‘‘डॉक्टर, येऊ का आत? अगदी ‘निरोगी’ दिसताय.’’ दारावर टकटक करून दंतशल्यचिकित्सक (मराठीत ‘डेंटिस्ट’) दंतांकुश यांना मी विचारलं.

‘‘मला काय धाड भरली.. दाढ तुमची धरली असेल..’’ कुणी यांची फी बुडवली की काय..!

star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!

‘‘म्हणजे, तुमच्याकडे आत्ता कुणी पेशंट म्हणजे ‘दंतरोगी’ दिसत नाही, म्हणून गमतीनं म्हटलं.’’ एव्हाना त्यांना माझा विनोद कळला असावा म्हणून मी माझा हसलो.

‘‘दात का दाखवताय आणि..!’’

‘‘तेच तर दाखवायचेत ना, डॉक्टर..’’ मी खुलासा केला.

‘‘मग बसा या खुर्चीवर,’’ असं म्हणून त्यांनी घसरगुंडीसारख्या गुळगुळीत, गुबगुबीत अन् लंब्याचौडय़ा आलिशान खुर्चीकडं बोट दाखवलं. एखाद्या रोबोसारख्या विविध आयुधांचं तबक धरलेल्या त्या खुर्चीच्या मोठय़ा हाताला अंग चोरून डावलत मी त्या खुर्चीवर विराजमान.. छे! पहुडलोच. खरं तर, छिन्नी, हातोडी, ग्राइंडर, अनेक प्रकारच्या सुयांनी भरलेलं ते तबक पाहूनच मी आडवा झालो होतो.

‘‘चूळ भरा.’’ खुर्चीच्या डाव्या हातावर असलेल्या छोटय़ाशा बेसिनच्या कडेवर एक ग्लास ठेवून डॉक्टरांनी मला आदेश दिला. त्या ग्लासाला मी हात लावताच त्यावरचा नळ सुरू झाला आणि ग्लास पाण्यानं भरताच बंद झाला. ही इतकी शहाणी खुर्ची..? मग कळलं, माझ्या डोक्याशी खुर्चीला असलेली कळ वापरून डॉक्टर पाणी सोडत आणि बंद करत होते.

मला तसं दात पाडून घ्यायचं बाळकडूच (अन् कडूगोड आठवणी) मिळालं होतं. त्यामुळेच आता तोंडात निम्मेअधिक म्हणजे १९ दात शिल्लक आहेत. त्या वेळेला जे दंतशल्यविशारद.. हो, ‘विशारद’च म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी मला एक-दोनदा दात काढताना मी संगीतविशारद वगैरे नसतानाही तारसप्तकात ‘आ’ लावायला लावला होता. नंतर त्यांनी माझी समजूतही काढल्याचं मला आठवतं, ..‘आता आइस्क्रीम खा बरं का म्हणजे बरं होईल दुखणं’.. (त्यातली गोड आठवण म्हणजे हीच आइस्क्रीम मिळण्याची). त्यांच्याकडची खुर्ची या खुर्चीपेक्षा किती तरी गरीब होती, असं मला अंधूकसं आठवतं.

आता माझ्या दु:खी दाताची चिकित्सा करून डॉक्टरांनी त्याच्या मुळावरच घाव घालावा लागणार, असं सांगितलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुळातच दाताच्या खरोखरच कण्या होऊ घातल्यात, त्यामुळे त्याला मूळपदावर आणण्यासाठी त्याची पाळंमुळं खणून काढावी लागतील. त्याच्यातील किडीचा निचरा करण्यासाठी एक कालवाही काढावा लागेल.

‘‘हे ‘रूट कॅनॉल’ करण्यासाठी आणि चांदी भरून सावरलेल्या त्या दाताला सिरॅमिकची कॅप करण्यासाठी एकूण रुपये चार हजार खर्च येईल.’’ डॉक्टरांनी मुद्दय़ावर बोट ठेवलं. दाताला नेहमी चावायला देण्याऐवजी त्याला ‘टोपी’ घालून वाचवण्याची कल्पना मला नवीन होती. मी होकार दिला. चांदी भरलेल्या दाताला सिरॅमिकची कॅप, खाचा झालेल्या डोळय़ांवर जाड भिंगाच्या काचा, अपघातात तुटलेल्या हातात स्टीलच्या पट्टय़ा (आता हातातून काढून भंगारात ९० रुपये किलोनं विकाव्या म्हणतो), कानातल्या यंत्राची तांब्याची तार.. अशा मला पाहिल्यावर कोणालाही वाटेल, पंचमहाभूतांतून निर्माण झालेला पंचतत्त्वांचा घडलेला हा मनुष्यप्राणी नसून पंचधातूंनी ‘व्यापलेला’ रोबोच असावा.

‘‘तुम्ही दातांकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय.’’ माझ्या दातांच्या खिंडारातून आरपार डोकावत डॉक्टर बोलले,

‘‘..‘आ’ करा..’’

मी त्यांच्या बोलण्याच्या विचारात मग्न.

‘‘..‘आ’..’ करा.’’ डॉक्टर जरा मोठय़ांदा म्हणाले असावेत.

इथे समस्या अशी आहे की, माझ्या कानाची छिद्रे अरुंद आहेत, त्यामुळे ऐकू कमी येतं आणि दातांमधल्या भेगा मोठय़ा आहेत.

मी ‘आ’ केला.

‘‘अहो, अजून मोठा ‘आ’ करा.’’

आता मला हे वाक्य दोनदा ऐकू आलं, दातांमधून ‘एको’ निर्माण झाल्यासारखं.

मी जबडा आणखी वासला; पण डॉक्टरांचं काही समाधान होत नसावं. त्यांनी पुन्हा फर्मान सोडलं. मनात विचार आला, डॉक्टर माझ्या तोंडाच्या विवरात सुएझ कालवा बांधणार की काय..!

नंतर त्यांनी शिल्लक असलेल्या दातांवरून छोटी हातोडी मारत ‘जलतरंग’ वाजवला, अर्थातच मधले एक-दोन सूर वाजणार नव्हतेच.

‘‘ब्लड प्रेशर आहे का?’’

‘‘ब्लड आहे, प्रेशरचं माहीत नाही.’’

‘‘शुगर?’’

‘‘नसावी, मला चहा-कॉफीत वेगळी घ्यावी लागते.’’

दंतशल्यचिकित्सक दाताचीच फक्त चिकित्सा करतील असं वाटलं होतं, पण यांनी बाकीचीही चिकित्सा केली. मनात जरा घाबरलो. म्हटलं, कालवा खोदत शरीरात कुठेपर्यंत जाणार आहेत कुणास ठाऊक..! ‘‘या परवा दिवशी. सुरू करू तुमची दुरुस्ती. डॉक्टरांनी निरोप दिला. तेवढय़ात त्यांना काही आठवलं, म्हणून मला हातानं थांबायची खूण केली. थोडय़ाच वेळात हातात कृत्रिम दातांचा तक्ता घेऊन माझ्या दाताशी त्यातले दात नेऊन बघू लागले; साडीला मॅचिंग ब्लाऊज बघावा तसं. त्यातल्या एका पिवळसर छटा असलेल्या दाताची निवड डॉक्टरांनी केलेली पाहून मी म्हटलं, ‘‘दात दुधासारखा शुभ्र दिसायला पाहिजे ना, डॉक्टर?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘दिसेल ना.. फक्त गाईच्या दुधासारखा, तुमचे सगळे दात तसेच आहेत.’’

निघण्यासाठी उठता उठता खुर्चीकडे कौतुकानं पाहिलं. विचार आला, पेशंट्सच्या तोंडाच्या टांकसाळी खोलून दमल्यावर ‘निरोगी’ असताना डॉक्टरसाहेब या खुर्चीचा बिछाना करून विसावत असतील. मी त्या खोलीतून बाहेर पडणार, त्याआधीच एक बाई लगबगीनं दार लोटून आत शिरल्या.

‘‘डॉक्टरसाहेब, जरा र्अजटली दात काढायचा होता. आमची ट्रेन आहे तासाभरात आणि नेमका दात दुखायला लागला. वाटेत तुमचं क्लिनिक दिसलं..’’

‘‘पण त्यासाठी भूल द्यावी लागते..’’ डॉक्टर.

‘‘नको, तेवढा वेळ नाही हो, तसाच काढून टाकला तरी चालेल.’’ बाई खूपच घाईत होत्या.

‘‘वा, मावशी! तुम्ही बऱ्याच सहनशील दिसताय; बरं दात तरी बघू कुठला दुखतोय, बसा या खुर्चीवर..’’ म्हणत डॉक्टर सरसावले. तोच त्या बाईंनी दार अर्धवट उघडून उभे राहिलेल्या, केविलवाण्या चेहऱ्याच्या आपल्या पतिराजांना आत ओढत सांगितलं, ‘‘अहो, दाखवा तुमचा दुखरा दात यांना लवकर..’’

दार अडवून उभ्या असलेल्या त्या माणसामुळे मला बाहेर जाता येत नव्हतं. ओठांवर येणारं हसू दातांखाली दाबत मी आता पटकन बाहेर पडलो. बाहेर आमच्या सोसायटीतले छबूराव भेटले. कुठल्याही गोष्टीत कारणाशिवाय तोंड घालण्याचा यांचा स्वभाव. आत्ताही बळेबळे मला थांबवून त्यांनी तोंड उचकटलं, ‘‘काय, दातं पाडायला का? तरी मी सांगत होतो, च्युइंगम अन् तंबाखू खाणं टाळा..!’’

‘‘आता ‘तोंडा’तच तोंड घातलं म्हटल्यावर मीही उद्गारलो, ‘‘नाही, माझ्या हिऱ्यासारख्या दाताला पैलू पाडून घ्यायला आलो होतो.’’

यावर मोठय़ांदा हसत ‘‘भलतंच बुवा तुमचं मार्मिक बोलणं’’ म्हणत ते आपल्या वाटेनं निघून गेले. माझ्या प्रस्तावित दंतोपचाराबद्दल माझ्या कचेरीत यथावकाश दंतोपदंती सर्वानाच वर्दी मिळाली. ‘‘तू म्हणजे डेंटिस्टला भेटलेलं कूळ आहेस बघ.’’ राजानं त्याच्या दंतपंक्ती वाजवायला सुरुवात केली. ‘‘पण हे दाताचं मूळ वेळच्या वेळीच मजबूत केलेलं बरं बाबा. नाही तर..’’ असं म्हणून तो थांबून हसला. ‘‘काय रे, काय झालं?’’ दातात अडकलेलं निघत नाही तोपर्यंत जसं अस्वस्थ होतं, तसंच असं कुणी बोलणं अर्धवट सोडलं की मला होतं.

राजा पुढे बोलू लागला, ‘‘अरे, काल मी एका खानावळीत गेलेलो तिथं एक म्हातारं जोडपं थाळी घेऊन बसलेलं. आजोबा पोळीभाजी खात होते आणि आजीबाई त्यांच्या तोंडाकडे बघत बसलेल्या. मला जरा विचित्र वाटलं. म्हटलं, भरलेलं ताट पुढे ठेवून आजीबाई का थांबल्यात.. कदाचित त्या मर्यादित थाळीतली पोळी आजोबांना कमी पडेल म्हणून की काय..? मी आपलं कुतूहलानं चौकशी केली, तर आजीबाई म्हणाल्या, त्यांचं झालं की मी सुरू करेन. मी म्हटलं, नवऱ्यानंतर जेवायची परंपरा दिसतेय. तेवढय़ात त्या पुढं बोलल्या, ‘‘एकच कवळी आहे नं आमच्या दोघांत म्हणून..’’
श्रीपाद पु. कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com