मेष आपल्या जीवनामध्ये काही व्यक्ती विशिष्ट कालावधीकरिता येतात आणि नंतर एखाद्या कारणाने निघून जातात. दरम्यानच्या काळात त्या व्यक्तीचा आपल्यावर बराच प्रभाव असतो. याचा आता  प्रत्यय येईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात ज्या नवीन योजनांवर तुम्ही विचार करत असाल त्यामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी गुंतागुंतीच्या कामात सहकारी एखादा शॉर्टकट सुचवतील. जुन्या ओळखींचा उपयोग होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ बऱ्याच दिवसांनंतर धावपळ कमी झाल्यामुळे तुम्ही थोडेसे स्वच्छ आणि शांत दिसाल. जरी तुमच्यापुढे कामे असतील तरी ते हाताळण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल. व्यापार-उद्योगात एखादे नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे. त्याकरिता आवश्यक त्या भांडवलाची तुम्ही व्यवस्था कराल. नोकरीमध्ये तुमच्या सभोवतालचे वर्तुळ बदलेल. एखादे नवीन तंत्रज्ञान शिकावेसे वाटेल. घरामध्ये नेहमीच्या व्यक्तीच्या लांब जाण्यामुळे पोकळी जाणवेल.

मिथुन प्रिय व्यक्तींविषयी किंवा मुलांविषयी एखादी समस्या तुम्ही सोडविली असेल तर पुन्हा काही कारणाने ती डोके वर काढण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात भूलभुलैया निर्माण करणारी एखादी कल्पना तुमचे लक्ष विचलित करेल, परंतु त्याचा सारासारविचार बुद्धीने न्यायनिवाडा करा. नोकरीमध्ये कामाच्या बाबतीत सहकारी आयत्या वेळी त्यांनी दिलेला शब्द फिरवतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी तात्त्विक मतभेद किंवा इतर कारणामुळे दुरावा निर्माण होईल.

कर्क भोवतालच्या व्यक्ती आणि एकंदर परिस्थिती यांची साथ मिळवण्यातच तुमची बरीचशी शक्ती खर्ची होईल. त्यामुळे पुढे पुढे कामाचा कंटाळा येईल. व्यापार-उद्योगात मात्र उसने अवसान आणून काम करावे लागेल. ज्या कामात तुमच्याकडून दुर्लक्ष होईल तिथे गडबड-गोंधळ होण्याची शक्यता आहे. पशाची आवक कमी राहील. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी एखादी युक्ती लढवावी लागेल. घरामध्ये वातावरण थोडेसे कंटाळवाणे वाटेल.

सिंह तुमच्या नेहमीच्या स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक बाबतीत प्रचंड उत्साही असाल. पण त्याला योग्य व्यक्तीची साथ न मिळाल्याने तुम्हाला थोडीशी तडजोड करावी लागेल. व्यवसाय-उद्योगात आíथक परिस्थिती सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची कल्पकता आणि कृतिशीलता या दोन्हींचा उत्तम समन्वय होईल. घरामध्ये तुम्ही केलेल्या कामाची इतरांकडून प्रशंसा होईल. आवडत्या व्यक्तींच्या अनुपस्थितीमुळे एक प्रकारची मनात पोकळी जाणवेल.

कन्या दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्या कामाने तुमची खूप निराशा केली होती ते काम आता मार्गी लागेल. व्यापारी वर्गाला एखादी महत्त्वाची आणि प्रतिष्ठा वाढविणारी ऑर्डर मिळेल. काम करून अडकून राहिलेले पसे हातात पडतील. नोकरीमध्ये तुमच्या गुणांना आणि कौशल्यांना भरपूर वाव असल्यामुळे तुम्हाला मागणी राहील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना यश मिळेल. एखादी इच्छा मनात रेंगाळत असेल तर ती पूर्ण करण्याचे योग संभवतात.

तूळ एखाद्या कारणाने गेल्या एक-दोन आठवडय़ांत विनाकरण मनस्ताप झाला असेल तर त्यावर उपाय मिळेल. व्यापार-उद्योगात आíथक किंवा तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या कामांना  वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. नोकरीमध्ये नवीन पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवल्यामुळे सभोवतालचे वर्तुळ बदलेल. घरामध्ये योग्य व्यक्तीची योग्य कामात मदत झाल्यामुळे ताणतणाव कमी होईल.

वृश्चिक ‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीची तुम्हाला आठवण येईल. अशा परिस्थितीत हरून न जाता तुम्ही मोठय़ा हिमतीने उभे राहाल. व्यापार-उद्योगात कितीही अडथळे आले तरी तुमचे काम तुम्ही चालूच ठेवाल. भावनेच्या भरात भलतेच धाडस करू नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीचा आणि जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. मुलांच्या प्रश्नामध्ये काही तरी चांगला मार्ग निघेल. नोकरदार व्यक्तींना केलेल्या कामाचे कौतुक वरिष्ठांकडून ऐकायला मिळेल.

धनू ‘विना सहकार नाही उद्धार’ या वाक्याची आठवण ठेवून सगळ्यांशी मिळतेजुळते घ्या. व्यापार-उद्योगात अपेक्षित पसे कष्टाने का होईना हातात पडतील. तुमच्या निकडीच्या गरजा तुम्ही भागवू शकाल. भागीदारी किंवा मत्री कराराचे नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. नोकरीच्या ठिकाणी जोखमीचे काम हाताखालच्या व्यक्तींवर सोपवले असेल तर ते पुन्हा एकदा तपासून पाहा. घरामध्ये तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे कोणाचा अवमान होणार नाही याची खबरदारी घ्या.

मकर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला ज्या कामात अडथळे येत होते त्याला गती देण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हाल. व्यापार-उद्योगात जी कामे ठप्प झाली होती ती अचानक सुरू झाल्यामुळे तुमची धावपळ उडेल. क्वचितप्रसंगी रात्रीचा दिवस करून काम करावे लागेल. नोकरीमध्ये तुमचे कौशल्य एखाद्या कामात पणाला लागेल. नेहमीच्या सहकाऱ्याची अनुपस्थिती असल्याने त्याचेही काम करावे लागेल. घरामध्ये प्रत्येक कामात आपला पुढाकार असावा असे तुम्हाला वाटेल.

कुंभ ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. ज्या कामाचा नाद तुम्ही सोडून दिला होता त्यामध्ये वेग यायला सुरुवात होईल. व्यवसाय-उद्योगात पूर्वीचे काम आटोक्यात आल्याने नवीन संधीकरिता तुम्ही प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या कामावर तुमची नेमणूक होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश लाभेल. घरामध्ये इतरांच्या कलाने तुम्हाला वागावे लागेल, पण त्याचा तुम्हाला राग येईल. नवीन व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटेल.

मीन एखाद्या महत्त्वाच्या कामात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तुमचा उत्साह बारगळण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण, नीटनेटकेपणा या गोष्टींकडे लक्ष द्याल. जी कामे कंटाळून लांबवलेली होती ती कामे पूर्ण करा. नोकरदार व्यक्तींना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या गरजा भागवता भागवता तुमची दमछाक होईल. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com