मेष तुमची रास प्रचंड आशावादी आहे. गेल्या एक दीड वर्षांत तुम्हाला बरेच अडथळे सहन करावे लागले. पण आता काहीतरी चांगले घडेल असे तुम्हाला तीव्रतेने वाटायला सुरुवात होईल. व्यापारउद्योगात एखादे काम विनाकारण लांबले असेल तर त्यामध्ये आता सोयीस्कर मार्ग सुचेल. नोकरीच्या ठिकाणी थोडीशी धास्ती असेल. पण वरिष्ठांच्या आश्वासनामुळे तुमचे मन शांत होईल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ गेल्या काही दिवसांत मन:स्वास्थ्य आणि प्रकृती या दोन्ही बाबतीत काहीतरी आशावादी घडण्याचे संकेत मिळतील. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रातील तांत्रिक अडथळे दूर होतील. नवीन करार करण्यापूर्वी त्याचा भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार करा. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग उत्तम असल्यामुळे वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. घरामध्ये महत्त्वाची जबाबदारी सर्वजण तुमच्यावर सोपवतील आणि निर्धास्त होतील, तुम्हाला मात्र आराम मिळणार नाही.

मिथुन ज्यांच्यावर तुम्ही विसंबून राहता त्यांना खूश ठेवण्यासाठी त्यांची बडदास्त ठेवावी लागेल. त्यामध्ये कमीपणा मानू नका. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात काही नवीन संधी उपलब्ध होतील. पशाच्या बाजूकडे बारकाईने लक्ष ठेवा. नोकरीमध्ये नवीन संधीकरिता तुमची निवड होईल. पण हातामध्ये पडणारे काम हे तितकेसे सोपे नसेल हे लक्षात ठेवा. वरिष्ठ एखादी छोटी सवलत द्यायला तयार होतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तीची हजेरी लागेल.

कर्क प्रत्येक व्यक्ती आशावादी असते. जरी ग्रहमान कठीण असले तरी पुढे काहीतरी चांगले घडेल असे त्याला वाटत असते. व्यवसाय उद्योगात जे पसे तुम्हाला मिळतील त्यातून तुमची गरज भागेल. अनोळखी व्यक्तींवर जास्त विश्वास टाकू नका. जोडधंदा असणाऱ्यांनी गिऱ्हाईकांच्या गरजांना प्राधान्य द्यावे. नोकरीमध्ये  वरिष्ठांच्या परवानगीशिवाय परस्पर निर्णय घेऊ नका. घरामधे ‘कमी तिथे आम्ही’ असा तुम्हाला प्रत्यय येईल.

सिंह तुमच्या नेहमीच्या स्वभावानुसार एखादी गोष्ट तुमच्या मनात आली की ती पार पडेपर्यंत तुम्हाला चन पडत नाही. या आठवडय़ात ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये खदखदत होत्या त्या पूर्ण करण्याकरिता आता धाडसी पाऊल उचलाल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन संधी तुमचे लक्ष आकर्षति करेल. त्याचा फायदा उठविण्यासाठी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखादी गोष्ट तुम्ही इतरांना सुरुवातीला शांतपणे समजावून सांगाल.

कन्या जी कामे विनाकारण लांबत आली होती. ती मार्गी लावण्याचा आता तुम्ही निश्चय कराल. तुमचे करियर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर एकाच वेळी सक्रिय राहावे लागेल. व्यापारउद्योगात  कोणतेही महत्त्वाचे निर्णय अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. नोकरीमधे वरिष्ठांची खुशामत केलीत तर तुमचेच काम वाढेल. गुप्तशत्रूंवर नजर ठेवा. घरामध्ये सर्वजण तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अविश्रांत मेहनत करावी लागेल.

तूळ ज्या घटना जेव्हा घडायच्या असतात तेव्हाच त्या घडत असतात. या आठवडय़ात एखाद्या चांगल्या कामाची नांदी होईल. व्यापार-उद्योगात योग्य व्यक्तींच्या भेटीअभावी थांबून राहिलेली कामे आता गती घेतील. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याने कामाला गती आल्यासारखे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची मागणी पूर्ण करण्याचे वरिष्ठ आश्वासन देतील. घरामध्ये जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल.

वृश्चिक मंगळसारखा प्रभावी ग्रह तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे तुमच्यामधे धडाडी आहे. प्रयत्नांती परमेश्वर हे तुमचे ब्रीदवाक्य ठेवा म्हणजे सर्व काही ठीक होईल. ज्या व्यक्तींनी नकारघंटा ऐकवली होती त्यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळेल. अडचणीच्या वेळी पशाची तजवीज झाल्यामुळे तुमचा जीव भांडयात पडेल.  घरामधे मोठया व्यक्तींच्या सल्ल्याच्या तुम्हाला उपयोग होईल. लांबचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी गाठीभेटीचा योग होईल.

धनू एखाद्या कागदपत्राअभावी काही कामे लांबली असतील तर त्याला वेग मिळेल. जनसंपर्क आणि जाहिरातबाजी यांचा मालाची विक्री वाढवायला उपयोग होईल. नोकरीमध्ये तुमच्या कामाला महत्त्व मिळाल्यामुळे तुमची बडदास्त ठेवली जाईल. एखाद्या तातडीच्या कामानिमित्त छोटा प्रवास करावा लागेल. तब्येतीचे काही प्रश्न असतील तर त्यावर मार्ग निघेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी एखादा छोटा कार्यक्रम ठरवला जाईल.

मकर सहसा तुम्ही एखादे काम झाल्याशिवाय त्याविषयी वाच्यता करत नाही. पण या आठवडय़ामध्ये तुम्हाला मोठेपणा दाखवण्याची खुमखुमी निर्माण होईल. व्यापार उद्योगात बाजारपेठेतील आपली प्रतिमा उंचावण्याकरिता काहीतरी विशेष आणि वेगळे करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण होण्याची लक्षणे दिसू लागतील. तुमच्या वागण्याबोलण्यामध्ये रुबाब येईल. घरामध्ये तुम्हाला मानसन्मान मिळेल.

कुंभ ज्या कामाला गती येत नव्हती, त्यामध्ये तुम्ही लक्ष घालायचे ठरवाल. हे ध्येय साध्य करण्याकरिता कदाचित तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये स्वत:च्या हौसेवर मुरड घालावी लागेल. व्यापार उद्योगात प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळखी झाल्याने तुमचे मनाधर्य वाढेल. नोकरीच्या ठिकाणी एखादे नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल. त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रशिक्षण दिले जाईल. घरामध्ये टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या थोडासा तणाव निर्माण करतील.

मीन प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी कधी कधी धोका पत्करणे हाच रामबाण उपाय असतो, याची आठवण ठेवून तुम्ही वागाल. व्यापारउद्योगात नवीन वर्षांकरिता मनाशी आखलेले बेत मार्गी लावाल. त्यात पशाचे अंदाज मागेपुढे होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तांत्रिक कारणामुळे अडून राहिलेली कामे मार्गी लागतील. तुमचे कष्ट वाढतील. घरामध्ये पूर्वी तुम्ही इतरांना दिलेला सल्ला पटेल. तुम्ही स्वतची पाठ थोपटून घ्याल. एखादी पूर्वीची इच्छा साकार होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com