खरं तर प्रत्येकाच्या मनात आठवणींची एक फिल्म सतत चालूच असते. सुखाच्या, दु:खाच्या व्यक्तींच्या वस्तूंच्या कितीतरी आठवणी प्रत्येकजण दुसऱ्याला सांगत असतो आणि परत परत आपल्या मनात जपत असतो, हा मनाचा कप्पा म्हटले तर कधीच रिकामा होतच नाही. जर निवांत वेळ मिळाला की ही फिल्म मध्येच परत कुठून तरी सुरू होऊन कुठल्यातरी वळणावर येऊन थांबते.
सुखद आणि दु:खद दोन्ही प्रकारच्या आठवणी माणसांना पुरून उरत असतात. काही घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतात की ज्या मनाच्या खोल खोल कप्प्यात कुठेतरी जाऊन बसतात आणि मध्येच कधीतरी ज्वालामुखीसारख्या उद्रेक करत बाहेर पडतात, आजी-आजोबांकडे तर अशा आठवणींचा खजिनाच असतो. ‘‘आमच्या वेळी असे नव्हते, किती प्रेमळ लोकं होती पूर्वी, इथपासून ते त्यांच्या बालपणाच्या सर्व आठवणींकडे आपल्या नातवंडांना घेऊन जातात त्यामुळे कधी कधी वाटते की ते फक्त जुन्या आठवणींवर आपले जीवन जगत असतात. मला अजूनही माझी पणजी आजी आठवते की जी कुणीही समोर आले की त्याला पकडून पकडून जुने किस्से सांगत बसायची. म्हणजेच काय माझ्या पणजीच्या आठवणीची आठवण माझ्या मनात आहेच ना. अशाच असतात या आठवणी, आपल्या मनाला एका काळातून दुसऱ्या काळात नेऊन सोडणाऱ्या आठवणी अनेक प्रकारच्या घटनांच्या असतात.
कुण्या प्रिय व्यक्तीच्या आपल्या जीवनातून गेलेल्या असतील, तर त्या दु:खद असतात अशा आठवणी न आठवलेल्याच बऱ्या, पण कोणत्या आठवणी आठवायच्या आणि कोणत्या नाही हे आपल्या हातात थोडेच असते.
काही आठवणी सुखद असतात ज्या आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला आठवत असतात. पहिल्या प्रेमाच्या आठवणी असतील तर काही विचारूच नका. त्या प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. म्हणूनच नव्याने प्रेमात पडलेले सर्व प्रेमवीर एका वेगळ्याच विश्वात दंग असलेले आपल्याला दिसतात आणि ज्यांचे प्रेम सोडून गेलेय ते वेगळ्याच दु:खाच्या विश्वात दंग दिसतात. आपल्या ‘तिची’ किंवा ‘त्याची’ प्रत्येक आठवण त्यांना वेळीअवेळी छळत राहते.
आठवणी प्रत्येकालाच अनुभवास येणाऱ्या आणि कितीही मनात दडवल्या तरी ‘कातरवेळी’ झाकोळून जाणाऱ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा