01vijayमेष ग्रहमान तुम्हाला चंचल बनविणारे आहे. कामाचा वेग वाढविण्याकरिता नवीन पद्धतीचा अवलंब करावासा वाटेल. व्यापारात नवीन कामाच्या निमित्ताने वेगवेगळे हितसंबंध निर्माण होतील. आíथक बाजू थोडीशी कमजोर राहील. नोकरीत बदली किंवा कामाच्या स्वरूपात फेरफार केले जातील. नवीन कार्यपद्धती शिकणे जड जाईल. घरामध्ये कामाच्या वेळी सगळ्यांना तुमची आठवण येईल. जोडीदाराच्या विचित्र वागण्यामुळे तात्पुरता दुरावा निर्माण होईल.

वृषभ कर्तव्य व मौजमजा या दोन्ही गोष्टींचे तुमच्या दृष्टीने सारखेच महत्त्व असल्याने कामाची आखणी युक्तीने कराल. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींशी तुमचा बराच काळ संबंध होता, त्यांचे काम संपल्यामुळे एक प्रकारची पोकळी जाणवेल. नोकरीमध्ये सहकाऱ्याची कल्पना तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल आणि योग्य वेळी त्यांचा तुमच्या कामात उपयोग कराल. परिचित व्यक्तीकडून महत्त्वाची खबरबात कळेल. घरामध्ये मनाप्रमाणे न वागता आल्याने तुमची थोडी चिडचिड होईल.

मिथुन एकाच वेळी विविध प्रकारची कामे हाताळायला लागल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ उडेल. इतरांवर अवलंबून राहायचे नाही असे तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात दैनंदिन कामांना गती देण्यासाठी वेगळी पद्धत अमलात आणण्याचा विचार जरूर करा, पण त्या नादात दैनंदिन कामात दुर्लक्ष होऊ देऊ नका. पशाची आवक कमी राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेकडे कळत-नकळत दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. घरामध्ये माझे तेच खरे असा हट्ट धरू नका.

कर्क तुमच्या स्वभावामध्ये मुत्सद्दीपणा दडलेला असतो. जशी परिस्थिती असेल त्यानुसार तम्ही तुमचा पवित्रा बदलता आणि ठरविलेले उद्दिष्ट साध्य करता, याची चुणूक या आठवडय़ात इतरांना दिसून येईल. व्यापार-उद्योगात तुमच्या स्वत:च्या बाबतीत एखादा आडाखा चुकण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये सहकारी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. घरातील मोठय़ा व्यक्तींच्या वागण्यामुळे किंवा सल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. आवडती माणसे आजूबाजूला नसल्याने तुम्हाला कामाचा कंटाळा येईल. व्यापार-उद्योगात नेहमीच्या कामाकडे तुम्ही थोडेसे दुर्लक्ष कराल. एखादे नवीन काम तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये रस घ्याल. कामगारांची गरहजेरी आणि मागण्या त्रासदायक ठरतील. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेले काम पुन्हा करायला लागल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल. घरामध्ये कधी तुम्ही एकदम मॉडर्न तर कधी जुनाट वळणाचे वाटाल.

कन्या विचारांनी तुम्ही आधुनिक असता, पण तुमचे राहणीमान मात्र खूप साधे असते. या दोन्हीचा प्रत्यय या आठवडय़ात सभोवतालच्या व्यक्तींना येईल. व्यवसाय-उद्योगात एखादी मोठी मजल मारण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीमध्ये तुम्ही पूर्वी केलेले काम आणि दूरदर्शी वृत्ती या दोन्हीचा उपयोग होईल. एखाद्या चांगल्या कामगिरीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये पूर्वी ठरलेले मंगलकार्य पार पडेल. वयोवृद्ध व्यक्तींच्या गरजा भागविताना तुमची धावपळ होईल.

तूळ स्वभावत: तुम्ही रसिक असलात तरी कधी कधी मात्र तुमच्यातील तात्त्विक बठक जागृत झाल्यावर सभोवतालच्या व्यक्तींना उपदेशाचे डोस पाजाल. व्यापार-उद्योगात जुन्या कर्जाची परतफेड करण्याऐवजी नवीन कामासाठी गुंतवणूक करण्याचा मोह अनिवार्य होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे विशेष कौशल्य आणि प्रावीण्य याला मागणी असल्यामुळे बराच भाव खाल. घरामधल्या बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला शांत चित्ताने ऐकून घ्याल.

वृश्चिक आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कष्टदायक असेल. ठरविलेली कामे आपल्या हातून व्यवस्थित पार पडतील की नाही याची तुमच्या मनात शंका असेल. व्यापार-उद्योगात जे नियोजन बऱ्याच पूर्वी करून ठेवले होते त्याची अंमलबजावणी करावीशी वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या कल्पना वरिष्ठांना आवडतील. मित्र आणि सहकाऱ्यांशी बोलताना जपून राहा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला पटणार नाही, पण त्यांनी तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत हे लक्षात घ्या.

धनू ग्रहमान तुम्हाला संभ्रमात टाकणारे आहे. त्याच त्याच दैनंदिनीचा तुम्हाला मनस्वी कंटाळा आला असेल. यातून सुटका करून घेण्यासाठी कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला आराम असा फॉम्र्युला शोधून काढाल. व्यापार-उद्योगात पशाच्या काळजीने तुम्ही भविष्याकरिता तरतूद करायचे ठरवाल, पण हा तुमचा विचार म्हणजे तेरडय़ाचा रंग तीन दिवस असा प्रकार असेल. नोकरीमध्ये  जास्त जबाबदारी न स्वीकारता कमी श्रमात जास्त श्रेय घेण्याकडे कल असेल.

मकर कधी कधी तुम्ही आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा कराल, तर पुढल्या क्षणी पशाविषयी भाषा बोलायला लागाल. व्यवसाय-उद्योगात जास्त पसे मिळवण्याचे आकर्षण तुमच्या मनात निर्माण होईल. ज्या मार्गाने कमी गुंतवणूक करून जास्त पसे मिळतील तो मार्ग पसंत कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील. पण त्याला न फसता स्वत:चा फायदा करून घ्याल. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींच्या गरजांना तुम्ही महत्त्व द्याल.

कुंभ अत्यंत बुद्धिमान आणि खूप चिकित्सा करणारी तुमची रास आहे. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांची गरज समजून घेऊन त्यावर चांगला मार्ग शोधून काढाल. उत्पन्नाचे प्रमाण वाढविण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला दिले जाईल. त्यामुळे कामाचा दर्जा उत्तम राहील. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना केलेल्या कामाची पावती मिळेल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाचे तुम्ही उत्तम नियोजन कराल.

मीन उलटसुलट विचार तुमच्याकडून व्यक्त केले गेल्यामुळे सभोवतालच्या व्यक्ती कोडय़ात पडतील. जे काम तुम्ही कराल त्याचा दर्जा उत्तम राहील. व्यवसाय-उद्योगात तुमच्यातील कल्पकता विशेष रूपाने दिसून येईल. गिऱ्हाईकांना खूश करण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार काम कराल. नोकरीमधल्या कामाच्या निमित्ताने जुन्या सहकाऱ्यांशी अचानक गाठभेट होईल. रेंगाळलेली कामे हातात घेऊन ती तातडीने पूर्ण कराल. घरामध्ये एखादा शुभ समारंभ ठरेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader