अलीकडच्या काळात मॉर्निग वॉकचे प्रमाण नुसते वाढलेच नाही तर ते उच्च राहणीमानाचे द्योतकही झाले आहे. सेवानिवृत्तीनंतर मीही मॉर्निग वॉकला जाऊ लागले. नाना प्रकारची माणसे येथे भेटतात. काही लोक मॉर्निग वॉकला जायचे म्हणजे पूर्वतयारीच खूप करतात. स्पेशल ड्रेस, स्पेशल बूट सारे खरेदी करतात, पण त्यांचे हे चालणे तेरडय़ाचा रंग तीन दिवस असते त्याप्रमाणे फारच अल्पकाळ टिकते. हे लोक आरंभशूर असतात. वॉकसाठी जाणारा एखादा कुणी स्कूटरवरून जातो आणि तिकडे चालतो असे म्हणतो. आता हेच बघा ना, आमचे कुलकर्णी काका बरेच वर्षे मधुमेहाचे पेशंट. डॉक्टरांनी चाला म्हटल्याबरोबर सकाळ-संध्याकाळ इतके चालू लागले की, प्रमाणाबाहेर चालल्यामुळे त्यांना कायमचे गुडघ्याचे दुखणे लागले. आमच्या जवळच राहणाऱ्या एक बाई बागेतल्या मांजरासाठी न चुकता दूध, मांजराचे खाणे घेऊन येतात, त्यामुळे मांजर तर त्यांची वाट बघतेच, पण त्यामुळे मॉर्निग वॉकला येणाऱ्या कुत्र्यांचे प्रमाणही वाढले आहे, कारण कुत्र्याचा डोळा मांजरांवर असतो. गंमत म्हणजे सगळ्यांबरोबर मांजरही फेऱ्या मारत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा