मेष घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय चुकीचा होणार नाही याकडे लक्ष ठेवा. व्यापार-उद्योगात नवीन करार किंवा बोलणी करताना सर्व मुद्दे कागदावर मांडून घ्या. नोकरीतील तातडीच्या कामानिमित्त प्रवासाला जावे लागेल. वरिष्ठांसमोर बढाया मारल्यात तर तुमची जबाबदारी वाढेल. घरामधे लांबच्या भावंडाशी भेटण्याचा योग येईल. एखाद्या जुन्या प्रश्नांवरून नव्याने चर्चा होईल. कोणाशीही गरसमज होऊ देऊ नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ ग्रहमान थोडेसे सुधारल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. व्यापार-उद्योगात ‘रुपयाभोवती फिरते दुनिया’ याची आठवण ठेवून पशासंबंधीच्या कामाला प्राधान्य द्या. कारखानदारांनी नवीन करार करताना त्याच्या आíथक परिणामांचा विचार करावा. नोकरीमध्ये तुमच्या कामाचा वेग वाखाणण्याजोगा असेल. तुमच्या प्रगतीच्या दष्टीने एखादी चांगली बातमी कळेल. घरामधल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये आपला पुढाकार असला पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचे बेत ठरतील.

मिथुन व्यवसाय उद्योगात कामाचे प्रमाण वाढल्यामुळे तुम्ही एकंदरीत खूश असाल; परंतु जुने कोर्ट मॅटर किंवा वसुली यामुळे तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवून तुम्ही कामाला सुरुवात कराल, पण वरिष्ठ प्रत्येक कामात काही तरी सल्ला देऊन तुमचा गोंधळ उडवतील. तुमचे मन बंड करून उठेल. घरामध्ये ‘गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीची तुम्हाला आठवण येईल. त्यामुळे तुम्ही जास्त स्वार्थी बनाल.

कर्क आठवडय़ाची सुरुवात जरी कंटाळवाणी वाटली तरी नंतर ठरविलेल्या कामात गती येईल. व्यापार-उद्योगात खर्च वाढल्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेत असाल. नोकरीमध्ये सहकारी सुरुवातीला तुम्हाला नकारघंटा ऐकवतील. पण तुम्ही कामाला लागल्यानंतर त्यांना मदत करावीशी वाटेल. एखादी छोटी मोठी सवलत वरिष्ठांकडून मिळवा. आपलुकीच्या व्यक्तींना मदत करण्यासाठी तुमचा वेळ आणि पसे खर्च करावे लागतील. मुलांच्या प्रगतीकरिता एखादा निर्णय घ्यावा लागेल.

सिंह ज्यांना तुमच्याकडून काही तरी पाहिजे आहे त्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. त्याला बळी पडू नका. व्यापार-उद्योगात पशाची आवक चांगली राहील. नोकरदार व्यक्तींना संस्थेच्या खास कामाकरिता नियुक्त केले जाईल. विशेष सुविधा किंवा भत्ते मिळतील. घरामध्ये तुमच्याकडून इतरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यात तुम्ही सफल व्हाल. एखादा जुना सोहळा बाकी राहिला असेल तर तो पार पडेल.

कन्या एक नवीन वैचारिक संक्रमण निर्माण करणारे हे ग्रहमान आहे. व्यापार- उद्योगात एखादी अवघड कार्यपद्धती बदलून त्या जागी सुटसुटीत पद्धत अमलात आणावीशी वाटेल. बाजारातील स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवून तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा जास्त काम करायला तयार व्हाल. घरामध्ये सर्व काही ठीक असेल पण तुम्ही अधिकार गाजवल्यामुळे इतरांना आश्चर्य वाटेल. एखादे मंगलकार्य ठरेल.

तूळ जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती मिळविण्याकरिता तुम्ही अविश्रांत मेहनत घ्याल. व्यापार-उद्योगात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता ओळखी वाढवाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या सूचना वरिष्ठांना आवडतील त्यामुळे तुमच्या संस्थेत तुमचा भाव वधारेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये काटकसर करायची अशी घोषणा तुम्ही कराल आणि पुढल्याच क्षणी एखादा महागडा बेत तुमच्या मनात येईल. प्रवासात खिसा-पाकीट सांभाळा.

वृश्चिक तुम्ही संकटांनी डगमगून जात नाही. उलट मोठय़ा धर्याने त्याला तोंड देता. व्यापार-उद्योगात दाम करी काम याचा अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होणार नाही. शेवटी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम कराल. नवीन कामात लक्ष घालण्याचा वरिष्ठ हट्ट धरतील. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून तुमची चिडचिड होईल. महत्त्वाची जबाबदारी सर्व जण तुमच्यावर सोपवतील आणि निर्धास्त होतील, तुम्हाला मात्र आराम मिळणार नाही.

धनू तुमच्या राशीमध्ये प्रचंड जीवनशक्ती आहे. पण कधी कधी त्याला युक्तीचा जोड द्यावी लागते. व्यापार-उद्योगात प्रतिस्पध्र्याना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटेल. काही जणांना थोडय़ा काळाकरिता परदेशी जावे लागेल. नोकरीमध्ये कामाचा ताण-तणाव भरपूर असेल. प्रसंगी तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. कोणाचाही अवमान करू नका.

मकर प्रत्येक बाबतीमध्ये तुमचे धोरण लवचीक असते. त्याचा आता उपयोग होईल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांवर मात करण्याकरिता एखादा नवीन पवित्रा शोधाल. पशाची आवक थोडीफार सुधारल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा झपाटा उत्तम राहील. नेहमीपेक्षा जास्त काम कराल. पण त्यामुळे दमून जाल. घरामध्ये कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्ही खूप चर्चा कराल. त्याचा इतरांना राग येईल. मुलांच्या प्रश्नावर तोडगा शोधून काढाल. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी वाढतील.

कुंभ तुमची परिस्थिती त्रिशंकूसारखी होणार आहे. मनाच्या एका कोपऱ्यात थोडासा आराम करावासा वाटेल. व्यापार-उद्योगात जे मिळाले आहे त्यावर तुमचे समाधान नसेल. जास्त पसे मिळविण्याकरिता तुम्हाला नशिबाची परीक्षा बघावीशी वाटेल. नोकरीमध्ये इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्या गळ्यात मारतील. तुम्ही ते काम ठरविलेल्या वेळेच्या आधी पूर्ण कराल. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तींच्या लहरी स्वभावाचा तुम्हाला राग येईल.

मीन तुमच्यापाशी काही विशेष आणि वेगळे कौशल्य असेल तर त्याचा आता उपयोग होईल. व्यापार-उद्योगातील कामकाज मंद असेल. मालाची विक्री वाढविण्यासाठी इतर माध्यमांचा व्यापार करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या कामाचा आळस कराल. त्यापेक्षा काही वेगळे असेल तर त्यात रस घ्याल. घरात डागडुजी करावी लागेल. जोडीदाराशी जुळवून घेण्याकरिता तुमचे धोरण थोडेसे लवचीक ठेवा.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com