विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. करियर आणि घर यापकी कशाला महत्त्व द्यायचे, हा तुमच्यापुढे प्रश्न असेल. व्यापारउद्योगात नवीन कामासंबंधी बोलणी होण्याची शक्यता आहे. त्याचे करारात रूपांतर करणे योग्य आहे. निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीत एकाच वेळी अनेक कामे करायची असल्याने वरिष्ठांच्या सूचना नीट लक्षात ठेवा. घरामध्ये मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्याल.
वृषभ सबसे बडा रुपय्या हे मानणारी तुमची रास आहे; पण या आठवडय़ात तुम्हाला तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर सतर्क राहावे लागेल. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या कामामुळे वसुली होऊ शकेल. जोडधंद्यातून फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी जास्त घोषणा न करता तुमचे काम वेळेत उरका. वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामधल्या एखाद्या सदस्याविषयी तुम्ही थोडेसे भावुक बनाल. थोडा वेळ आणि पसे राखून ठेवा.
मिथुन या आठवडय़ामध्ये तुमचे विचार आणि कृती यामध्ये समन्वय राखलात तर तुम्हाला नक्की यश मिळेल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभ झाल्यामुळे तुमच्या अत्यावश्यक गरजा भागतील. सरकारी आणि कोर्टकामे गती घेतील. नोकरीमध्ये केवळ महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आळस न करता कामे वेळेत संपवा. घरातील प्रिय व्यक्तीचे हट्ट पुरवावे लागतील. पसे खर्च करताना भान राहणार नाही.
कर्क तुमच्याकडे अनेक नवीन कल्पना असतील, पण त्या अमलात आणण्यापूर्वी कितपत व्यवहारी आहेत याचा विचार करा. व्यापारउद्योगात जुनी देणी द्यावी लागल्यामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही. नोकरीच्या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त काम करावे लागल्यामुळे तुमची बरीच धावपळ उडेल. त्यातूनही एक क्षण फुरसतीचा मिळाला तर तुम्ही थट्टामस्करी कराल. घरामध्ये मुलांच्या गरजांकरिता पसे राखून ठेवावे .
सिंह या आठवडय़ात तुम्ही जे काम कराल त्यातून तुम्हाला लाभ होईल. मात्र त्यासाठी प्रचंड दगदग करावी लागेल. व्यापारउद्योगात जी कामे मागील आठवडय़ात लांबलेली होती ती कामे गती घेतील. चालू कामामध्ये काही नवीन प्रयोग करून बघावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी असेल. बेकार व्यक्तींनी अतिचिकित्सा करू नये. घरामध्ये कर्तव्य आणि मौजमजा या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्त्व असते.
कन्या ग्रहमान चांगले असल्यामुळे तुमच्या मनात अनेक उलटसुलट तरंग उठतील. कधी तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा, तर कधी पूर्वीच्या पद्धतींचा वापर करून स्वत:चा फायदा उठवाल. व्यापारउद्योगात पूर्वी केलेल्या चांगल्या कामामुळे नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या चांगल्या कामगिरीकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल.
तूळ तुमच्या राशीमध्ये बरीच कल्पकता आहे. त्याचा वापर करता आल्याने तुम्ही खूश असाल. व्यापारीवर्गाला काम थोडेसे कमी असल्याने पशाची चिंता वाटेल, पण त्याची कसर इतर मार्गाने भरून निघेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतील. त्या सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्न कराल. एखादे काम राहिल्याने मनाला चुटपुट लागेल. घरामधल्या सदस्यांना तुमचे कशाने समाधान होणार आहे ते समजणार नाही.
वृश्चिक हा आठवडा म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेची कसोटी आहे. एकामागून एक प्रश्न येत गेल्यामुळे तुम्हाला तुमचे ठरलेले बेत बदलणे भाग पडेल. यातून बाहेर पडण्याकरिता तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापारउद्योगात शक्य असेल तर स्वयंभू बनून काम पूर्ण करून टाका. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्याच काम अनवधानाने चुका होतील. त्या निस्तरताना तुमचा बराच वेळ खर्च होईल. घरामधल्या सदस्याची काळजी वाटेल.
धनू संपूर्ण आठवडा दगदगीचा आणि धावपळीचा जाणार आहे. ज्या कामाची तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती अशी कामे आयत्या वेळी उपटल्यामुळे तुमचे ठरलेले कार्यक्रम बदलावे लागतील. व्यापारउद्योगात ज्यांना तुम्ही पसे द्यायचे कबूल केले होते त्यांच्याकडून पशाची मागणी होईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुमच्या हातून अपूर्ण राहील त्याच्यावर वरिष्ठ बोट ठेवतील. घरामध्ये डागडुजी, मुलांचे खर्च यासाठी पसे राखून ठेवा.
मकर मन आणि प्रकृती या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. जेव्हा तुमची प्रकृती चांगली असते तेव्हा तुम्ही मानसिकदृष्टय़ा चांगले राहता. म्हणून आता प्रकृतीकडे आधी लक्ष द्या. व्यापारउद्योगात स्पर्धकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवा. तुमचे भविष्यातील बेत गुप्तपणे अमलात आणाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमचा कामाचा भार वाढवतील. घरामध्ये नातेवाईक आणि इतरांशी वागताना एक हात अंतर ठेवा.
कुंभ या आठवडय़ामध्ये तुमचा कामाचा वेग वाढणार आहे. योग्य व्यक्तीकडून तुम्हाला साथ मिळाल्याने तुमचे नतिक धर्य उत्तम राहील. व्यापारउद्योगातील महत्त्वाची कामे शक्यतो सुरुवातीलाच हातात घ्या. एखादे तातडीचे काम करण्याकरिता प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना या आठवडय़ामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतील. घरामध्ये लांबत आलेल्या शुभकार्याला मुहूर्त लाभेल.
मीन कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाला पटत नाहीत; पण कुटुंबातल्या व्यक्तींचे मन सांभाळण्याकरिता त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. या आठवडय़ात तुमची परिस्थिती अशीच असेल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभाने होईल; पण नंतर मात्र थोडेसे मंदावण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक काम तुम्ही ढकलगाडीप्रमाणे कराल.