मेष नुकत्याच आलेल्या अनुभवावरून सभोवतालच्या व्यक्तींशी कसे वागायचे याचे धोरण तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री आणि उलाढाल वाढविण्याकरिता एखादी नवीन युक्ती सुचवाल. त्याचा फायदा थोडय़ा दिवसांनंतर मिळेल. नव्या नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना बऱ्याच तणावानंतर काम मिळेल. चालू नोकरीत वरिष्ठ तुमची जबाबदारी वाढवण्याची शक्यता आहे. घरामध्ये लांबलेला निर्णय निश्चित होतील.
वृषभ एखादा अवघड प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो त्या वेळी कुठून तरी ताकद निर्माण होते आणि आपण त्या प्रश्नातून तरून जातो. या आठवडय़ामध्ये प्रसंगावधानाने वागण्याची वृत्ती उपयोगी पडेल. व्यापारउद्योगात नवीन काम जरूर स्वीकारा, पण जुने ते सोने हे लक्षात ठेवा. नोकरीमध्ये नवीन पद्धतीचे काम तुम्हाला इच्छेविरुद्ध स्वीकारावे लागेल. घरामध्ये समजुतीचे धोरण स्वीकारलेत तर एखादा प्रश्न हलका होईल.
मिथुन व्यावसायिक किंवा व्यक्तिगत जीवनातील जी कामे गेली दोन-तीन आठवडे लांबली होती त्या कामांना आता वेग मिळेल. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या कामाचे पसे मिळाल्याने तुमचा खिसा गरम राहील. नवीन गुंतवणूक मात्र विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये कामाच्या निमित्ताने नवीन मित्र जोडाल. एखाद्या अवघड कामगिरीकरता तुमची विश्वासाने निवड करतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामधल्या वादविवादावर पडदा पडेल.
कर्क प्रगती करायची म्हटली की काही बदल अनिवार्य असतात त्यातून पुढे नेमके काय होईल याचा अंदाज येत नाही. व्यापारउद्योगात जी कामे तुम्ही लांबवलेली होती ती आता निर्धाराने हाती घ्याल. सरकारी कामे आणि कोर्टव्यवहारात थोडीशी तडजोड केली तर तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी बदली हवी असेल तर प्रयत्न सुरू करा. घरामध्ये तुमच्या लाघवी स्वभावामुळे एखादा वाद आटोक्यात येईल.
सिंह प्रगती म्हटली की बदल हे अपरिहार्य असतात. असे हे ग्रहमान संपूर्ण आठवडा खूप दगदगीचा आणि धावपळीचा जाईल. प्रत्येक कामात स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, असा अनुभव येईल. पण त्यातूनच तुम्हाला काही तरी शिकता येईल. व्यापार उद्योगात अपेक्षित पसे मिळण्या-करिता खूपच श्रम घ्यावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे इतरांवर सोपवू नका. घरामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात गर्क असतील.
कन्या ‘दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला’ या म्हणीची आठवण ठेवा. ज्या माणसांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांनी आयत्या वेळेला नकारघंटा ऐकवल्यामुळे तुमची चांगलीच धावपळ होईल. अशा वेळी कामाचे नियोजन उपयोगी पडेल. व्यापारउद्योगात आíथक व्यवहार स्वत: हाताळा. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या व्यक्तींवर सोपवलेले कामात चूक आढळण्याची शक्यता आहे. प्रकृती सांभाळा.
तूळ एकाच पद्धतीने काम करण्याचा कंटाळा आल्यामुळे या आठवडय़ात तुम्हाला काही तरी वेगळे करावेसे वाटेल. प्रकृतीच्या तक्रारी असतील तर त्या कमी झाल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. व्यापारउद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जे बेत आखून ठेवलेले होते ते बेत आता प्रत्यक्षात उतरतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये थोडाफार फेरफार होण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखादा छानसा कार्यक्रम ठरेल.
वृश्चिक जशी कामाची गरज असते त्याप्रमाणे तुम्ही तुमचे धोरण लवचीक ठेवता. या आठवडय़ात तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत ती शक्यतो आठवडय़ाच्या सुरुवातीलाच उरका. व्यापारउद्योगात तुमच्या मालाकडे गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मतलबाकरिता सहकाऱ्यांची खुशामत कराल.
धनू गेल्या १-२ आठवडय़ांमध्ये जी परिस्थिती अचानक निर्माण झाली ती नियंत्रणात आणणे हेच उद्दिष्ट असेल. त्यासाठी तुमचा राग आवरा आणि नियोजनबद्ध काम करा. व्यापारउद्योगात नवीन वर्षांकरिता जे बेत ठरविले होते त्यामध्ये थोडेफार बदल करणे भाग पडेल. या कामात हितचिंतकांची तुम्हाला मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांशी जुळवून घेण्यातच तुमचे भले आहे. सप्ताहाच्या शेवटी चांगली बातमी मिळेल.
मकर गेल्या एक-दोन आठवडय़ांत जे प्रश्न अनपेक्षितरीत्या निर्माण झाले होते, त्यावर तोडगा शोधून काढायचा हे तुमच्यापुढील मुख्य उद्दिष्ट असेल. व्यापारउद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी होण्याची चिन्हे दिसू लागतील. आठवडय़ाच्या मध्यामध्ये अपेक्षित पसे हाती पडल्यानंतर तुमचे मन शांत हाईल. नोकरीच्या ठिकाणी अनवधानाने काही चूक झाली असेल तर ते काम तुम्ही पुन्हा करून वरिष्ठांना दाखवाल.
कुंभ आठवडय़ाच्या सुरुवातीला एखादे काम होत नाही या विचाराने तुम्ही बेचैन व्हाल, आणि ते पूर्ण करण्याकरिता जिवाचे रान कराल. व्यापारउद्योगात पशाच्या व्यवहारात काही गोंधळ झाला असेल तर त्याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये एखादे लांबलेले काम मार्गी लागेल. त्यासाठी तुम्ही निश्चित बनाल. पण वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवतील. घरामधल्या काही धोरणामध्ये तुम्हाला फेरफार करावेसे वाटतील.
मीन जी कामे विशिष्ट व्यक्तीच्या संपर्काअभावी थांबून राहिली होती, त्यांना मुहूर्त लाभेल. त्यामुळे तुमच्या हालचालीला गती येईल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात लाभदायक होईल. एखादे जुने काम तुमच्या हातातून गेले असेल तर ते परत यायची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण कमी झाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. घरामध्ये चतन्यमय वातावरण निर्माण कराल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com