कोल्हापूरच्या कलासंपन्न भूमीतील आणखी एक प्रसिद्ध चित्रकार म्हणजे अनंत मल्हार माळी. सुरुवातीला पुण्यात चित्रशाळा प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी प्रसिद्ध चित्रकार ए. एच. मुल्लर यांच्यासह चित्रकलेचा वर्ग सुरू केला. ‘मनोरंजन’, ‘करमणूक’, ‘नवयुग’ या तत्कालीन नियतकालिकांमध्ये त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली. त्यांचे प्रस्तुतचे ‘मेघदूत — यक्षपत्नी’ हे चित्र विशेष गाजले. यामध्ये त्यांचे चित्रण कौशल्य पुरेपूर पाहायला मिळते. यक्षपत्नीच्या अंगावरील वस्त्राच्या चुण्या, जमिनीवरील नक्षीदार सुरई यातून त्यांच्या चित्रणातील बारकावे लक्षात येतात. त्यांची अनेक चित्रे आजही औंधच्या संग्रहालयात पाहायला मिळतात.
(चित्रसौजन्य— नेहरू सेंटर कलादालन, वरळी)
चित्र
कोल्हापूरच्या कलासंपन्न भूमीतील आणखी एक प्रसिद्ध चित्रकार म्हणजे अनंत मल्हार माळी. सुरुवातीला पुण्यात चित्रशाळा प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी प्रसिद्ध चित्रकार ए. एच. मुल्लर
First published on: 04-07-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चित्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra