lp02भारतीयत्व जपणारी अलंकारिक रचना हे पळशीकर यांच्या चित्रांचे वैशिष्टय़ होते. आयुष्यात खूप उशिरा म्हणजे २५ व्या वर्षी त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर एक एक पायरी चढत ते जेजेचे अधिष्ठाताही झाले. जलरंगांतून चित्राला पोत प्राप्त करून देणे हे त्यांचे कसब होते. भारतीय पुनरूज्जीवनवादी चित्रशैलीतील त्यांची चित्रे विशेष गाजली. भारतीय चित्रकारांमध्ये आलेल्या आधुनिकीकरणाच्या लाटेत सहभागी झालेल्या बॉम्बे ग्रुपचे ते सदस्य होते. त्यांच्या चित्रनिर्मितीबरोबरच महत्त्वाची ठरले ते त्यांनी घडवलेले विद्यार्थी. त्यांचे अनेक विद्यार्थी नंतर विख्यात चित्रकार झाले आणि सर्वानीच त्यांचे ऋण मान्य केले.

Story img Loader