मेष राशीमधले रवी आणि बुध तुमचे नैतिक धर्य वाढविणारे आहेत. एखाद्या कामात तुम्हाला जर विचित्र अनुभव आला असेल तर स्वत:ला सावरून तुम्ही काही तरी मार्ग शोधून काढाल. व्यापार-उद्योगात विक्री आणि उलाढाल वाढविण्याकरिता जाहिरातबाजीचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव विसरण्यासाठी सहकाऱ्यांबरोबर काही क्षण गप्पागोष्टी करून वातावरण हलकेफुलके बनवाल.
वृषभ पसा ही एक अशी चीज आहे, जी भल्याभल्यांना मोहात टाकते. व्यापार-उद्योगात नवीन भागीदारी किंवा मत्रीचे प्रस्ताव पुढे येतील. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना छोटे-मोठे काम मिळाल्याने बरे वाटेल. नोकरीमध्ये सहकारी तुमची खुशामत करून त्यांचा कामाचा भार हलका करतील. नंतर तुम्हाला असे वाटेल की आपण आपले काम सोडून उगीचच मदत केली. एखादा महागडय़ा खरेदीचा बेत ठरेल. नवीन व्यक्तींच्या सहवासाचे आकर्षण वाटेल.
मिथुन जीवनातील विविध छटांचा अनुभव घेणारी तुमची रास आहे. त्यामुळे वातावरणात जेव्हा काही तरी वेगळे असते त्या वेळी तुम्ही आनंदी असता. तशी संधी आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले चांगले काम आणि उत्तम कल्पनाशक्ती यामुळे नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. खेळत्या भांडवलासाठी आíथक संस्था किंवा हितचिंतकांकडून तुम्हाला मदत लाभेल. नोकरीमध्ये तुम्ही केलेले पसंत पडल्याने वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल.
कर्क कर्तव्याला तुम्ही नेहमी महत्त्व देता. जीवनाचा आस्वाद घ्यायचे तुम्ही ठरवाल. एखादे कारण काढून आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळवाल. व्यवसाय-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. प्राप्तीमध्ये चांगली वाढ होण्याचे संकेत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून एखादी खास सवलत मिळाल्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवाल. घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने आवडत्या वस्तूंची खरेदी कराल.
सिंह गेल्या दोन-तीन महिन्यांत तुमची ग्रहस्थिती फारशी अनुकूल नव्हती. आता ग्रहमान सुधारत असल्यामुळे तुम्हाला विचारांचे आणि कृतीचे थोडेफार स्वातंत्र्य मिळेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांचे लक्ष आकर्षति करण्याकरिता एखादी बक्षीस योजना जाहीर कराल. त्याला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. खेळते भांडवल वाढवाल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेकडून खास सवलतीकरिता तुमची निवड झाल्यामुळे तुमचा भाव वधारेल.
कन्या रवी, बुध आणि शुक्र हे तीन ग्रह अष्टमस्थानात येत असल्यामुळे तुमच्या कामाचा वेग हळूहळू मंदावण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे हाताळताना स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, याची आठवण येईल. व्यापार-उद्योगात सकृद्दर्शनी काम चांगले होईल. जोडधंद्याचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. त्याकरिता आवश्यक असणाऱ्या सवलती लगेच देणार नाहीत. त्यामुळे तुमची चिडचिड होईल.
तूळ अत्यंत निराशा आणि बेचव वातावरणातून बाहेर पडायला हे ग्रहमान चांगले आहे. त्याचा अवश्य फायदा घ्या. व्यापार-उद्योगात ज्या कामाला गती येत नव्हती त्यांना गती देण्यासाठी एखादी वेगळी युक्ती अवलंबवावी लागेल. जाहिरात आणि प्रसिद्धीचा उपयोग केला तर उलाढाल आणि फायदा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कामात केलेली टंगळमंगळ वरिष्ठांना सहन होणार नाही. घरामध्ये मौजमजेचा एखादा कार्यक्रम ठरेल.
वृश्चिक राशीतल्या शनी मंगळाची भर पडणार आहे. हे ग्रहमान असे दर्शविते की पुढील वाट खडतर आहे; पण असे म्हणतात की परमेश्वर जेव्हा अनेक दारे बंद करतो तेव्हा एखादे दार उघडे ठेवतो. व्यापार-उद्योगात एखादा आडवळणाचा मार्ग शोधावासा वाटेल. त्यातील संभाव्य धोक्याचा आधीच अंदाज घ्या. नोकरीच्या ठिकाणी आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवणे चांगले. घरामध्ये इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय आपले मत व्यक्त करू नका.
धनू कोणतेही काम ठरविल्याप्रमाणे होणार नाही असे गृहीत धरून सर्व नियोजन करा. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात स्पर्धकांकडे लक्ष ठेवा. बाजारातील चढउतारांचा अंदाज आल्याशिवाय कोणतेही बेत निश्चित करू नका. आíथक आघाडय़ांवर सतर्क राहा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला स्वस्थ आणि शांत बसू देणार नाही. घरामध्ये सर्व जणांचे अनेक बेत ठरले असतील, पण तुम्ही मात्र काही कारणाने तुमच्याच मूडमध्ये हरवून गेलेले असाल. प्रकृतीकडे लक्ष द्या.
मकर आता रवी, बुध आणि शुक्र हे तीन महत्त्वाचे ग्रह चतुर्थस्थानात आल्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय बनावे लागेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना एखाद्या गोष्टीची घाई असल्यामुळे तुम्हाला नाइलाजाने त्याच कामांना प्राधान्य द्यावे लागेल. घरामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या मागण्या तुमच्यापुढे ठेवतील.
कुंभ जरी तुमची रास शनिप्रधान असली तरी तुमच्या राशीमध्ये उत्तम दर्जाची रसिकता आणि सौंदर्यदृष्टी आहे. त्यामुळे प्रत्येक काम तुम्ही नीटनेटके करता. व्यापार-उद्योगात एखाद्या कामात कदाचित पसे कमी मिळतील, पण त्यातून मिळणारा आंतरिक आनंद व समाधान तुम्हाला महत्त्वाचे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उलटसुलट चर्चा होईल. त्यातून थोडेफार वादविवाद होतील.
मीन एखादी गोष्ट तुमच्या मनात आली की ‘आज, आत्ता आणि ताबडतोब’ व्हायला पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. व्यापार-उद्योगात नेहमीच्या कामापेक्षा वेगळे आणि नावीन्यपूर्ण काम करावे लागेल. त्यासाठी जादा भांडवलाची आवश्यकता असेल. तुमचे हितचिंतक आणि आíथक संस्था यांच्याकडून तुम्हाला मदत मिळेल. घरामध्ये मौजमजेच्या कार्यक्रमात तुमचा पुढाकार असेल. मित्रमंडळीच्या सहवासामध्ये थोडा वेळ घालविण्याकरिता एखादा विशेष बेत कराल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com