर्षांच्या सुरुवातीपासून काही प्रश्न तुमच्या आटोक्याबाहेर गेले असतील तर ते थोडेसे नियंत्रणात आल्यासारखे वाटेल. पण हा तात्पुरता दिलासा आहे हे लक्षात ठेवा. व्यापार-उद्योगात एखाद्या कामातले पसे अडकून पडले असतील तर ते आता थोडय़ा प्रमाणात हातात पडतील. नोकरीमध्ये पूर्वी तुम्ही केलेल्या कामाचे महत्त्व वाटले नसेल तर आता ते वाटेल. नवीन नोकरीकरिता जोमाने प्रयत्न करा. घरामध्ये राग लोभाचे प्रसंग येतील, पण ते जास्त ताणून धरू नका.

मकर पैशाविषयी तुम्ही खूप काटेकोर असता. कोणाला पसे द्यायचे असतील किंवा कोणाकडून पसे घ्यायचे असतील तर तुमच्या जिवाला स्वस्थता लाभत नाही. व्यापार-उद्योगात कष्टदायक वाटणारे काम वाटय़ाला येईल. ते स्वीकारण्यापूर्वी त्यातील बारकावे नीट समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी हितचिंतक आणि आपुलकीच्या व्यक्ती तुम्हाला मदत करायला तयार होतील, पण त्यावर जास्त अवलंबून राहू नका. नातेवाईक, आप्तेष्टांशी शक्यतो उधार-उसनवार करू नका.

कुंभ गेल्या एक-दोन आठवडय़ांमध्ये काही कारणाने तुमची कामे लांबली असतील तर त्याला आता वेग येईल. या संधीचा फायदा घेऊन अत्यावश्यक गरजांकडे लक्ष द्या. व्यापार-उद्योगात एखाद्या बातमीची तुम्ही अधीरतेने वाट बघत असाल तर ती मिळण्याची कुणकुण लागेल. तुमच्या मनामध्ये मात्र थोडीशी साशंकता असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौशल्य योग्य प्रकारे उपयोगात आणता येईल. बदलीच्या कामात विलंब होण्याची शक्यता आहे.

मीन तुमच्या दैनंदिनीमधला व्याप जरी वाढत असला तरी या आठवडय़ात तुम्हाला घरगुती गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाची कामे ताबडतोब पूर्ण करा. एखादी नवीन कल्पना गिऱ्हाइकांना आकर्षति करेल. नोकरदार व्यक्तींना तातडीचे काम हाताळण्याकरिता छोटा प्रवास करावा लागेल.  घरामध्ये मोठय़ा व्यक्तींकरिता किंवा मुलांकरिता थोडा वेळ आणि पसे बाजूला काढून ठेवा. एखाद्या समारंभानिमित्ताने नातेवाईक आणि मित्रमंडळी भेटतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader