स्त्रियांचे स्वातंत्र्य, मुक्तविचार अन् त्याच नाण्याची स्वैराचारी बाजू या विषयावर सध्या साहित्य आणि चित्रपटांतून महापूर येत आहे. त्यातून संकरित विचारांची ‘स्त्री माजवादी’ संस्कृती विकसित होत आहे यात शंकाच नाही. त्याचेच दाखले देणाऱ्या देशी अन् विदेशी चित्रपटाचा आढावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही मराठी ब्लॉग, फोरम्सयुक्त संकेतस्थळे वाचत असलात तर आजच्या पिढीच्या स्पंदनांची खरी जाणीव होण्याची शक्यता अधिक. एका सुप्रसिद्ध मराठी मायाजालीय लेखिकेची वेगळ्याच विषयावरील लेखात स्त्रीवादावरील व्याख्या गेल्या आठवडय़ात लोकप्रिय झाली आहे. ‘आपण बायांनी माज करणे, हाच खरा स्त्रीवाद’ यावर गमतीशीर उलटसुलट प्रतिक्रिया ‘ऐसी अक्षरे’नामक मराठी फोरमवर जोमात सुरू आहे. १९७० ते १९९० या कालावधीत स्त्रीवाद संकल्पनेला जगभरामध्ये उभारी आली असली, तरी नव्वदोत्तरी काळात स्त्रीवादी संकल्पना राजकारण, समाजकारण आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात हळूहळू झिरपू लागल्या. आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीचीच नाही तर पुरुषी मानसिकतेला मागे टाकणारी अग्रेसर स्त्री मते समोर येत आहेत. ती योग्य की अयोग्य याबाबतचा विचार सापेक्ष असला, तरी पुस्तक, टीव्ही मालिका आणि चित्रपटांसारख्या परिणामकारक माध्यमांमध्ये विचारांचे उग्ररूप नवतेला स्वीकारतानाही स्त्रिया या परंपरेशी संघर्ष करताना अडकलेल्या दिसतात. आजच्या ‘मेट्रोसेक्शुअल स्त्री’च्या एकसारख्याच आवृत्त्या जगभरातील टीव्ही मालिका आणि चित्रपट समोर आणत आहेत.

याला रूढार्थाने खरी सुरुवात झाली ती नोरा एफ्रॉन या अमेरिकी विदुषीच्या लेखनप्रपंचाइतकेच कॅण्डस बुशनेल या पत्रकार-लेखिकेच्या ‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’ या वृत्तपत्रीय सदरामुळे. या सदराचे पुस्तकात आणि पुढे टीव्ही मालिकेत रूपांतर होईपर्यंतचा प्रवास म्हणजे स्त्रीवादाच्या व्याख्येत नवी आवर्तने घडण्याचा काळ आहे. उघडपणे आपल्या कामेच्छांचे आणि वर्तनांचे प्रगटीकरण करीत नात्यांविषयी स्त्री माजवादाची रूपे सादर करणाऱ्या या पुस्तक-टीव्ही मालिकेतील चार मैत्रिणींच्या जीवनगाथांचा प्रभाव एका पिढीने अंगीकृत केला. आज गंमत म्हणून गुगल केले, तर त्या मालिकेच्या कौतुकाऐवजी टीकेची पानेच पुढे येतात. ‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’तील पात्रांच्या जगण्यातील मुक्त विचारांमुळे चुकीची ‘रोल मॉडेल्स’ आजच्या स्त्रियांसमोर उभी केल्याबद्दल त्या मालिकेवर तोंडसुख घेणाऱ्या स्त्रियांचीच संख्या अधिक दिसते.

अर्थातच कुणाची बाजू घ्यावी हा मुद्दा वादातीत असला, तरी मधल्या काळात ‘मोनालिसा स्माइल’, ‘एरिन ब्रोकोव्हिच’, ‘नॉर्थ कण्ट्री’ , ‘किल बिल’, ‘इझी ए’,  ‘द गर्ल विथ ड्रॅगन टाटू’, ‘मॉन्स्टर’, ‘द हेल्प’, ‘द ब्रेव्ह वन’ या चित्रपटांतून आणि लीना डनम या लेखिका-दिग्दर्शिकेच्या ‘द गर्ल्स’ या ताज्या टीव्ही मालिकेपर्यंत झिरपलेला स्त्री माजवादाचा नवा दृष्टिकोन अभ्यासण्याजोगा आहे.

पुरुषांचा एकाच वेळी तिरस्कार करीत त्यांच्याबाबत कमालीचा स्वैराचारी विचार, आपल्या स्वातंत्र्याचा अतिरेकी आग्रह, अन् त्यावर गदा येत असल्याचा सार्वकालिक संशय, या सगळ्यामध्ये स्त्री म्हणून जन्माला आल्याचा हुंदका, मग फुत्कार अशी स्त्री माजवादाची हल्ल्लीच्या पुस्तकांतील किंवा चित्रपटांतून दिसणारी वैशिष्टय़े सांगता येतील. याच आठवडय़ामध्ये या वैशिष्टय़ांना सांधणारे उत्तम चित्रपट पाहण्यात आले.

लेस्ले हेडलॅण्ड या दिग्दर्शिकेचे ‘स्लीपिंग विथ अदर पीपल’, ‘बॅचलरेट’ हे दोन अमेरिकी आणि त्यातील बॅचलरेटशी विचारांनी बराच समानधर्मी असलेला पॅन नलिन या दिग्दर्शकाचा आपल्याकडचा ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’, हे तिन्ही चित्रपट वरील विवेचनाला बऱ्यापैकी कवेत घेणारे आहेत.

प्रेम व्यसनांधांच्या जगात!

‘स्लीपिंग विथ अदर पीपल’ या अलीकडच्याच चित्रपटाला रोमॅण्टिक कॉमेडीच्या गटात नोंदविले जात असले आणि त्याला नोरा एफ्रॉनच्या ‘व्हेन हॅरी मेट सॅली’शी तोलण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात त्या चित्रपटातील स्त्री मुक्तीचा नवविचार आणि या चित्रपटातील स्त्री माजवाद यात जमीन-आसमानाचा फरक आहे. यातील व्यक्तिरेखा विचारांनी नुसतीच मुक्त नाहीत तर नुसतीच स्वैराचारी आहेत. वर्तमान नातेसंबंधांची टोकदार उदाहरणे म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. शीर्षकाबरहुकूम ओळखीच्याच नाही तर अत्यल्प ओळखीवरही ती
कुणाहीसोबत झोपण्यात चाड बाळगत नाहीत. त्याबाबत त्यांचे तत्त्वज्ञान एकाच वेळी प्रगत आणि आदिम पातळीवरचे दिसते.

यातील नायक जेक (जेसन सुडेकिस) आणि नायिका लेनी (अ‍ॅलिसन ब्री) रोमॅण्टिक कॉमेडीच्या मूळ तत्त्वाप्रमाणे अगदीच तऱ्हेवाईक परिस्थितीत भेटतात. काही तासांच्या अत्यल्प ओळखीवर शरीरविनिमयाचा उद्योग करून बसतात. त्यानंतर एकमेकांचे तोंडही न पाहण्याच्या काळात प्रेमाच्या शोधात अडखळतात, धडपडतात. त्यांच्या अंतिम कोसळण्या-उभरण्याच्या प्रक्रियेचा काळ चित्रपटात साकारला आहे.

लेनीशी भेटीआधी सर्वसाधारण असलेला जेक नंतरच्या तपभरात अल्पकालीन प्रेमाची असंख्य उपयोजित प्रकरणे घडवून ‘सेक्स अ‍ॅडिक्टशन’पासून मुक्ती देणाऱ्या शिबिरात अंतिमत: दाखल झालेला असतो. तेथे पूर्वाश्रमीच्या अनेक प्रेमांसोबत ताज्या प्रेमभंगाचा फटका विसरण्यासाठी आलेल्या लेनी आणि जेकच्या भेटीत सुसंवादाच्या फैरी झडू लागतात. या फैरीतून दिसते, ते त्यांचे प्रेमव्यसनांध स्वरूप. आजच्या मुक्तीच्या, स्वातंत्र्याच्या विचार संकल्पनेमुळे प्रत्येक नातेसंबंधातून ओढवून घेण्यात आलेले एकारलेपणाचे दृष्टचक्र भेदण्यात या व्यक्तिरेखा अपयशी ठरताना दिसतात.

जेक आपल्या अल्पकालीन प्रेमाच्या संकल्पना मोडून लेनीला पटविण्याच्या प्रकाराला सुरुवात करतो आणि लेनी त्याच्यापासून लांब जाण्याच्या धडपडीत आणखी जुन्या आणि नव्या संबंधांचे चक्रव्यूह उभारून ठेवते. पण पुढे चिरतरुण प्रेमदु:खांच्या बुरुजांना गोंजारत चित्रपटाचे कथानक चक्रव्यूहांना भेदत ‘रोमॅण्टिक कॉमेडी’च्या अपेक्षित वळणांना कवटाळते.

चित्रपट इतर रोमॅण्टिकांपासून पूर्णपणे वेगळा आणि मुक्त भाषेपासून व्यक्तिरेखांच्या एकामागोमाग चालणाऱ्या प्रेमव्यसनाच्या प्रवृत्तींनी दचकवणारा ठरतो. सतत प्रेमात ढवळून निघालेल्या पात्रांच्या अनेकनिष्ठ विचारांना स्थिर होताना वापरलेला सहजस्फूर्त विनोद आणि शीर्षकाच्या आशयाला आशयात मांडताना पाळलेली दृश्यिक मर्यादा हा चित्रपट खूप आवडण्यासाठी मदत करतो.

दोन काहीसे जुळे चित्रपट!

नुकताच आपल्याकडे गाजावाजा न करता येऊन गेलेला आणि प्रक्षोभक विचार असल्याची टीका झालेला ‘अँग्री इंडियन गॉडेस’ आणि चारेक वर्षांपूर्वीच्या ‘बॅचलरेट’ या चित्रपटांमध्ये बरीचशी साम्यस्थळे दाखवून देता येतील. एक स्त्री माजवादाचा आजचा काळ सांगणारे देशी उदाहरण आहे, तर दुसरे अमेरिकेचे गेल्या दीड दशकापासून सातत्याने बदलत राहिलेले स्त्री मुक्तीच्या विचारांचे एकत्रीकरण आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये अनेक जिवलग मैत्रिणींपैकी एकीचे लग्न ठरणे आणि त्यानिमित्ताने त्यांचे एकत्र येणे आहे.

लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मित्राच्या आदल्या दिवशीच्या बॅचलर पार्टीमध्ये काही मित्रांचा अविरत गोंधळधिंगाणा चालणारा ‘हँगओव्हर’नामक चित्रपट गेल्या दहा वर्षांतील गंभीर विनोदी चित्रपटांमध्ये गणला जातो. त्याचे स्त्रीवादी स्वरूप म्हणजे ‘बॅचलरेट’. हायस्कूलपासून एकत्र वाढलेल्या आणि तिशी उलटूनही स्वत:च्या प्रेमनिकषांनी विवाहापासून दूर राहिलेल्या तिघी मैत्रिणी यात आपल्यात बऱ्यापैकी लठ्ठ-मठ्ठ मैत्रिणीच्या ठरलेल्या विवाहसोहळ्यासाठी एकत्रित येतात. मैत्रिणीविषयी प्रेमासोबत असूया आणि स्वत:च्या स्वभावातील अनंत अडचणींच्या अनेक गोष्टी घेऊन दाखल झालेल्या या तिघींकडून एका वादात लग्न होणाऱ्या मैत्रिणीचा वेडिंग ड्रेस फाटला जातो. एका रात्रीमध्ये तो दुरुस्त करण्यासाठी तिघींचा आटापिटा त्यांच्यासमोर चित्रविचित्र अनुभवांची शिदोरी उघडून ठेवतो. विनोदासोबत या चित्रपटातील वेगवान घडामोडी आणि लग्नासोबत नात्यांबाबत सीमारेषा ओलांडणाऱ्या चर्चा गमतीशीर आहेत.

‘अँग्री इंडियन गॉडेस’मध्येही मैत्रिणीच्या लग्नासाठी जमणाऱ्या अनेक मुली गोव्यातील महालरूपी घरात दाखल होतात. यातील प्रत्येक जणीची मते ‘मेट्रोसेक्शुअल स्त्री’ची असली तरी प्रत्येकाकडे स्त्रीत्वातूनच आलेल्या समान खासगी अडचणी आहेत. त्या भेटतात. त्यांच्यात लग्नापासून भारतीय स्त्रियांच्या अबलावृत्तीवर चर्चा होते. गमती केल्या जातात. रुसवे, फुगवे चालतात. एकमेकांची उणी-दुणीही काढली जातात. एका विशिष्ट पातळीवर हा चित्रपट रंगत असतानाच लग्न कोणाशी होत आहे, याचा पहिला नाहक धक्का दिला जातो आणि दुसरा धक्का एक दुर्घटना घडवून चित्रपट आपला सुंदर प्रवाही ट्रॅक सोडतो तेव्हा बसतो.

यात स्त्री माजवादाच्या संकल्पना ज्या पद्धतीने मांडल्या आहेत, त्याची गंमत वाटते. अन् नंतर सामाजिक संदेशाच्या वाटेने चित्रपटाला फिरविण्याचा अट्टहास चित्रपटाची झिंग काही क्षणांत उतरवून टाकतो. अर्थात असे असले, तरी पॅन नलिनच्या आधीच्या चित्रपटांहून अधिक प्रगल्भ अशी ही निर्मिती आहे. गेल्या दशकभरामध्ये स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेचा भारतीय स्त्रियांनी नक्की कसा अंगीकार केला, त्यात खरा अन् फसवा भाग किती त्याचे दाखले या चित्रपटामधील व्यक्तिरेखांच्या तोंडी सहजपणे येतात. त्याशिवाय सर्व काही प्रगत विचारी असले, तरी दु:खाच्या आदिम संकल्पनेला ती अंमळही बदलू शकत नाही, याची हतबलताही स्पष्ट झालेली आहे.

स्त्रियांचे स्वातंत्र्य, मुक्तविचार अन् त्याच नाण्याची स्वैराचारी   बाजू यांवर सध्या साहित्य आणि चित्रपटांतून महापूर येत असल्यासारखी स्थिती आहे. त्यातून संकरित विचारांची ‘स्त्री माजवादा’ची नवी संस्कृती विकसित होणार यात शंका नाही. फक्त ती वाईट की चांगली, हा ज्याचा त्याचा पाहण्यातील दृष्टिकोनाचा फरक असेल.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com