भारतीय लघुचित्र शैलीच्या वैशिष्टय़ांचा वापर करत स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करणारे चित्रकार म्हणजे जगन्नाथ मुरलीधर अहिवासी. ‘जेजे’चे विद्यार्थी असलेल्या अहिवासी यांना १९२७ साली मानाच्या मेयो पदकाने गौरविण्यात आले होते. भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीमध्येही अहिवासी वेगळे ठरले. ते अपारदर्शक जलरंगांचा वापर त्यांच्या चित्रांमध्ये करत. युनेस्कोच्या जागतिक प्रदर्शनात अहिवासींच्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला. ते चित्र एवढे छान होते की, चीन सरकारनेही त्यांच्याकडून त्या चित्राची प्रतिकृती साकारून घेतली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातर्फे येत्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ‘प्रवाह’ या प्रदर्शनामध्ये त्यांची चित्रे प्रत्यक्ष पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-06-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व चित्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra