विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष तोंड झाकले तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड उघडे पडते. करिअरकडे लक्ष दिले तर घराकडे दुर्लक्ष होईल. घरामध्ये वेळ घालविला तर नोकरी-व्यवसायावर अन्याय केल्यासारखे वाटेल. याचा सुवर्णमध्य काढण्यात बराच वेळ जाईल. व्यापार-उद्योगात मोजके पण महत्त्वाचे काम करा. नोकरीच्या ठिकाणी घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. घरामध्ये कितीही केले तरी समाधान होणार नाही.
वृषभ व्यक्ती तितक्या प्रकृती असा अनुभव देणारे हे ग्रहमान आहे. सगळ्यांना खूश ठेवून तुम्हाला तुमचे काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात नवीन अशील मिळवताना जुने गिऱ्हाईक तोडण्याची घाई करू नका. एकदम मोठी गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्याने कामाला लागा. नोकरीच्या ठिकाणी सभोवतालचे वर्तुळ बदलेल. घरामध्ये भावंडांविषयी अर्धवट बातमी कळेल. ‘ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे’ असा अनुभव येईल.
मिथुन या आठवडय़ात काटकसरीने वागायचे ठरविले तरी पुढल्याच क्षणी पसे खर्च कराल. व्यापार-उद्योगातील काम आटोक्यात आणण्यासाठी छोटा प्रवास करावा लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर अनपेक्षित मार्गाने पसे मिळाल्याने तुमची चिंता कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या गुणांना तुमचे वरिष्ठ आणि संस्था योग्य ठिकाणी वापर करून घेतील. घरामध्ये एखाद्या अत्यावश्यक कारणाकरिता हात सल सोडावा लागेल.
कर्क एखाद्या गोष्टीवर तुम्ही खूप विचार कराल, पण काही मार्ग सापडणार नाही. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु अचानक एखादी युक्ती सुचल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. व्यापार-उद्योगात हातामध्ये पसे नसल्यामुळे काही काळापुरते कर्ज घेणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास टाळा. घरामध्ये तुमचा सल्ला योग्य असूनही इतरांना तो लगेच पटणार नाही. त्यांना विचार करायला वेळ द्या.
सिंह ग्रहमान असे दाखविते की, तुम्ही या आठवडय़ामध्ये तुमच्याच तंद्रीमध्ये असाल. व्यापार-उद्योगात जरी गिऱ्हाईक कमी असले तरी तुम्हाला पशाची ददात नसेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील. थोडेसे स्वार्थी बनलात तर तुमचाच लाभ होईल. घरामध्ये सर्व जण तुमच्या उदारपणाचा फायदा घेतील. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्यामुळे तुमच्याविषयी सगळ्यांना आदर वाटेल.
कन्या तुमच्या कामापासून तुम्ही थोडेसे जरी लांब राहिलात तरी तुम्ही अस्वस्थ होता. व्यापार-उद्योगात प्रगती चांगली असल्यामुळे बाजारातील तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वरिष्ठांना समजल्यामुळे तुम्ही थोडासा भाव खाल. संस्थेकडून मिळणाऱ्या सवलतींचा गरफायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये मुलांच्या गरजा भागविण्याकरिता बजेटबाहेर जाऊन पसे खर्च करावे लागतील.
तूळ सध्याचे ग्रहमान चांगले असेल. पण हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका. व्यापार-उद्योगात तुमचे काम मनाप्रमाणे होईल. परंतु रोखीपेक्षा उधारीचे व्यवहार जास्त होतील. त्यामुळे हातात पसे शिल्लक राहणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही. ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. पण त्यामुळे तुमचे नेहमीचे काम मागे पडेल. घरामधल्या व्यक्तींचे हट्ट पुरविणे भाग पडेल. त्या नादात बरेच पसे खर्च होतील.
वृश्चिक कोणत्या व्यक्तीचा कधी आणि कसा उपयोग करून घ्यायचा या धोरणाचा तुम्हाला आता चांगला उपयोग होईल. तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत ती शक्यतो आठवडय़ाच्या मध्यापर्यंत उरका. व्यापार उद्योगात जुन्या ओळखींचा तुम्हाला उपयोग होईल. त्यातून आíथक फायदा झाला नाही तरी तुमचे मन शांत होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप प्रचंड असेल. घरामध्ये एखादी जबाबदारी येऊन पडेल.
धनू गेल्या आठवडय़ात जी कामे अर्धवट राहिलेली होती, ती पूर्ण करण्यामध्ये तुमचा बराच वेळ जाईल. व्यापार-उद्योगात काम चांगले होईल, पण हातामध्ये पसे शिल्लक न राहिल्यामुळे आपण नेमके काय केले असा प्रश्न तुमच्यापुढे असेल. एखाद्या गुंतागुंतीच्या समस्येमध्ये आपुलकीच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी स्वार्थी बना. घरामध्ये ज्या व्यक्तीशी मतभेद झाले होते त्या व्यक्तीची भूमिका समजून घेतली तर तो प्रश्न सुटेल.
मकर आठवडय़ाची सुरुवात थोडीशी कंटाळवाणी होईल. पण जसजसे तुम्ही कामाला लागाल तसतसा तुमचा उत्साह वाढेल. व्यापार-उद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही या म्हणीची आठवण ठेवा. आता तुम्ही जी गुंतवणूक करणार आहात त्याचा उपयोग तुम्हाला २-३ महिन्यांनंतर होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. वरिष्ठांशी मतभेद टाळा. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे दिलासा लाभेल.
कुंभ जी संधी पुढे आहे तिचा ताबडतोब फायदा उठवा. जी संधी येणार आहे, तिची वाट बघत बसू नका. व्यापार-उद्योगात काळजी गरज म्हणून तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामामध्ये तुम्हाला मदत करतील, पण त्याच्यामध्ये त्यांचा थोडासा मतलब दडलेला असेल. घरामध्ये एखादा खर्चीक पण न टाळता येणार बेत ठरेल. मुलांना तुमच्या मार्गदर्शनाचा चांगला उपयोग होईल.
मीन एकाच वेळी तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार धावत असतील. त्यातील कशाला महत्त्व द्यावे हे न कळल्यामुळे एक ना धड भाराभार चिंध्या असा प्रकार होईल. व्यापारात सहज आणि सोपे वाटणारे काम लांबत गेल्यामुळे तुमचा वेळ नाहक वाया जाईल. नोकरीच्या ठिकाणी इतरांना न जमलेली कामे तुमच्या गळ्यात पडतील. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून तुमचा वेळ जाईल.