अभिजात आणि उपयोजित चित्रकला या दोन्ही विषयांमध्ये समान प्रभुत्व असलेले चित्रकार म्हणून विष्णू सीताराम गुर्जर यांचे नाव कलेतिहासात लक्षात राहील. ड्राय पेस्टलमधील त्यांची चित्रे ही केवळ वाखाणण्याजोगी होती. विद्यार्थीदशेत जेजेमध्ये असताना तर त्यांनी अनेक मह्त्त्वाच्या पुरस्कारांवर स्वत:ची मोहोर उमटवलीच. पण त्याचबरोबर बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात चार वेळा गव्हर्नर्स पुरस्कार, २ वेळा रौप्य आणि तब्बल ७ वेळा इतर रोख बक्षिसे, कोलकाता अकादमी ऑफ फाइन आर्टच्या प्रदर्शनात दोन सुवर्णपदके, दोन रौप्यपदके मिळवली. व्यक्तिचित्रण हा त्यांचा हातखंडा विषय होता.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा