सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष मंगळ-बुधाचा लाभ योग आपल्या हिमतीला, धैर्याला बुद्धिमत्तेची जोड देणारा योग आहे. विचारपूर्वक पावले उचलाल. शिरा, नसा आणि सांधे आखडतील. विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी-व्यवसायात सांघिक कार्य एकजुटीने पार पाडाल. मेहनतीला यश येईल. सहकारी वर्गाला मदत केल्याची पोचपावती मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांशी संवाद आवश्यक!

वृषभ  रवी-शनीचा लाभ योग हा मेहनतीचे उत्तम फळ देणारा योग आहे. शनीची चिकाटी आणि रवीचा मानसन्मान यांचा मेळ जुळून येईल. सांधेदुखी, वातविकार बळावतील. कामाच्या व्यापात व्यायाम आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी-व्यवसायात  सहकारी वर्ग आणि वरिष्ठांच्या मदतीने मोठी झेप घ्याल. जोडीदाराचा सल्ला हितकारक ठरेल. मुलांच्या बाबतीत तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरेल.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Mangal Pushya Yog 2025
ग्रहांचा सेनापती मंगळ करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश! ‘या’ राशींचे लोक जगतील ऐशो-आरामाचे जीवन; अचानक होईल धनलाभ
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख

मिथुन गुरू-चंद्राचा नवपंचम योग हा नव्या क्षेत्रातील ज्ञान देणारा योग आहे. उत्कंठा,  कुतूहल वाढल्याने नव्या कार्यक्षेत्राकडे आकर्षित व्हाल. पोटऱ्या आणि पावले दुखतील. वातविकार बळावेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे आपल्यातील कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराचे निर्णय अचूक ठरतील.

कर्क चंद्र-हर्षलचा केंद्र योग हा चाकोरीपलीकडे विचार करण्यास प्रवृत्त करणारा योग आहे. त्यातूनच नव्या संकल्पना उदयास येण्याची शक्यता आहे. कला-तंत्रज्ञानाचा योग जुळून येईल. उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण पडेल. आहाराकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी-व्यवसायात सतर्क राहावे. जोडीदाराची मेहनत फलदायी ठरेल. मुलांची कामे लांबणीवर पडतील. त्यांना मार्गदर्शन कराल.

सिंह चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साह आणि ऊर्जावर्धक योग आहे. समाजहितकारक कार्यात सहभागी व्हाल. आतडय़ांना सूज येईल. पोटदुखी वाढेल. वैद्यकीय सल्ला, उपचार घ्यावेत. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या विचारांशी सहमत असाल. सहकारी वर्गावर वचक ठेवाल. जोडीदारासह प्रवासाचे नियोजन कराल. मुलांची समस्या समजून घ्याल. त्यांना वैचारिक आधार द्याल.

कन्या चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा ज्ञानलालसा वाढवणारा योग आहे. आपल्या क्षेत्रातील बारकावे जाणून घ्याल. अभ्यासपूर्वक सादरीकरण कराल. पायात पेटके येतील. नोकरी-व्यवसायात अतिविचारांनी दमणूक होईल. वरिष्ठांचा पािठबा मिळवणे सुरुवातीला अवघड जाईल. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना अनुभवात भर पडेल. कौटुंबिक कार्यात जोडीदाराचा सहभाग असेल.

तूळ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा बौद्धिक चालना देणारा योग आहे. नव्या विचारांना गती मिळेल. खांदेदुखी वाढेल. नोकरी-व्यवसायात अनुकूल बदल होण्यास सुरुवात होईल. मेहनतीने पुढे जाल. सहकारी वर्गासह वाद टाळावेत. जोडीदार आपला हेका चालवेल. शांत राहणे हिताचे ठरेल. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. आर्थिकगणितामध्ये फेरफार करून नव्याने मांडाल.

वृश्चिक चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा स्नेहभाव दृढ करणारा योग आहे. आपलेपणा, खेळकर वृत्तीने आप्तजनांची मने जिंकाल. छातीत, पोटात वायू अडकणे, अस्वस्थ वाटणे असे त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक बातमी मिळेल. वरिष्ठांचा काटेकोरपणा सहन करावा लागेल. जोडीदाराच्या चांगल्या स्वभावामुळे कौटुंबिक समस्यांवर उपाय सापडेल.

धनू चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा चंद्राच्या चंचलतेला बुद्धीची स्थिरता देणारा योग आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या  निभावून न्याल. मान-खांदे दुखणे वा आखडणे असा त्रास जाणवेल. मनातील कल्पना साकार होइपर्यंत चैन पडणार नाही. वरिष्ठांचा पािठबा मिळवण्यासाठी आपली मते ठासून मांडाल. मुलांच्या वागणुकीवर अंकुश ठेवावा लागेल. जोडीदाराची चिडचिड वाढेल.

मकर चंद्र-बुधाचा केंद्र योग हा भावना आणि विचार यांच्यात समतोल राखणारा योग आहे. टोकाचे विचार केलेत तरी भावना नियंत्रित राहतील. पित्तामुळे पोटात जळजळ होईल. आहारात योग्य तो बदल करावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळवाल. जोडीदारासह कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना मानसिक समाधान मिळेल. सामाजिक कार्यासाठी दानधर्म कराल.

कुंभ गुरू-नेपच्यूनचा युती योग हा स्फूर्तिदायक योग असेल. आपल्या आसपासचे वातावरण बदलल्यामुळे उत्साहही वाढेल. अतिश्रमामुळे दमणूक होईल. वेळेवर विश्रांती घेणे हाच रामबाण उपाय!  नोकरी-व्यवसायात नव्या प्रकल्पांतर्गत काम करण्याची संधी उपलब्ध होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराची आर्थिक प्रगती होईल. मीन रवी-चंद्राचा नवपंचम योग हा कष्टाला फळ देणारा योग आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. पित्तप्रकोप वाढेल. दातांच्या समस्या उद्भवतील. नोकरी-व्यवसायात प्रवास योग संभवतो. आपल्या मताला वजन प्राप्त होईल. वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल. सहकारी वर्गासह वाद वाढवू नका. जोडीदार आणि मुलांसह वेळ आनंदात जाईल. कौटुंबिक प्रश्न सुटतील.

Story img Loader