विजय केळकर

मेष इतरांवर जास्त अवलंबून राहिलेले तुम्हाला आवडत नाही. या आठवडय़ात जे काम करायचे आहे त्याचे उत्तम नियोजन करून ठेवा. व्यापारउद्योगात कामाचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल. भांडवलाकरिता कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा आíथक संस्थांवर भर ठेवा. नोकरीच्या ठिकाणी घडयाळ्याच्या काटय़ानुसार काम करावे लागेल.  घरामध्ये बरीच कामे एकावेळी करावी लागतील.

वृषभ कोणतेही विशिष्ट कारण नसताना तुम्ही आता आशावादी बनाल. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलबूंन आहात त्या कदाचित तुम्हाला मदत करू शकणार नाहीत, पण अनोळखी व्यक्ती साथ देतील. व्यापारउद्योगात रंगाळलेले काम मार्गी लावण्यासाठी धक्का स्टार्ट या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी फाजील आत्मविश्वास ठेवलात तर त्यात चूक होईल. घरामध्ये सर्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.

मिथुन आपली कामे इतरांनी केली की त्यांना बरे वाटते. पण तीच व्यक्ती हजर नसेल तर मात्र गरसोय होते असा अनुभव या आठवडय़ात येईल. व्यापारउद्योगात हातात प्रत्यक्ष पसे मिळेपर्यंत पुढचे व्यवहार करू नका. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामातून सुटका करण्यासाठी तुम्ही शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये अनपेक्षित पाहुण्यांची हजेरी लागल्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांच्याबरोबर आनंदही मिळेल.

कर्क गरजू व्यक्तीला मदत करायला तुम्ही नेहमीच तयार असता. परंतु जेव्हा आपली वेळ येते तेव्हा त्यांनी आपल्याला मदत करावी अशी तुमची अपेक्षा असते. या आठवडय़ात एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला मदत करेल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभाने होईल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या खास सवलतीकरिता तुमची निवड हाईल. घरामध्ये नातेवाईक अणि आप्तेष्ट यांच्याशी तोलूनमापून वागा.

सिंह ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची स्थिती होणार आहे. प्रत्येक गोष्टीकरीता घाईगडबड कराल. व्यापारउद्योगात गरज जास्त असल्यामुळे तुम्हाला कर्ज काढावेसे वाटेल. जे पसे मिळतील त्याचा फक्त व्यावसायिक कारणांकरिताच वापर करा. नोकरीच्या ठिकाणी जास्त घोषणा न करता आधी केले मग सांगितले असे तुमचे धोरण ठेवा. घरामध्ये तुम्ही तुमचा मुद्दा इतरांना पटवून देण्यात सफल व्हाल.

कन्या सगळे आहे पण काहीतरी नाही अशी भावना तुमच्या मनामध्ये असेल. त्यामुळे तुम्ही मधूनच अस्वस्थ व्हाल. व्यापारउद्योगात प्रत्यक्ष पशाची आवक खूप नसली तरी तुमच्या गरजा भागून सहज पसे शिल्लक पडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील.  व्यक्तिगत जीवनात पोकळी जाणवेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य पूर्ण करण्याच्या भावनेने काम कराल.

तूळ ज्या व्यक्तींकडून तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवाल त्या आयत्या वेळेला दिलेला शब्द फिरवतील. तरीही तुम्ही न थांबता तुमचे ठरलेले काम पूर्ण कराल. व्यापार उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला काही देणी द्यावी लागतील. त्याची कसर भरून काढण्याकरिता तुम्ही भरपूर काम कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांना तुमची अडचण समजून सांगितली तर त्यावर मार्ग निघेल.  घरामध्ये इतरांना जे पाहिजे आहे ते देण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक प्रत्येक माणूस स्वार्थी असतो त्याला तुम्हीही अपवाद नाही. या आठवडय़ामध्ये ज्यांच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचे आहे त्यांच्याशी तुम्ही गोडीगुलाबीने बोलाल. व्यापार-उद्योगात आíथकदृष्टय़ा एखादा महत्त्वाचा सौदा होईल. कारखानदार परदेश दौरा करतील. नोकरदार व्यक्तींना विशिष्ट कामाकरिता जादा अधिकार दिले जातील. घरामध्ये तुम्ही इतरांना तुमच्या तालावर नाचवाल.

धनू ग्रहमान उलटसुलट आहे. जे काम तुम्हाला अगदी सोपे वाटत होते त्यामध्ये गुंतागुंत होईल. याउलट अवघड कामामध्ये सफलता मिळेल. व्यापारउद्योगात आठवडा खíचक आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण केलेले काम बरोबर आहे याची खात्री केल्याशिवाय वरिष्ठांसमोर सादर करू नका. एखाद्या अवघड कामात अनपेक्षित व्यक्तीची तुम्हाला साथ मिळून जाईल. घरामध्ये जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.

मकर मनामधील मोठय़ा कल्पना पार पाडण्याकरिता इतरांची मदत घ्यायला लागल्यामुळे थोडीशी गरसोय होईल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात चांगली होईल. जी किचकट कामे लांबवलेली होती ती पूर्ण करावीशी वाटतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसमोर बढाया मारू नका. नाही तर वरिष्ठ त्यांच्या फायद्याकरिता तुमचा उपयोग करून घेतील. घरामध्ये पाहुण्यांच्या येण्याची खबरबात कळेल.

कुंभ प्रत्येक व्यक्ती आशावादी असते. भविष्यामध्ये काहीतरी चांगले घडेल असे त्याला वाटते. व्यापारउद्योगात एखाद्या मोठय़ा व्यक्तीची मदत मिळाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. पशाची सोय आठवडय़ाच्या मध्यात होईल. जोडधंदा असणाऱ्यांना एखादे काम अनपेक्षितरीत्या मिळेल. नोकरीच्या ठिकाणी खूप काम करण्यापेक्षा जे काम महत्त्वाचे आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचा विरह जाणवेल.

मीन नव्या आणि जुन्या पद्धतीचा योग्य वापर करून तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. त्याकरिता इतरांशी गोडीगुलाबीने वागणे भाग पडेल. व्यापारउद्योगात एखादे काम पूर्ण करण्याकरिता छोटा प्रवास करावा लागेल.  नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामात त्यांनी नवीन प्रयोग करू नये. घरामध्ये तुम्हाला इतरांच्या तंत्रानुसार वागावे लागेल.

Story img Loader