मेष ‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या म्हणीची तुम्हाला आठवण येणार आहे. एखाद्या खडतर समस्येला तुम्हाला तोंड द्यावे लागेल.  व्यापारउद्योगात प्रगतीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील. त्याचा फायदा करून घेण्यासाठी तुम्हाला धाडस करावे लागेल. नोकरीमधे एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्याचा थोडासा तणाव जाणवेल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून इतरांशी वादविवाद आणि गरसमज होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ जी संधी पुढे आहे त्याचा ताबडतोब उपयोग करून घ्या, असा ग्रहांचा सल्ला आहे. त्यामध्ये हयगय झाली तर तुम्हाला नंतर आपण काहीच केले नाही असे वाटत राहील. व्यापारउद्योगात पूर्ण केलेल्या कामाचे पसे गिऱ्हाईकांकडून लवकरात लवकर वसूल करायचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील. त्यांना मदत जरूर करा. पण त्यासाठी आपल्या कामात कसूर होऊ देऊ नका. घरामध्ये प्रत्येकाचे बेत मोठे असतील. पण त्यामुळे कोणालाच कोणाकडे लक्ष देता येणार नाही.

मिथुन ज्या कामामध्ये शिथिलता आली होती, त्या कामाला वेग देण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हाल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल त्या कामाला चांगली गती मिळेल. तुमच्यातला आशावाद बळावेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामात बदल करण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवीन सहकाऱ्यांच्या दाढीला हात लावावा लागेल. घरामध्ये एखादी गोष्ट तुम्ही इतरांना शांततेने समजून सांगाल. पण त्यांना ते पटले नाही तर तुम्हाला राग येईल.

कर्क तृतीयस्थानातील गुरू तुमच्यातील धाडस निर्माण करेल. गेल्या पंचेचाळीस आठवडय़ांमध्ये जो निर्णय तुम्ही घेऊ शकला नव्हता तो घेण्याचे धारिष्टय़ तुमच्या मनात निर्माण होईल.  जुनी वास्तू विकून त्याऐवजी नवीन व्यावसायिक वास्तू घ्यावीशी वाटेल. पशाची बाजू थोडीफार सुधारेल. नोकरदार व्यक्तींना कंटाळवाणे काम संपल्यामुळे एक प्रकारचा दिलासा लाभेल. तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास घडेल. घरामध्ये तुमचा सल्ला जोडीदाराला पटवून द्याल.

सिंह कोणत्याही कामात सहजगत्या यश  मिळेल असे गृहीत धरू नका. अवघड वाटलेली कामे सोपी होतील. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात पसे गुंतवण्यापूर्वी त्यातील संभाव्य धोके जाणून घ्या. नोकरीमध्ये एखादी जबाबदारी पूर्ण झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. पण वरिष्ठ वेगळ्याच प्रकारचे काम देऊन तुमची धावपळ वाढवणार आहे. कौटुंबिक जबाबदारीच्या बाबतीत  सर्व आघाडय़ा सांभाळणे तुम्हाला जड जाईल.

कन्या तुमच्याकडे लांबून बघणाऱ्या व्यक्तींना सर्व काही चांगले असल्यासारखेच वाटेल. पण तुमच्या अडचणी तुम्हालाच माहीत असतील. व्यापारीवर्गाला नेहमीच सावध दृष्टिकोन टाकून थोडासा धाडसी पवित्रा घ्यावासा वाटेल. आíथकदृष्टय़ा मोठय़ा प्रोजेक्टमध्ये लक्ष घालण्याचा मोह होईल. नोकरीमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामुळे नेहमीच्या कामाकडे थोडेसे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे थोडेसे जड जाईल.

तूळ एखादे वेगळे काम आपण जेव्हा हाताळत असतो त्या वेळी मनात यशाविषयी आपल्याला खात्री नसते. या आठवडय़ात तुमची स्थिती अशीच असेल. व्यापारउद्योगात जे काम तुम्ही पूर्वी टाळले होते ते काम हातात घ्यायचे धारिष्टय़ निर्माण होईल. विरोधकांच्या पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नोकरीमध्ये जे काम अवघड आहे ते काम वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये एखाद्या विषयावरती इतर सदस्यांशी तुमचा वादविवाद होईल. जोडीदाराशी रुसवेफुगवे होतील.

वृश्चिक प्रगती करायची म्हटली की संघर्ष करण्याची तयारी लागते. अशी तुमची तयारी नेहमीच असते. या गुणांचा तुम्हाला आता उपयोग होणार आहे. व्यापारउद्योगात कोणतेही काम कमी न लेखता सर्व गोष्टींकडे सारखेच लक्ष द्या. नोकरीमध्ये तुमच्या कामाच्या स्वरूपात बदल होण्याचे संकेत मिळतील. सुरुवातीला भीती वाटेल, पण नंतर त्यातून चांगले घडेल. घरामध्ये ज्या मुद्दय़ावरून मतभेद होतील असे मुद्दे टाळा. मुलांच्या प्रगतीकडे थोडेसे लक्ष द्यावे लागेल.

धनू कामाचा ताणतणाव किंवा त्याचा कमी झालेला वेग यामुळे थोडासा कंटाळा येईल. पण कठोर परिश्रमाला पर्याय नाही अशी तुमची स्थिती असेल. व्यापारउद्योगात एखादे आव्हानात्मक कामासाठी जादा पशाची कुमक अत्यावश्यक होईल. नोकरीच्या ठिकाणी शॉर्टकट पाहिजे असलेले काम लांबण्याची शक्यता आहे. अखेर तुम्ही कंबर कसून तयार व्हाल. घरामध्ये किरकोळ कारणावरून इतरांशी तुमचे मतभेद होतील.

मकर हे ग्रहमान तुमच्या शांत स्वभावाविरुद्ध आहे. कोणत्याही गोष्टीचा नीट विचार केल्याशिवाय तुम्ही कधीही निर्णय घेत नाही. पण या आठवडय़ामध्ये तुम्ही थोडेसे भावनावश बनाल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी खर्चीक होईल. एखादी लांबलेली जबाबदारी मार्गी लावाल. नोकरीच्या ठिकाणी पशाकरिता अधिकारांचा गरवापर करण्याचा मोह होईल.  घरामध्ये तुमच्या बोलण्याला कोणी महत्त्व दिले नाही तर तुम्हाला राग येईल. पण कोणाशी संबंध तोडू नका.

कुंभ एखादे काम जेव्हा अगदी सोपे असते त्या वेळी तुम्हाला त्यामध्ये आव्हाने निर्माण होतात. त्या वेळी तुम्ही तुमचे कौशल्य पणाला लावता. या आठवडय़ामधे अशी एखादी संधी तुम्हाला मिळेल. व्यापारउद्योगात ज्या कामातून तुमचा जास्त फायदा आहे त्या कामाला तुम्ही प्राधान्य द्याल. त्यामुळे तुमची दगदग धावपळ वाढेल. नोकरीच्या ठिकाणी आíथकदृष्टय़ा लाभदायक कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये माझे तेच खरे हा तुमचा हट्ट असेल.

मीन काही माणसे आपल्या जीवनात विशिष्ट कारणाकरिता येतात आणि ते काम संपले की आपल्यापासून दूर होतात असा काहीसा अनुभव देणार आठवडा आहे. जे पुढे येईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवा. व्यापारउद्योगात आधुनिक तंत्रज्ञान वापरावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्यांची कामाची पद्धत बदलल्याने तुम्हाला आळस झटकून काम करावे लागेल. सर्वाच्या अपेक्षा पूर्ण कराल. स्वतच्या हौसेमौजेवर थोडीशी मुरड घालाल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com