भारतीयांना हिमालयाचं एक सुप्त आकर्षण आहे. तो आपल्याला सतत साद घालत असतो. त्याच आकर्षणातून केलेला हा ट्रेक-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिमालयाचे आकर्षण आपणा भारतीयांच्या- विशेषत: पर्यटक, ट्रेकर्स यांच्या मनावर सदैव राज्य करीत आले आहे. हिमालय ही देवभूमी का म्हणतात, हे स्वत: अनुभवल्याशिवाय समजू शकत नाही. एकदा का हिमालयाच्या प्रेमात पडलात तर तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. त्याचे आकर्षण उत्तरोत्तर वाढत जाते.
यूथ हॉस्टेल ऑफ इंडियातर्फे दरवर्षी काही ट्रेक्सचे आयोजन होत असते. जसे की सारपास ट्रेक, सारकुंडी ट्रेक, चंद्रखणी पास इत्यादी. या वर्षी मे-जून या महिन्यात चंद्रखणी पासचे आयोजन केल्याचे कळल्यावर लगेच ऑनलाइन नोंदणी झाली. सोबत माझे मित्र व सहकारी अशोक पंडित, अशोक माऊसकर व पंचाहत्तर वर्षांचे हरहुन्नरी शशिकान्त कुशे या माझ्या मित्रांनी लगेच होकार कळवून टाकला, आणि एक मेच्या बॅचसाठी आम्ही चंदीगडहून सेवबाग येथील (मनाली रोडवर) बेस कॅम्पला जाऊन पोचलो. तेथे आधीच यूथ हॉस्टेल ऑफ इंडियातर्फे २० ते २५ मे तंबू (टेंटस्) उभारलेले होते. ट्रेकच्या पूर्वतयारीकरिता आम्ही मुंबईजवळ लहान लहान ट्रेक्स करून तयारी केली होती. तेथे आमची रीतसर नोंदणी झाली. यूथ हॉस्टेलतर्फे सर्व सोय व्यवस्थित केली होती. पुढचे दोन दिवस वातावरणाजवळ समरस होण्यासाठी पूर्वतयारी आमच्याकडून करून घेतली.
४ मे रोजी आम्ही सेवबाग ते योसगो (Yosgo) अशा चढाईसाठी प्रस्थान ठेवले. वातावरण सकाळी फारच थंड होते. त्यामुळे उत्साह वाटत होता. प्रथम जवळजवळ २० कि.मी. वर असलेल्या मलाना धरणाजवळ (हायड्रो प्रॉजेक्टजवळ) बसने प्रवास झाल्यावर येथूनच खरा ट्रेक सुरू होतो. नऊ हजार फूट उंचीवर असलेल्या योसगो कॅम्पला पोचण्यासाठी जवळजवळ साडेतीन ते चार तास लागले. अतिशय कठीण चढउतार व खडकाळ भागातून चालल्यामुळे दमछाक झाली. पण योसगोलो पोचल्यावर पावसाच्या सरीने आमचे स्वागत झाले. आम्हासोबत पुणे व मुंबईच्या सुमारे ५० जणांच्या ग्रुपमुळे मजा आली. यूथ हॉस्टेलच्या चोख व परिपूर्ण व्यवस्थेमुळे गैरसोय झाली नाही.
६ मे रोजी योसगो कॅम्प ते बहाली असा प्रवास सुरू झाला. अतिशय खडबडीत व अरुंद वाट. फारच सावधानतेने प्रवास करावा लागतो. परंतु पुण्याचे सतीश पवार व त्यांचे सहकारी यांच्यामुळे सफर आनंददायी व आल्हाददायी झाली. सुमारे नऊ हजार फूट उंचीवर असल्यामुळे प्राणवायूच्या कमतरतेमुळे धाप लागत होती. परंतु नवीन गोष्टी, मुलुख व सृष्टिसौंदर्य पाहण्याच्या हव्यासापोटी त्रास जाणवला नाही. यूथ हॉस्टेलचे गाईडस् व कॅम्पलीडर यांच्या सल्ल्यानुसार सावकाश मार्गक्रमण करण्यातच मजा होती.
मजल-दरमजल करताना मलाना नावाचे गाव वाटेत लागते. आख्यायिका अशी की सिकंदर व पौरस राजाच्या युद्धानंतर सिकंदराच्या काही सैनिकानी परत न जाता येथेच राहणे पसंत केले. सुमारे अडीच हजार वस्तीच्या या लोकांनी आपली स्वतंत्र संस्कृती निर्माण केली व जोपासली. येथे काही गोष्टी विचित्र अशा आढळल्या. या गावातूनच जायचे असल्याने तेथे कुणाशीही न बोलण्याचे व कोणत्याही वस्तूला हात न लावण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या. येथे जमदग्नी ऋषी व रेणुका यांची देवळे असताना ती उघडून दर्शन घेणे,हेही शक्य नव्हते. देवळांना शिवल्यास दोन ते अडीच हजार दंड करण्याच्या पाटय़ा लावण्यात आल्या होत्या. या गावातील पुरुष काहीही कामे करत नसून शेतीची व घरची कामे फक्त स्त्रियाच करतात असे आढळते. गावात शाळा असूनही शिक्षणाचा म्हणावा असा प्रभाव काही आढळला नाही. तेथून पुढे बहाली कॅम्पला जात असताना पावसाने गाठल्याने सगळय़ांची धावाधाव झाली. सर्वत्र निसरडे झाल्यामुळे कॅम्पपर्यंत पोहोचताना सर्वाची दमछाक झाली. परंतु हिमशिखरांच्या मनमोहक दर्शनाने सर्व पावन झाले.
आता तिसरा दिवस बहाली ते वॅचिंग (waching) असा प्रवास. तशीच सर्वत्र कठीण चढण व मार्ग. परंतु सर्व ग्रुपमुळे मजा आली. दुपापर्यंत वातावरणात बदल नव्हता, पण दुपारनंतर बर्फाला सुरुवात झाली. आयुष्यात प्रथमच बर्फाचा अनुभव घेतल्याने मजा आली. अंतर सुमारे आठ कि.मी. परंतु शेवटच्या दोन कि.मी. अंतरात सर्वजण अक्षरश: थकून गेले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सुमारे अडीच वाजता उठायचे असल्याने संध्याकाळी ७ वाजताच मध्यरात्र झाली. दुसऱ्या दिवसाचा कॅम्प हा नागरोनीचा होता.
वॅचिंग ते नागरोनी हा सुमारे ७ कि.मी. प्रवास. परंतु अत्यंत कठीण चढण व बर्फातील पूर्ण प्रवास, त्यामुळे फारच दमछाक झाली.
आज ८ मे. नागरोनी ते नया टाप्रू असा सुमारे १४ कि.मी.चा प्रवास होता. नागरोनी कॅम्प परिसरात पाऊस पडला होता. त्यामुळे थंडीचा कडाका जोराचा होता. पहाटे अडीच वाजता कॅम्पची शिट्टी वाजली. नाइलाजाने
आणि आता ९ मे. शेवटचा दिवस. आम्ही बेसकॅम्पवर पोचणार. सर्वजण उत्साहात व खुशीत. आता चढण नव्हती तर तीव्र उतार (१० हजार फुटावरून ४ हजारावर). वाट संपता संपेना. आम्ही २० जण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे थोडीशी काळजी. परंतु बेसकॅम्पवर पोचल्यावर विशेष कौतुक झाले. चेहऱ्यावर ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान. एकमेकांची विचारपूस, पत्ते, टेलीफोन नंबर यांची देवाणघेवाण.
आणि आता परतीचा प्रवास. घराची ओढ. चंदीगड-मुंबई गाडीने मुंबईला आलो. परंतु अजूनही चंद्रखणीच्या आठवणीतून बाहेर आलो नाही. मजा हीच की थकवा संपल्यावर नवीन मोहीम कधी याची उजळणी होत असते. हिमालय एकदा पाहिल्यावर, अनुभवल्यावर तो नेहमी साद घालत असतो!
(सर्व छायाचित्रे : प्रकाश कामत)
उमेश महादळकर