01vijay1मेष उसने अवसान आणून काम करणे म्हणजे काय ते तुमच्याकडे बघून समजेल. एखादी गोष्ट करणे अवघड आहे हे माहीत असूनही तुम्ही त्यासाठी जिद्दीने प्रयत्न कराल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांचे लक्ष आकर्षति करण्यासाठी एखादी नवीन योजना आखून ठेवाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेले एखादे काम वरिष्ठांना आणि संस्थेला उपयोगी पडेल. घरामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ या जगात सगळी सोंगे आणता येतात, पण पशाचे सोंग आणता येत नाही, हे मानणारी तुमची रास आहे. त्यामुळे थोडासा दूरदर्शी विचार करून तुम्ही सर्व गोष्टींचे नियोजन कराल. व्यापार-उद्योगात जाहिरातीचा खर्च नाईलाजाने करावा लागेल. पण त्यात तुम्ही एखादी युक्ती शोधून फायद्याचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न कराल. तो फलदायी ठरेल. नोकरीमध्ये ज्या कामातून तुमचा स्वार्थ आहे, असे काम तातडीने पूर्ण कराल. घरामध्ये आपलुकीच्या माणसांची हजेरी लागेल.

मिथुन सभोवतालच्या वातावरणात ज्यावेळी ‘हलचल’ असते त्यावेळी तुम्ही एकदम खूश असता. अशी छान संधी तुम्हाला या आठवडय़ात मिळणार आहे. व्यापारी वर्गाला भरपूर काम करावेसे वाटेल. जाहीरातबाजीचा उपयोग होईल. नोकरीमध्ये स्वत: काम न करता इतरांकडून तुम्ही काम करून घ्याल. बेकार व्यक्तींना तात्पुरते काम मिळेल. घरामध्ये तुमच्या हलक्याफुलक्या बोलण्यामुळे वातावरणात  मौजमजा येईल. त्याचा सर्वजण आस्वाद घेतील.

कर्क ग्रहमान तुमच्या उत्साही स्वभावाला खतपाणी घालणारे आहे.  व्यापारी वर्गाला गिऱ्हाईकांची ये-जा चांगली असल्यामुळे एका कामाव्यतिरिक्त दुसरे काहीही सुचणार नाही. पशाची उलाढाल मनाप्रमाणे होईल. गिऱ्हाईकांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या नवीन कार्यपद्धतीचा श्रीगणेशा करावासा वाटेल. त्याला आवश्यक असणाऱ्या व्यक्तींकडून चांगली साथ मिळेल. घरामधल्या प्रत्येक व्यक्तीची गरज भागवण्याकरिता तुम्ही सक्रिय बनाल.

सिंह एकाच वेळी तुमचे घर आणि करियर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागल्याने तुमची तारांबळ उडेल. पण त्यातही एक मजा असेल. व्यापार-उद्योगात निष्णात व्यक्तीचा सल्ला आणि तुमचे कर्तव्य या दोन्हीचा चांगला समन्वय झाल्याने तुम्हाला उत्तम दर्जाचे काम करता येईल. एखादा महत्त्वाचा आणि मोठा सौदा होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ ठरविलेले कार्यक्रम अचानक बदलून टाकतील.  घरामध्ये खरेदीचे पूर्वी ठरलेले बेत पार पडतील.

कन्या ग्रहमान चांगले असल्यामुळे तुमची लालसा वाढणार आहे. अधिक प्रतिष्ठा किंवा अधिक नाव मिळविण्यासाठी तुमच्या कार्यपद्धतीत बदल करावेसे वाटतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्ही केलेल्या चांगल्या कामगिरीचे बाजारपेठेत कौतुक होईल. धनप्राप्ती मनाप्रमाणे असल्याने तुम्ही खूश असाल. नोकरीत कामाचा दर्जात सुधारणा करण्यासाठी वरिष्ठांना काही नवीन गोष्टी सुचवाल. कोणत्याही कामाचा दबाव न घेता तुम्ही जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्याल.

तूळ स्वभावत: तुम्ही आनंदी व उत्साही असता. जे आपल्याजवळ नाही त्याचा विचार न करता जे आहे त्याचा मनमुराद आनंद घेता. या आठवडय़ात या तुमच्या स्वभावामुळे सभोवतालचे वातावरण हसते-खेळते ठेवाल. व्यापार-उद्योगात कामकाज वाढल्याने तुम्हाला बरे वाटेल. पूर्वीची काही देणी देऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वैशिष्टय़पूर्ण कल्पनांना भरपूर वाव मिळेल.

वृश्चिक इतरांना काय वाटते याची पर्वा न करता तुम्ही आलेल्या क्षणाचा आनंद घ्यायचे ठरवाल. त्यामध्ये कोणीही अडसर आणू शकणार नाही. व्यापार-उद्योगात बरेच दिवस लांबलेले काम तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. आíथक प्राप्तीमध्ये चांगली भर पडेल.  जोडधंद्यातून फायदा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही दिलेला एखादा सल्ला संस्थेला आवडल्यामुळे तुमचा भाव वधारेल. बराच काळ वाट पाहात असलेल्या बेकार व्यक्तींना काम मिळेल.

धनू द्विस्वभावी रास असे तुमच्या राशीला म्हटले जाते. पसे खर्च करायचे नाहीत, काटकसरीने राहायचे असे तुम्ही नुसते म्हणत राहाल. परंतु वेळ आली की स्वत:च खर्च वाढवाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना नेमके काय पाहिजे आहे याचा अभ्यास करून विक्री आणि उलाढाल वाढविण्यात सफल व्हाल. तुमचा खिसा गरम राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे महत्त्व इतरांना पटल्यामुळे तुमची प्रशंसा ऐकायला मिळेल. बदली हवी असल्यास प्रयत्न करा.

मकर पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. सात-आठ महिन्यांमध्ये ज्या कामाकरिता तुम्ही धडपड करत होता ते काम नजरेच्या टप्प्यात आल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगात अधिक फायदा मिळविण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या सूचना वरिष्ठांना आवडतील. त्यामुळे तुमच्या कार्यपद्धतीत छोटे-मोठे बदल होतील.

कुंभ कोणत्याही विषयावर निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही सखोल विचार करता. या आठवडय़ातसुद्धा तसेच होणार आहे. पण तुम्ही कृती केली नाहीत तर तुमचे विचार वाया जातील. व्यापार-उद्योगात  गिऱ्हाईकांच्या विनंतीला मान दिला तर तुमचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी ठरलेले काम वेळेत पूर्ण केल्याने वरिष्ठांकडून कौतुक ऐकायला मिळेल. तुमच्या हातातल्या कामाबद्दल सहकाऱ्यांशी जास्त बोलू नका. घरामध्ये माझे तेच खरे असा हट्ट न धरता सगळ्यांच्या मतानुसार वागा.

मीन तुम्हाला सतत काहीतरी नवीन पाहिजे असते. या तुमच्या स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यामध्ये स्वत:ला झोकून द्याल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन युक्ती अमलात आणून विक्री आणि फायद्याचे प्रमाण वाढवाल. आलेल्या संधीचा फायदा उठवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत कराल. नोकरीच्या ठिकाणी जे काम कराल त्यामधून तुमचा रचनात्मक दृष्टिकोन इतरांच्या लक्षात येईल. त्याचे कौतुक होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader