सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष बुध-हर्षलचा नवपंचम योग संशोधनासाठी पोषक ठरेल. बुधाची बुद्धी आणि हर्षलचे आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालाल. करी व्यवसायात प्रगती कराल. वरिष्ठांच्या सूचना सकारात्मकतेने घेऊन त्याचे पालन कराल. सहकारी वर्गाची जोड मिळेल. जोडीदाराची कामे रखडतील. त्याला भावनिक आधार द्यावा लागेल. मुलांची एकाग्रता चांगली होईल. कौटुंबिक फायद्या-तोटय़ाची गणिते सुटतील. शरीरांतर्गत निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचा परिणाम त्वचेवर दिसेल.
वृषभ चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा एकंदरीत शुभ योग असला तरी तो राहू व केतूयुक्त असल्याने कामाच्या सुरुवातीला अडचणी येतील. वरिष्ठांशी वादविवाद होतील. त्याची मते पटणार नाहीत. सहकारी वर्गाची थोडीफार मदत होईल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. मुलांची कामे, शैक्षणिक बाबी मार्गी लागतील. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल. नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्यासह काळ आनंदात जाईल. साथीजन्य विकारांपासून सावधानता बाळगा. सांधे जापावेत.
मिथुन चंद्राचा समसप्तम योग आशेचे किरण घेऊन येईल. हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेईल. प्रयत्नशील राहा. वरिष्ठ आपल्या हिताचा विचार करतील. नव्या जबाबदाऱ्या हिरिरीने पार पाडाल. सहकारी वर्गाच्या मदतीला उभे राहाल. आपली हुशारी आणि बुद्धिमत्ता यांची चुणूक दाखवाल. जोडीदाराची साथ मोलाची आहे. एकमेकांचा आदर कराल. मुलांना मेहनतीचे महत्त्व पटवून द्याल. हवामानाशी मिळतेजुळते घेताना आतडय़ांवर अतिरिक्त ताण पडेल. आराम आणि व्यायाम आवश्यक!
कर्क चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग आपणास कल्पना विश्वात मग्न ठेवेल. नवनिर्मितीचा योग आहे. नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांची बळजबरी पसंत नसली तरी प्रत्यक्षात विरोध करून चालणार नाही. सहकारी वर्गाच्या मदतीने योग्य प्रकारे निषेध नोंदवाल. जोडीदार कुटुंबासाठी विशेष मेहनत घेईल. त्याच्या कामाची कदर कराल. मुलांच्या बाबतीतील निर्णय त्यांच्या हिताचेच असतील. रक्तदाब, रक्ताभिसरण आणि रक्तातील साखर याबाबत जागरूक राहावे.
सिंह चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्कर्ष दर्शक योग आहे. उत्साहाला मेहनतीची साथ मिळाल्याने कामाला गती येईल. नोकरी व्यवसायात आपली पत वाढेल. जबाबदारीचे भान ठेवून महत्त्वाचे निर्णय संस्थेच्या हिताचे ठरतील. बदलासाठी प्रयत्न सुरू ठेवा. जोडीदार नवी शिखरे सर करेल. मुलांना अभ्यासात मदत कराल. त्यांनाही दिलासा मिळेल. मणक्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. पचन संस्था संभाळल्याने उत्सर्जनाचे त्रास कमी होतील. व्यायाम आवश्यक!
कन्या चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा बुद्धीला चालना देणारा योग आहे. नोकरी व्यवसायात कामकाजातील बारकावे लक्षात घेऊन त्यावर काटेकोर कारवाई कराल. स्मरणशक्तीचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. चौकस वृत्तीला पोषक असे वातावरण मिळेल. सहकारी वर्ग आणि वरिष्ठ यांच्यात मेळ घालून द्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अग्रेसर राहील. मुलांना त्यांच्या कलेने समजून घेतल्यास त्यांची प्रगती होईल. वातविकार व अपचन यामुळे अस्वस्थता वाढेल.
तूळ चंद्र-गुरूचा नवपंचम योग लाभदायक ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात कारकीर्द गाजवाल. नोकरी व्यवसायात परदेशासंबंधित कामे कराल. वरिष्ठांची मर्जी राखाल. त्यांच्या सूचना तंतोतंत पाळाल. जोडीदाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. शब्दाने शब्द न वाढवता डोकं शांत ठेवा. मुलांच्या प्रगतीला वाव मिळेल. कौटुंबिक समस्या चर्चेने सोडवण्यासाठी सर्वाची मते जाणून घ्यावीत. रक्तातील घटकांचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आहारात बदल कराल.
वृश्चिक चंद्र-शनीचा समसप्तम योग हा मेहनतीचे महत्त्व दाखवणारा योग आहे. चंद्राच्या चंचलतेला शनीच्या शिस्तप्रिय आणि संयमी वृत्तीचा लगाम बसेल. गरज नसताना मित्रमंडळाच्या आग्रहाला बळी पडू नका. नोकरी व्यवसायात कामे शिताफीने पार पाडाल. वरिष्ठांना मान देऊन त्यांच्या म्हणण्यानुसार कागदपत्रे सादर कराल. सहकारी वर्गाकडून फारशी अपेक्षा ठेवू नका. मुलांच्या कामातून समाधान मिळेल. दातांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. औषधे गरजेची आहेत.
धनू रवी-गुरूचा लाभ योग हा मार्गदर्शक योग आहे. गुरुजनांकडून मौलिक सल्ला मिळेल. नव्या ओळखीतून व्यवसाय वृद्धी होईल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाच्या साहाय्याने नव्या योजना कार्यान्वित कराल. आपल्या कामाचा समाजास लाभ होईल. जोडीदारासह सल्लामसलत करून कुटुंबाच्या हिताचे निर्णय घ्याल. नातीगोती सांभाळाल. मुलांच्या शिक्षणात त्यांना योग्य मार्गदर्शन कराल. ओटीपोटाचे आरोग्य बिघडेल. बाह्यपरिस्थितीचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होईल.
मकर चंद्र-शनीचा नवपंचम योग कर्माचा कारक योग आहे. कामाच्या उत्साहासह जिद्द व चिकाटी दिसून येईल. पुढचे पाऊल हिमतीने टाकाल. नोकरी व्यवसायात आपले स्वतंत्र मत मांडाल. सहकारी वर्ग आपल्या तालमीत तयार होईल. वेळेची कदर कराल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराची उत्तरोत्तर प्रगती समाधान देईल. मुलांच्या बाबतीतील निर्णय घेण्यात घाई नको. वास्तविक कोणताही निर्णय घेताना साकल्याने विचार करावा. डोळय़ांच्या तक्रारी उदभवतील.
कुंभ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा निर्मितीक्षम योग आहे. नवसंकल्पना अमलात आणाल. स्वप्नांच्या पूर्ततेचा आनंद होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नोकरी व्यवसायात हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. रखडलेली कामे मार्गी लावाल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्याने आत्मविश्वास बळावेल. मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. पित्त प्रकोप होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सल्ला व औषध घ्यावे.
मीन चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे कामातील उत्साह वाढेल. काही प्रमाणात चिकित्सक वृत्तीही बळावेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. संबंध जपाल. नोकरी व्यवसायात आपल्या कलात्मकतेला वाव मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील. पण बेसावध राहू नका. जोडीदाराची कामे पूर्ण होतील. कुटुंबाचा पािठबा मिळवाल. मुलांच्या कामात अडथळे आल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन कराल. त्वचा विकारांवर औषधोपचार करून वेळीस आळा घालावा.