कॅप्टन अमेरिका- द विंटर सोल्जर या सिनेमात जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर एकूण ५८६ दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय केला. जगभरातल्या रसिकांकडून ‘निखळ मनोरंजन’ असं प्रशस्तिपत्रक मिळवणाऱ्या या चित्रपटाविषयी-

‘कॅप्टन अमेरिका : द विंटर सोल्जर’ ही २०१४ ची एक सुपरडुपर अमेरिकन सुपर हीरो मूव्ही. या चित्रपटात माव्‍‌र्हल कॉमिक्सचं कॅरॅक्टर कॅप्टन अमेरिका केंद्रस्थानी आहे. चित्रपटाची निर्मिती ‘माव्‍‌र्हल स्टुडिओज’नी केली आहे, आणि वितरण व्यवस्था वॉल्ट डिस्ने स्टुडिओज मोशन पिक्चर्सची आहे. २०११च्या ‘कॅप्टन अमेरिका : द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे, आणि माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा नववा भाग. अ‍ॅन्थनी आणि जॉन रूसो यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पटकथा लिहिलीय ख्रिस्टोफर मार्कस आणि स्टीफन मॅकफिली यांनी. भूमिका केल्या आहेत ख्रिस इव्हान्स, स्कार्लेट जोहानस्सन, सेबास्टियन स्टॅन, अ‍ॅन्थनी मॅकी, सॅम्युएल जॅकसन.
विंटर सोल्जर या गूढ मारेकऱ्याला तोंड देताना ‘शिल्ड’मधल्या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी कॅप्टन अमेरिका, द ब्लॅक विडो आणि सॅम विल्सन आपलं सामथ्र्य एकवटतात, याच्यावर चित्रपटाचा फोकस आहे.
‘कॅप्टन अमेरिका : द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर’ प्रदर्शित होण्यापूर्वी मार्क्‍स आणि मॅकफिली या दिग्दर्शक द्वयीने चित्रपटाचा सिक्वेल निघणार असल्याचं जाहीर केलं होतं. लॉस एंजेलिस येथे एप्रिल २०१३त चित्रपटाचं मुख्य चित्रण सुरू झालं, आणि त्यानंतर वॉशिंग्टन डी.सी., क्लीव्हलँड, ओहायो येथे पुढचा भाग चित्रित झाला.
‘कॅप्टन अमेरिका : द विटंर सोल्जर’चा प्रीमियर शो लॉस एंजेलिस येथे २६ मार्च २०१४ ला झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर २६ मार्च २०१४ त चित्रपट प्रदर्शित झाला. नॉर्थ अमेरिकेत ४ एप्रिल २०१४ ला हा टूडी, थ्रीडी आणि आयमॅक्स थ्री-डीमध्ये चित्रपटाचं प्रदर्शन करण्यात आलं. जागतिक स्तरावर समीक्षा आणि आर्थिक यशाच्या निकषांवर चित्रपट यशस्वी झाला. आजच्या घडीला या ब्लॉकबस्टर चित्रपटाने तब्बल ४१ मिलिअन यू. एस. डॉलर्सची कमाई करत ‘रिओ २’ या चित्रपटाला दुसऱ्या स्थानावर ढकललं आहे. जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण ५८६ मिलियन यू. एस. डॉलर्सचा गल्ला जमवला. याचा आणखी एक सिक्वेल १६ मे २०१६ त प्रदर्शित होईल.

बॅटल ऑफ न्यूयॉर्कनंतर दोन वर्षांनी शिल्ड (र.ऌ.क.ए.छ.ऊ) या एस्पिओनेज एजन्सीसाठी स्टीव्ह रॉजर्स काम करत असतो. डायरेक्टर निक फ्यूरीच्या हाताखाली नताशा रोमानॉफ, लीडर रूमलो आणि रॉजर्स यांना शिल्डच्या बोटीवर ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी पाठवण्यात येतं. धनलोभी चाचा जॉर्जेस बाट्रॉकच त्या बोटीवर कब्जा असतो.
मोहिमेवर असताना रोमानॉफचा जहाजावरच्या कॉम्प्युटर्सवरून फ्यूरीसाठी माहिती काढण्याचा बेत रॉजर्सला कळतो. फ्यूरीला या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी रॉजर्स ‘शिल्ड’च्या हेडक्वार्टर्सला परत येतो. तिथे त्याला प्रोजेक्ट इनसाइट म्हणजेच स्पाय सॅटेलाइटला जोडलेल्या तीन हेलिकॅरिअर्सची माहिती देण्यात येते. रोमानॉफने आणलेली माहिती उघडत नसल्याने फ्यूरीला इनसाइटचा संशय येतो.
मारिया हिलच्या सांकेतिक भेटीला जात असताना विंटर सोल्जर नावाच्या रहस्यमय हल्लेखोराकडून फ्यूरीवर हल्ला होतो. फ्यूरी त्याचा जीव वाचवून रॉजर्सच्या अपार्टमेंटकडे पळून येतो, पण विंटर सोल्जरच्या गोळीला शेवटी बळी पडतो. तत्पूर्वी तो रॉजर्सला महत्त्वाची माहिती असलेली फ्लॅश ड्राइव्ह देतो. ती फ्लॅश ड्राइव्ह अ‍ॅलेक्झांडर पिअर्सला शिल्डच्या कार्यालयात भेट झाल्यावर त्याला देण्यास नकार दिल्याने पिअर्स त्याला टेप फ्युनिटिव्ह, पळपुटा घोषित करतो. शिल्डचे लोक पाठलागावर असताना रॉजर्सला रोमानॉक भेटते. त्या दोघांना न्यू जर्सी येथे असलेल्या एका गुप्त बंकरची माहिती मिळते. तिथे लपलेले असताना शिल्डच्या क्षेपणास्त्रामुळे बंकर उद्ध्वस्त होत असताना दोघंही थोडक्यात बचावतात.
रॉजर्स आणि रोमानॉफ, सॅम विल्सन या पूर्वीच्या यू.एस.ए.एफ.च्या पॅरारेस्क्यूमॅनची मदत घेतात. रॉजर्सची त्याच्याबरोबर मैत्री झालेली असते म्हणून तो त्याचं पॉवर असलेलं ‘फाल्कन’ विंगपॅक घेतो. रॉजस, रोमानॉफ आणि विल्सनवर विंटर सोल्जर हल्ला करतो. सिटवेलला ट्रॅफिकसमोर फेकलं जातं. विंटर सोल्जर बरोबरच्या संघर्षांत रॉजर्स त्याला त्याचा एके काळचा बेस्ट फ्रेंड बकी बार्नस म्हणून ओळखतो. हिल त्या तिघांना एका सुरक्षित ठिकाणी लपवतो, तिथे स्वत:चा मृत्यू झाला असं भासवलेला फ्यूरी त्यांची वाट बघत असतो. त्याच्याकडे हेलिकॅरीजमध्ये त्यांच्या कंट्रोलर चिप्स टाकून ती उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन असतो. हेलिकॅरिअर्सना सक्रिय करण्यासाठी वर्ल्ड सिक्युरिटी कौन्सिलचे सभासद येतात, तेव्हा एक अखेरचा संघर्ष होतो.
एका हायड्रालॅबच्या ठिकाणी बॅरन वुल्फ गँग व्हॉन स्टकर घोषित करतो की ‘एज ऑफ मिरॅकल्स’ सुरू झालंय. दोन कैद्यांची तपासणी करण्यात येते. एकाला सुपरह्य़ूमन गती असते, आणि दुसऱ्याला टेलिकायनेटिक शक्ती असते. विंटर सोल्जर स्मिथ सोनियन संस्थेत बकी मेमोरियलला भेट देतो, असा प्रसंग सिनेमाची श्रेयनामावली दाखवून झाल्यावर येतो.
स्टीव्ह रॉजर्सच्या भूमिकेत ख्रिस इव्हान्स आहे. दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या या निष्णात योद्धय़ाला प्रायोगिक तत्त्वावर वापरलेल्या सेरमद्वारे लटकवलेल्या फ्रोझन अ‍ॅनिमेशन स्थितीत ठेवलेलं असतं आणि आता तो आधुनिक जगाशी जमवून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
या भूमिकेसाठी इव्हान्सला ब्राझिलिअन जूजूत्सू कराटे, बॉक्सिंग आणि जिम्मॅस्टिक्समध्ये प्रशिक्षण देण्यात आलं, तसंच त्याच्यासाठी एक खास ढालही बनवण्यात आली.
स्कार्लेट जोहानस्सन या सुंदर, सेक्सी लूकसाठी आणि चांगल्या अभिनयासाठीही ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने नताशा रोमानॉफ ऊर्फ ब्लॅक विडोची भूमिका केली आहे. एकत्र काम करताना रॉजर्सबरोबरची नताशाची मैत्री गडद होत जाते. त्या मैत्रीमुळेच ते त्यांना काय हवंय, आणि त्यांचं खरं रूप कोणतं, याबद्दल प्रश्न विचारायला लागतात.
बकी बार्नस ऊर्फ विंटर सोल्जरची भूमिका केलीय सेबस्टियन स्टॅनने. माव्‍‌र्हल स्टुडिओजबरोबर स्टॅनचा नऊ चित्रपटांचा करार आहे. फिजिकल ट्रेनिंगबरोबरच स्टॅनने त्या विशिष्ट कालावधीत संदर्भ ग्रंथांचादेखील अभ्यास केला.
‘मॅट्रिक्स’फेम सॅम्युएल जॅक्सन निक फ्यूरीच्या भूमिकेत, तर सुप्रसिद्ध नट रॉबर्ट रेडफोर्ड अ‍ॅलेक्झांडर पिअर्सच्या भूमिकेत चमकले आहेत.
‘डिस्ट्रिक्ट नाइन’ आणि ‘एलिसियम’ चित्रपटांमुळे अधिक ओळखल्या जाणाऱ्या ट्रेंट ऑपालॉकने फोटोग्राफीचं दिग्दर्शन केलं आहे. रुसो दिग्दर्शक द्वयीने चित्रपटासाठी उॅक म्हणजेच कॉम्युटर जनरेटेड इमेजरीपेक्षा खऱ्याखुऱ्या लाइव्ह अ‍ॅक्शनवर अधिक भर दिला आहे.
हेन्री जॅक्सनने चित्रपटांचा म्युझिकल स्कोअर केला आहे. हॉलीवूड रेकॉर्ड्सने त्याचा साऊंडट्रॅक अल्बम एप्रिल २०१४ त वितरित केला.
हॉलीवूड रिपोर्टरचे टॉड मॅकार्थी, व्हरायटीचे स्कॉट फाऊंडाज, शिकागो सन-टाइम्सचे रिचर्ड रोपर, लॉस एंजेलिस टाइम्सचे केनेथ टय़ुरान यांनी ‘एका बिग बजेट सुपर हीरो चित्रपटात जे काही असायला पाहिजे, ते सगळं यात आहे,’ असं म्हटलंय. थ्रिलर, षड्यंत्र आणि साहस यांचा सुरेख मेळ घातल्याने रसिकांनी या चित्रपटाला ‘निखळ मनोरंजन’ असं प्रशस्तिपत्र दिलं आहे.
माव्‍‌र्हल कॉमिक्सवर आधारलेला माव्‍‌र्हल स्टुडिओजचा हा अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर,साय-फाय, फॅन्टसी प्रकारात मोडणारा चित्रपट, त्याची उत्कृष्ट निर्मितीमूल्यं, पकड घेणारी पटकथा, लक्षवेधी अभिनय आणि जबरदस्त अ‍ॅक्शन यामुळे माव्‍‌र्हलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच खोवतो.